मेसेज हॅक करणार कोड

By admin | Published: January 18, 2017 06:28 PM2017-01-18T18:28:19+5:302017-01-20T16:33:49+5:30

दुसऱ्याच्या मोबाइलमधले मेसेजेस चोरून नाही, तर स्कॅन करून वाचण्याचा एक व्हायरल ट्रेण्ड.

Message hacking code | मेसेज हॅक करणार कोड

मेसेज हॅक करणार कोड

Next

 

 
दुसऱ्याच्या मोबाइलमधले मेसेजेस चोरून नाही, तर स्कॅन करून वाचण्याचा एक व्हायरल ट्रेण्ड.
 
मेसेज हॅक करणारा कोड
 
सध्या व्हायरल काय आहे माहिती आहे? जे आपल्यापर्यंत येतं तेच व्हायरल असतं असं काही नाही.
लोकांचे भलतेच उद्योग चालू असतात. सध्या असाच एक ट्रेण्ड मोठ्या शहरांतल्या तरुणांत तेजीत आहे. 
गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचे, मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस त्यांच्या नकळत वाचण्याची अनेकांची इच्छा बळावते आहे. ते कोणाशी बोलतात, काय शेअर करतात हे जाणून घेण्याचा भोचकपणा वाढत चाललाय. त्यात मित्रही आपल्या मोबाइल्सना लॉक घालतात. पण ज्यांना उद्योग करायचे त्यांना शांत बसवत नाहीच.
मग हे मेसेज कसे वाचता येतील याच्या ट्रिक्स सांगणारे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर एकमेकांना पाठवले जात आहे. आणि ज्यांना या ट्रिक्स येतात, ते शाईन मारत फिरतात.
पण त्यात आता सिक्रेट काही उरलेलं नाही, कारण व्हायरल तर सारंच होतं. 
* गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन व्हॉट्सअ‍ॅप स्कॅन फॉर व्हॉट्सअ‍ॅप वेब (WhatsApp scan for WhatsApp Web)हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करायचं. ८.२८ एम.बी. एवढी जागा मात्र ते अ‍ॅप्लीकेशन खातं. हे अ‍ॅप्लीकेशन इन्स्टॉल केल्यावर एक चौकटी-चौकटीसारखा दिसणारा क्यूआर कोड तुमच्या स्क्रीनवर दिसतो. 
जो मोबाइल काही सेकंदांसाठी आपल्या ताब्यात घ्यावा लागतो त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्जमध्ये जाऊन व्हॉट्सअ‍ॅपवर क्लिक करायचं. असं केल्यावर कोड स्कॅनर त्या मोबाइलच्या स्क्रीनवर दिसेल. मग जास्त वेळ न लावता आपला मोबाइल त्या मोबाइलखाली ठेवून आपला क्यूआर कोड स्कॅन करून घ्यावा लागतो. काही सेकंदांमध्येच त्या मोबाइलमध्ये येणारे मेसेज आपल्या मोबाइलमध्ये दिसू लागतात.
 
पण हे धोक्याचं..
हे सारं सध्या व्हायरल असलं तरी कोणाचेही पर्सनल मेसेजेस वाचणं हे चुकीचंच. एक प्रकारचा विश्वासघात. आणि असुरक्षितताही. त्या व्यक्तीवर अविश्वासही. दुसरं म्हणजे, आता यापुढे आपला मोबाइल काही सेकंदासाठीही दुसऱ्या कुणाच्या हाती देणं हे किती महागात पडू शकतं हेही यावरून लक्षात येईल. त्यामुळे आपण किती खासगी गोष्टी सोशल मीडियात शेअर करणार याचाही विचार करायला हवा. जाणीवही यातून होईल. 
(संदर्भ- यू ट्यूब)
- प्रवीण दाभोळकर dabholkarpravin@gmail.com
 

Web Title: Message hacking code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.