शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

भेटा दोन इंजिनिअर मित्रांना- ऐन विशीत ते स्टार्टअप काढून उद्योगाला लागलेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 16:49 IST

इंजिनिअर होता होताच ठरवलं आपला उद्योग करायचा. मनीष 24 वर्षाचा, जुनैद 23 वर्षाचा. आता दोघं मिळून डिजिटल मार्केटिंग याविषयात सॉफ्टवेअर बनवण्याचं स्टार्ट अप चालवत आहेत.

-मनीष बूब

माझं वय 24 आणि माझा दोस्त जुनैद शेख 23 वर्षाचा आहे. आम्ही दोघांनी ठरवलं की, आपलंही स्टार्टअप असावं. म्हणून मग आम्ही विचार आणि अभ्यास करून  सॉफ्टवेअर, मोबाइल एप्लिकेशन आणि डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात एक स्टार्टअप सुरू केलं. त्यामागची कल्पना अशी होती की, जनसामान्यांना भेडसावणारे दैनंदिन जगण्यातले प्रॉब्लेम डिजिटल स्वरूपात कशाप्रकारे सोडवता येतील.आता आमचा प्रवास सुरू झाला आहे, मात्र मनात हे बरंच आधी रुजलं होतं. इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्षात असताना एक प्रोजेक्ट करत होतो, तेव्हाच वाटलं की सॉफ्टवेअर क्षेत्रात काहीतरी नवीन करायला हवं. खासकरून ‘डिजिटल मार्केटिंग’ या क्षेत्रात काही कामं केलं, अनेक गोष्टी सर्वसामान्य लोकांना सोप्या पद्धतीने करता येईल. म्हणून मग सॉफ्टवेअर आणि मोबाइल एप्लिकेशनचा वापर करून दैनंदिन जीवनातील आणि व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठीचं काम, प्रयोग आम्ही सुरू केले. स्वतर्‍चा उद्योग सुरू करण्याचा विचार होताच. ‘कोएक्सिस टेक’ (ूी7्र2 3ीूँ) या नावानं स्टार्ट अपची सुरू केलं.दरम्यान, कॉम्प्युटर इंजिनिअर झालो.  सुरुवातीला मी आणि जुनैदनं ठरवलं की अनुभव घेता यावा म्हणून नोकरी करायची. एका स्टार्टअप कंपनीतच एक वर्ष काम केलं. त्यातून सॉफ्टवेअर क्षेत्रात नेमके काय खाचखळगे असतात, कशाप्रकारे काम चालतं हे आम्ही शिकलो.नोकरी करतानाच आम्ही रात्री रूमवर आलो की कामाला लागायचो. वेगवेगळ्या समस्या विचारात घेऊन काही सॉफ्टवेअर व एप्लिकेशन तयार केले. रात्रीची वेळ आम्ही आमच्या डेव्हलपमेण्टच्या कामाला देत होतो.मग नोकरी सोडली. तो निर्णय सोपा नव्हता.   स्वतर्‍चा स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. मेहनत तर घेतली होती; पण आता त्याची नेमकी सुरुवात कुठून करणार असा प्रश्न होता. ग्राहक वर्ग कसा तयार करणार? कारण ज्या व्यवसायात ग्राहक नाही तो व्यवसाय असूच शकत नाही आणि टिकूही शकत नाही. ज्या गोष्टी आम्ही शिकलो, जे सॉफ्टवेअर आम्ही बनवलं होतं ते लोकांर्पयत कशाप्रकारे पोहचवणार असा प्रश्न पडला. त्यात व्यवसाय म्हटल्यावर ऑफिस लागणार आणि त्यासाठी भांडवल लागणार, ते कुठून आणणार?  मात्र सुदैवानं आमच्या आई-वडिलांकडून आमच्या निर्णयाला कुठलाही विरोध नसल्यानं आणि त्यांच्या आमच्यावर विश्वास असल्यानं आम्ही आमच्या राहत्या रूमवरून कामाला सुरुवात केली.सुरुवातीला ओळखीतून काही छोटय़ा सॉफ्टवेअरची ऑर्डर आम्हाला मिळाली.  आमचं पहिलं सॉफ्टवेअर डिलिव्हर केल्यानंतर त्यातून जी रक्कम मिळाली त्याचा आनंद हा शब्दापलीकडचा आहे. ती रक्कम आणि तो आनंद आमच्या व्यवसायाचा निर्णय बरोबर आहे हेच सांगत होता.चार महिन्यांनंतर आम्ही भाडेतत्त्वावर छोटं ऑफिस घेतलं. या काळात इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करून नवीन गोष्टी शिकलो. ज्याचा फायदा आम्ही आमच्या व्यवसायात करून घेतला. इंटरनेटच्या माध्यमातून आम्हाला परदेशातील सॉफ्टवेअरच्या ऑर्डर कशा मिळवता येतील हे शिकलो आणि त्याद्वारे आम्ही आमची पहिली ऑर्डर मिळवलीही.आज 8-9 महिन्यांनंतर आमच्याकडे भारतातील 10-15 आणि परदेशातील 5-6 क्लायंट आहेत. हा आकडा जरी फार मोठा नसला तरी आम्हाला प्रेरणा देणारा आहे.आमच्या व्यवसायाचा यूएसपी द4ं’्र38 कल्ल3ीॅ1ं3्रल्ल 6्र3ँ ू1ीं3्र5ी ्रल्लल्ल5ं3्रल्ल हा आहे. कारण सॉफ्टवेअर क्षेत्रात क्वॉलिटी हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय की, नवीन सॉफ्टवेअर मागील सॉफ्टवेअरपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कसं करता असेल. जेणेकरून यूझर एक्सपिरीअन्स अधिक चांगला होईल.  आम्ही मध्यमवर्गीय उद्योगांना कशाप्रकारे डिजिटल स्वरूपात सहाय्य करता येईल यावर लक्ष केंद्रित करत आहोत. इ कॉमर्समुळे मध्यमवर्गीय उद्योगांना आपलं अस्तित्व टिकवणं खूप कठीण जात आहे. त्यांना डिजिटल युगात टिकाव कसा धरता येईल आणि व्यवसाय कसा वाढवता येईल यावर आम्ही काम करत आहोत. काळाची गरज समजून न घेता परंपरागत पद्धतीने व्यवसाय केला तर तो आजच्या डिजिटल युगात टिकु शकत नाही हे तर उघड आहे. त्यासाठीच आमचं स्टार्टअप मदत करत आहे.आत्ता आम्ही मोबाइल एप्लिकेशन डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म, डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात सुविधा पुरवत आहोत. आत्ताच्या घडीला आमची टीम लिमिटेड आहे; परंतु आता आम्ही ती वाढवण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. भांडवल उभारण्याचा प्रय} करत आहोत. मध्यमवर्गीय उद्योगांना डिजिटल युगाशी जोडणं आणि कमी खर्चात त्यांचा उद्योग वाढवायला तंत्रज्ञान देणं हे आमच्या स्टार्ट अपचं ध्येय आहे.