शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
2
Philippines Protest 2025: फिलिपिन्समध्ये लोक रस्त्यावर; भ्रष्टाचाराविरोधात देशभरात आंदोलन पेटले
3
आजचे राशीभविष्य, १ डिसेंबर २०२५: भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल
4
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
5
अग्रलेख : शेवटी मरण कार्यकर्त्यांचेच! अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार?
6
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
7
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
8
विशेष लेख: इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत?
9
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
10
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
11
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
12
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
13
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
14
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
15
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
16
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
17
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
18
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
19
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
20
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोको - व्हिनस विल्यम्सला हरवणारी कोण ही 15 वर्षाची खेळाडू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 14:39 IST

व्हिनस विल्यम्सला विम्बल्डनच्या पहिल्याच फेरीत नमविण्याची किमया तिला कशी जमली?

ठळक मुद्देकोण आहे ही कोरी?

कलीम अजीम 

कोरी गौफ. हे नाव ऐकलंच असेल तुम्ही एव्हाना. फक्त 15 वर्षाची ही मुलगी आहे. आणि तिनं जो पराक्रम करून दाखवलाय, तो अवाक्करणारा आहे.बलाढय़ टेनिस सम्राज्ञी व्हिनस विल्यम्सला तिनं  धूळ चारली. गेल्या दोन दशकांपासून टेनिसवर अधिराज्य गाजविणार्‍या व्हिनसचा पराभव एका नवख्या मुलीने केलाय. 39 वर्षाची ग्रॅण्डस्लॅम विजेती, जगज्जेती व्हिनस कुठं आणि कुठं ही 15 वर्षाची कोवळी पोर. मात्र तिनं  6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये व्हिनसला नमविलं. पहिल्याच राउण्डमध्ये हा पराभव पत्करावा लागल्यानं व्हिनस विम्बल्डनमधून बाहेर गेली.व्हिनस यापूर्वी 2012 ला विम्बल्डनमधून बाहेर पडली होती; पण यंदा तिच्याच देशातील नवख्या मुलीनं तिचं विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न पहिल्या फेरीतच संपुष्टात आणलं. गेल्या काही महिन्यांपासून व्हिनस विम्बल्डनसाठी जोरदार तयारी करत होती. प्रत्याक्षात मात्र तिचीच जबराट फॅन असलेली कोरी तिला वरचढ ठरली.2 जुलैचा तो दिवस. कोरी गौफचं पूर्ण कुटुंब टेनिस कोर्टच्या प्रेक्षक गॅलरीत प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या मुलीला चिअरअप करत होतं. पहिल्यापासूनच कोरीने व्हिनसवर आघाडी मिळवली. 1 तास 19 मिनिटे चाललेल्या या मॅचमध्ये कोरीने ग्राउण्डस्ट्रोक्स मारत अखेर विजयी आघाडी मिळवलीच.प्रथम तर आपण व्हिनसचा पराभव केलाय यावर कोरीचाही विश्वासच बसला नाही. पण प्रेक्षागृहात बसलेल्या पालकांचा उत्साह पाहून ती भानावर आली. आपल्याच आदर्श असलेल्या व्हिनसचा पराभव केलाय, याची जाण होताच तिला रडू कोसळलं. बराच वेळ ती स्तब्ध व निश्चल उभी होती. टेनिस कोर्टमध्ये आनंदाश्रू वाहणारे तिचे अनेक फोटो जगभर गाजले. ईएसपीएनवर दिलेल्या प्रतिक्रि येत तिच्या पालकांनी कोरीबद्दल असलेला आत्मविश्वास बोलून दाखवला. आपली मुलगी व्हिनसला हरवेन याबद्दल त्याची त्यांना खातरीच होती. कोरीचे वडील म्हणाले, जिंकण्यासाठीच  तिला आम्ही तयार केलं होतं. याउलट, कोरीला मात्र वाटत नव्हतं की आपण व्हिनसला नमवू शकू.  कोण आहे ही कोरी?कोको असं तिला प्रेमानं म्हणतात. 15 मार्च 2004 साली अ‍ॅटलांटा इथं झाला. या मुलीचं तिच्या आईवडिलांनी दोन धाकटय़ा भावांसह होम स्कूलिंगच केलं. ती अगदी लहान होती, तेव्हा तिच्या पालकांनी टेनिससाठी फ्लोरिडात जायचं ठरवलं. आणि तेव्हापासूनच या मुलीच्या हातात रॅकेट आलं. तिची आई उत्तम अ‍ॅथलिट, तर वडील बास्केटबॉल प्लेअर. मात्र वयाच्या 6 व्या वर्षापासून तेच मुलीचे कोच झाले. पुढं तिचं टेनिस अ‍ॅकडमीत शिक्षण झालं; पण केवळ 11 वर्षाची असताना सेरेना विल्यम्सचे कोच पॅट्रिक्स मॉटरुगोल यांच्या चॅम्प सीड फाउण्डेशनसाठी तिची निवड झाली. आणि त्यांच्याकडे फ्रान्समध्ये ती टेनिस शिकली. खरं तर कुठलीही ग्रॅण्ड स्लॅम क्वॉलिफाय करणारी ती सगळ्यात लहान खेळाडू ठरली आहे. तिथवर पोहोचणं हीच इतक्या कमी वयात मोठी गोष्ट होती. मात्र त्याही पुढचं एक पाऊल कोकोनं टाकलं. रॅँकिंगमध्ये 313 क्र मांकावर आहे. तिनं गेल्या वर्षी ज्युनिअर फ्रेंच ओपन चॅम्पियनशीप जिंकली होती. आणि आता तर विम्बल्डनच्या पहिल्याच मॅचमध्ये जिंकणारी कमी वयाची पहिली खेळाडू ठरली आहे. याआधी 2009 ला ब्रिटेनच्या लॉरा रॉबसनला हा मान मिळाला होता. यापूर्वी 1991 ला अमेरिकेच्या 15 वर्षीय जेनिफर कैप्रियातीने नऊवेळा चॅम्पियन राहिलेल्या मार्टिना नवरातिलोवाचा पराभव केला होता.जिंकल्यावर कोको आधी तर खूप रडली. आणि मग माध्यमांशी बोलताना म्हणाली, ‘मी स्वतर्‍ला सतत सांगत होते की, शांत राहा. एवढय़ा मोठय़ा स्पर्धेत मी कधीच खेळले नव्हते; पण कोर्ट तर नेहमीसारखंच आहे, लाइन्स त्याच आहेत, खेळायचं नेहमीसारखंच आहे. असा विचार केल्यानं मी शांत राहिले. खेळले. आता स्वप्नात असल्यासारखं वाटतं आहे ते वेगळं. ती माझी प्रेरणा आहे, आजही हे तिला समक्ष सांगणं मला कठीण जाईल, मात्र तिच्यासारखं होण्याचं स्वप्न पाहत मी मोठी झाले हे तर खरंय!’टेनिसच्या क्षितिजावर हा नवा तारा कसा चमकतो हे भविष्यात कळेल; पण आज तरी तिनं एका मोठय़ा सम्राज्ञीला धक्का दिला आहे.