विशीत आहात? १0 गोष्टी, आत्तापासून करा !

By Admin | Updated: September 18, 2014 19:30 IST2014-09-18T19:30:28+5:302014-09-18T19:30:28+5:30

वर्क हार्ड. प्ले हार्ड. कार्पोरेट जगात कुणीही तुम्हाला प्रोटेक्ट करायला सांभाळून घ्यायला येत नाही. ‘लहान आहे अजून, जमेल तिला हळूहळू हे काम’ असं म्हणणारे आता नव्या जगात भेटत नाहीत.

Looking for? 10 things to do, from now on! | विशीत आहात? १0 गोष्टी, आत्तापासून करा !

विशीत आहात? १0 गोष्टी, आत्तापासून करा !

१ 
टेक लाईफ सिरीयस्ली
वर्क हार्ड. प्ले हार्ड. कार्पोरेट जगात कुणीही तुम्हाला प्रोटेक्ट करायला सांभाळून घ्यायला येत नाही. ‘लहान आहे अजून, जमेल तिला हळूहळू हे काम’ असं म्हणणारे आता नव्या जगात भेटत नाहीत. तुम्हाला  स्वत:ची गुणवत्ता स्वत:च सिद्ध करावी लागते. माणसं रोज तुमची परीक्षा करत असतात. हरघडी लोकांचं तुमच्याकडे लक्ष असतं. म्हणून आपलं काम सिरीयस्ली घ्या. अत्यंत सिन्सिअरली करा.
 
तुम्हाला आवडतं काय?
काम गांभीर्यानं घ्यायचं. म्हणजे सतत काम. सगळी दुनिया बंद करून, झापडं लावून स्वत:ला कामात गाडूनही घेऊ नका. कितीही काम असो, स्वत:साठी वेळ काढा. तुमच्या आवडीचं काम करा, छंद जोपासा. टेनिस, क्रिकेट, ट्रेकिंग, चित्रकला, जे काय तुम्हाला आवडत असेल.
 ते पूर्वीसारखंच अत्यंत अग्रेसिव्हली करा. तुम्हाला एकदम जिंदादिल वाटेल, हे नक्की.
 
३ 
जरा पॉज घ्या.
दीर्घ श्‍वसन करा, असं कुणी सांगितलं तर तुम्ही म्हणाल काय बोअर मारता. मात्र हे खरंय, यंत्राला जरा आराम द्याल की नाही. खाणंपिणं सांभाळा, भरपूर पाणी प्या, व्यायाम करा, मोकळा श्‍वास घ्या. क्षुल्लक वाटतं हे सगळं, पण करा, अजून बरीच वर्षे धडधाकट रहायचं असेल तर या जुनाट गोष्टींना पर्याय नाही.
 
पैशाचं काय?
तुम्ही कॉर्मसवाले असलात, अगदी एमबीए, सीए करत असलात तरी तुम्हाला आर्थिक नियोजन कुणी शिकवत नाही. ते जरा बघा, की आपण कमवणार्‍या पैशांचं नक्की काय करणार आहे?
 
 
५ 
स्ट्रेस?
तो येतोच. विशीत नाही येणार तर कधी येईल? पण खरा ताण कसला आणि कुठल्या गोष्टीत आपण अकारण अडकतो हे जरा बघाच.
 
स्क्रीनचे गुलाम
बरेचजण असे आहेत, जे गुलाम आहे. स्क्रीनचे गुलाम. टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड, मोबाइल, काही ना काही पण डोळ्यासमोर स्क्रीन लागतोच.
 
रिलेशनशिपचं काय?
कुणीही येवो, कुणीही जावो, आपल्याला काय फरक पडतो? गेली माणसं उडत असं अनेकजण म्हणतात. पण ते खरं नाही, माणसं सांभाळा, कुणाचं काही चुकलं असेल तर त्यांना माफ करा. माणसं जोडा. आजपासून करा.
 
आईबाबा?
तुमचे आईबाबा तुम्हाला मारे बोअर वाटत असतील. पण तुमच्यासाठी पैसे कमवायचे, सतत कष्ट करायचे म्हणत ते असे बोअर झालेत. त्यांना सुख देण्याच्या टप्प्यात आता तुम्ही येऊन ठेपलात.!
 
आय डोण्ट के अर
असा आय डोण्ट केअर अँटिट्यूड घेऊन अनेकजण जगू पाहतात. करिअर काय होईल म्हणतात. मज्जा करतात. पण ते खरं नाही चांगले जॉब तुमची वाट पाहत थांबणार नाहीत. मुद्दा नंबर एक लक्षात घ्या, टेक युवर लाईफ सिरीयस्ली. बाकी मज्जा वीकेण्डला 
करा.
 
१0 प्यारव्यार?
आता या वयात प्रेमात नाही पडणार तर कधी पडणार? मात्र तेही डोकं ताळ्यावर ठेवून. कारण हा निर्णय चुकला तर करिअरचे, आयुष्याचे निर्णयही ढासळलेच 
समजा.

Web Title: Looking for? 10 things to do, from now on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.