लेट? पण थेट नव्हे.

By Admin | Updated: September 10, 2015 21:28 IST2015-09-10T21:28:29+5:302015-09-10T21:28:29+5:30

अरुण. धडपडय़ा, उत्साही, मेहनती, हुशार. बरं असो नसो, सणवार असो, मित्रंचं गेट टू गेदर असो, तो कधीही सुट्टी घेत नाही

Lie? But not directly | लेट? पण थेट नव्हे.

लेट? पण थेट नव्हे.

 

 
 
 
अरुण. धडपडय़ा, उत्साही, मेहनती, हुशार.
बरं असो नसो, सणवार असो, मित्रंचं गेट टू गेदर असो, तो कधीही सुट्टी घेत नाही. आपण अगदी विकली ऑफच्या दिवशीही ऑफिसला येतो, याचा त्याला अत्यंत अभिमान आहे. तो ते येताजाता इतरांना ऐकवतही असतो.
पण त्याचा एक दुगरुण आहे. तो कधीच ऑफिसला वेळेवर येत नाही. कुठलीही मीटिंग असो, काहीही काम असो, तो धावतपळत पोहचतो. वेळेवर आला असं म्हटलं तरी पाचदहा मिण्टं लेटच असतो.
त्या कारणावरून बॉस त्याला झापतो. आणि मग अरुणला असं वाटतं की, एवढी आपण मरमर करतो तरी आपली इथं कुणाला किंमतच नाही. इतर पाटय़ा टाकतात, त्यांना बॉस झापत नाही. मग आपल्यालाच का बोलणी बसतात.
त्यावर कुणी अरुणला सांगितलं की, चुकतंय तुझंच. तर तो ऐकेल!
नाही ऐकणार कदाचित. पण चुकतंय त्याचंच!
1) खूप काम करण्याचा आणि वेळेवर ऑफिसला न पोहचण्याचा एकमेकांशी काही संबंध नाही.
2) बरं नसेल तर सुट्टी घ्या, आराम करा. साप्ताहिक सुट्टी तर घ्याच. ती न घेतल्यानं काही तुम्ही गुणवान ठरत नाही.
3) वेळेवर न जाणं, काम वेळेत न करणं यासारखा अकार्यक्षमपणा नाही. त्यामुळे त्याचं कशानंच समर्थन होऊ शकत नाही.
4) तुम्ही काम वेळेत करणार नसाल तर तुम्हाला कामासंदर्भात चांगल्या आणि पुढच्या संधीच मिळणं बंद होतं, हे कायम लक्षात ठेवा!
 

Web Title: Lie? But not directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.