शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

लेबनान- सोशल मीडीयावर कर लावला म्हणून पेटलेलं एक बेडर आंदोलन

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 6:45 AM

व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगवर टॅक्स लावण्याचं फक्त निमित्त झालं, आणि भडकलेल्या बैरुतमध्ये हजारो तरुण रस्त्यावर उतरले.

ठळक मुद्देआजही लेबनानमधील आंदोलन सुरूच आहे आणि अक्षरशर्‍ रोज टांगाटोळी करत सैनिक तरुण आंदोलकांची धरपकड करत आहेत.

 -मेघना  ढोके / कलीम  अजीम   

लेबनानच्या सरकारनं एक अजब निर्णय घेतला. त्याची जगभरात चर्चा झाली. टीका, टवाळीही झाली. हा निर्णय होता सोशल मीडियावर कर लावण्याचा! 17 ऑक्टोबरला लेबनान सरकारने एक आदेश काढला आणि सोशल मीडिया कॉलिंगवर टॅक्स लावला. व्हॉट्सअ‍ॅप व अन्य मेसेंजर कॉलिंगवर सरकारने 20 टक्के कर आकारण्याची घोषणा केली. इंटरनेट कॉलिंग करणार्‍या यूझरला दिवसाकाठी साधारण 14 रुपये टॅक्स भरावा लागणार होता. शिवाय सरकारने पेट्रोल, तंबाखूवरही भरमसाठ कर घोषित केला होता.देशात पारंपरिक संचारप्रणालीचा वापर कमी करून जनतेनं इंटरनेट कॉलिंगवर भर दिल्यानं  सरकारच्या उत्पन्नवाढीवर परिणाम झाल्याचं सरकारचं म्हणणं होतं. त्याला देशभरातून विरोध सुरू झाला. त्यानंतर सरकारने तडकाफडकी हा निर्णय मागे घेतला; परंतु सरकारविरोधाची ठिणगी पडली.  बघता-बघता राजधानी बैरुत भडकलं.  शाळा, कॉलेज, बँका, विद्यापीठं, सरकारी कार्यालयं येथील तरुण आंदोलन करू लागले.दर्जेदार शिक्षण द्या,  आर्थिक संकटातून मार्ग काढा अशी मागणी होत होतीच, त्यात आंदोलकांनी   सरकारच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. 13 दिवस चाललेल्या या संघर्षाचा अंत पंतप्रधान साद अल हरीरी यांच्या राजीनाम्याने झाला.

आंदोलनात तरुणांनी मोठय़ा प्रमाणात सहभाग घेतला होता. तब्बल 60 टक्के आंदोलक हे तिशीतले होते. व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगवर टॅक्स आकारणी हेच एक लेबननी जनतेच्या विद्रोहाचे कारण नव्हतं. गेल्या आठ-दहा वर्षापासून मध्य-पूर्व अरब राष्ट्रांत राजकीय अस्थिरता व अनास्थेचं वातावरण आहे.लेबनानच्या सत्तापालटाला तीन महिने उलटत आले आहेत; परंतु अजूनही तिथं सरकार स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. एका वादग्रस्त निर्णयाच्या निमित्ताने देशात सत्तांतर घडलं; परंतु नव्या सत्तास्थापनेनंतर देशातले मूलभूत प्रश्न सुटतील, अशी शक्यता खूप कमी आहे.आजही लेबनानमधील आंदोलन सुरूच आहे आणि अक्षरशर्‍ रोज टांगाटोळी करत सैनिक तरुण आंदोलकांची धरपकड करत आहेत.