शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

दिमाग खुल्ला रखनेका बॉस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 04:00 IST

इतक्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आपण आहोत, अखंड बोलतो. मित्रमैत्रिणीही आहेत. पण वेळ पडली तर कोणाला हाक मारावी असं कुणी नाही एकट्यानं स्वत:सोबत राहायची हिंमत होत नाही. आणि सतत दुसºयाला दोष देत आपले प्रश्न दुसरं कुणी सोडवेल ही अपेक्षा. हे सारं काय आहे? त्यापेक्षा आपल्या अंतरंगाचाच सेल्फी काढत राहिलं तर मन मस्त मोकळं राहतं, कुढत कशाला बसायचं उगीच?

प्राची पाठक

सेल्फी. हे नाव घेऊन आपण आपल्यालाच दर गुरुवारी भेटलो.मनातल्या खळबळीचा, तिथल्या आव्हानांचा, अस्थिरतेचा आणि दुखावलं जाण्याचा वेध वर्षभर या कॉलममधून घेतला. घरीदारी आपल्याला ‘स्वत:ला समजतो काय?’ ‘ह्या वयात पाय घसरू देऊ नका’, ‘मापात राहा’, ‘ध्येय ठरवा’, ‘ते बघा कुठे गेले आणि तुम्ही कुठे’ असे उपदेश, तुलना, स्पर्धा यांना सामोरं जावं लागतं. सेल्फीमध्ये स्वत:चा चेहरा आणि दिसणंच महत्त्वाचं नाही, तर मनात काय सुरू आहे, आपल्याला कोणी समजून घेणार आहे की नाही, संवाद वाढवावा म्हणजे काय करावं असे अनेक विषय आले. त्यात आपल्या असण्या-दिसण्यानंदेखील आपल्याला येणारा ताण, आपण बरे दिसतो का, हे सूट होतं का, ते कसं दिसेल असंही काही समजून घेतलं. किती वेगवेगळ्या प्रकारचे ताण आणि अपेक्षा आपण आपल्यासोबत वागवत असतो, त्यांचं नियोजन कसं करावं आणि त्यांचा सकारात्मक उपयोग आपल्याला अधिक समृद्ध करण्यासाठी कसा करता येईल याबद्दल बोललो.आपल्या मनात स्वत:चा एक निरंतर शोध सुरू असतो. मी कसा आहे/कशी आहे आणि असं असेल तर तसं का आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. दरवेळी चपखल उत्तरं मिळतातच असं नाही. मिळालेली उत्तरं आपल्याला आवडतील असंही नाही. त्या उत्तरांमधूनसुद्धा वेगळे प्रश्न समोर येतात आणि डोक्याचा पार भुगा होऊन जातो. कधी कधी अनेक समस्या समोर असतात. अगदी पळून जावंसं वाटतं. पळून जावंसं वाटणं या भावनेशी किती जणांना जोडून घ्यावंसं वाटतं ही काही आनंदाची गोष्ट नाही.आपण सध्या कोणत्यातरी सापळ्यात अडकलो आहोत आणि हे दिवस चटकन सरावे, नाहीतर मीच इथून निघून गेलेलं काय वाईट, असा तो शॉर्टकट असतो. पण आधीच मनाची गाडी मेंटेनन्सला आलेली असताना, तीच गाडी घेऊन एकट्यानं पळून जाऊन दामटल्यानं फार काळ सुखासुखी पळून जाता येणार नाही, तिथं अजून नवीन आव्हानं समोर येतील, हेही समजावून घेता आलं.आहे ते ठीक सुरू नाही आणि यातून सुटकेचा शेवटचा पर्याय म्हणजे आत्महत्या, असंही खचणं आजूबाजूला दिसतं. त्यावेळी कसा मार्ग काढणार, ते दु:ख आणि खचणं कसं समजून घेणार हे तर घ्यायला हवंच. पण आपल्या आजूबाजूला असे कोणी असतील तर त्यांना आधार कसा देणार, त्यांना मुळात समजून कसं घेणार ह्याबद्दलदेखील आपण बोललो, बोलत राहिलं पाहिजे.मला कोणी समजून घेत नाही, मनातलं कोणाला सांगता येत नाही अशीही भावना अनेकांना सतत टोचत असते. आतल्या आत खात असते. संवाद साधा, घरातल्या लोकांशी, जवळच्या मित्रमैत्रिणींशी मनातलं बोला म्हणजे नेमकं काय करा आणि कसं करा याविषयी आपण बोललो.आपण काहीतरी करायला जातो. पण जसं प्लॅन करतो, तसं होत नाही. आज करू, उद्या करू असं होतं. त्यावर मात करायला शिकायलाच हवं. त्या धडपडीत कोणी आपल्याला स्वीकारेल, कोणी नाकारेल. अशावेळी नाकारलं जाणं कसं हाताळावं हे आपण स्पष्ट, थेट बोललो याचा आनंद आहे.सतत कोणीतरी आपल्याला टाळत असतं असं अनेकांना वाटतं. मेसेज बघितला, लास्ट सीनच्या खुणा दिसल्या तरी उत्तर नाही, अशावेळी काय करायचं हा एक भयंकर प्रश्न अनेकांना सतावत असतो. त्यामुळे किती तरी ब्रेकअप्स, गैरसमज आणि त्यातून येणारे ताण असतात. ते असह्य झाले की दूर कुठेतरी पळून जावं असं वाटत आणि दुष्टचक्र परत सुरूच राहतं. यातून काही वेगळं, भरीव आणि दिलासादायक आपण निर्माण करू शकतो का, कसं हे शोधलं तर प्रश्न सुटू शकतात या शक्यतेविषयी आपण बरंच बोललो.भास मारण्याविषयी तर कितीतरी बोललो. आणि त्यातून स्वत:विषयी बरंच काही उलगडलं.वर्षभर हे सारं वाचत असताना तुमच्याही लक्षात आलं असेल की गोष्टी सुटू शकतात.फक्त त्यासाठी दिमाग खुला रखने का ! मनातला केमिकल लोचा समजून घ्यायचा आणि मनातलं व्यक्त करायचा सराव करायचा/वाढवायचा. तो वाढो, स्वत:मध्ये डोकावत हा सेल्फी आपण घेत राहो याच शुभेच्छा !

- आपले प्रश्न सतत केवळ इतरांमुळेच निर्माण होत नाहीत, तर आपल्या आपलीदेखील कठोर चिकित्सा करायची गरज असते. वेळ पडली तर चुका मान्य करून सुधारायची हिंमत बाळगावी लागते, हेही मुद्दे समजून घेतले.

- समुपदेशकांकडे जाणं अजूनही अनेकांना आवडत नाही. चटकन प्रश्न सुटलेले हवे असतात.

- इतकी संवादसाधनं आणि मनातलं बोलायला कोणी नाही. इतक्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आहोत पण वेळ पडली तर कोणाला हाक मारावी, मारावी का, हा प्रश्न असतोच.

- आपलं ऐकून घेतलं गेलंच पाहिजे, असा आग्रह असतो. ऐकून घेणाºयानं आपल्याच नजरेनं प्रॉब्लेम समजून घेतला पाहिजे, तो चुटकीसरशी आपल्याला हवा तसा सोडवून दिला पाहिजे, अशा अपेक्षा असतात.