आनंदवारी

By Admin | Updated: July 14, 2016 23:49 IST2016-07-14T23:49:16+5:302016-07-14T23:49:16+5:30

आज आषाढी एकादशी. ‘मोठी एकादशी’ म्हणून घरोघरी होणारा उपवास, आणि सा:या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठू माउलीची उपासना.

Joyfully | आनंदवारी

आनंदवारी

जगण्यातली विविधता शिकवणारी

आणि तरीही एकसमान जगण्याची
रीत सांगणारी
 
आज आषाढी एकादशी.
‘मोठी एकादशी’ म्हणून घरोघरी होणारा उपवास,
आणि सा:या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या
विठू माउलीची उपासना.
हे सारं आपण वर्षानुवर्षे करत आलो आहोत.
 चंद्रभागेच्या तीरी भरलेला वारक:यांचा मेळा किती अनुपम असतो
हेदेखील (निदान टीव्हीवर पाहून) अनुभवलेलं असतं.
पण काही तरुण या सा:याच्या पलीकडे 
वारक:यांच्या दिंडय़ांसह वारी चालतात.
वारी हा काय अनुभव असतो ते प्रत्यक्ष चालून अनुभवतात.
ज्यांना थेट पंढरपुरार्पयत जाता येत नाही
 ते किमान आळंदी, सासवडर्पयत तरी चालतात.
वारीतला साधेपणा आणि शिस्त अनुभवतात.
न थकता चालण्याची, 
सा:यांच्या सोबत आणि 
सा:यांना सोबत घेऊन चालण्याचीही
 एक नवी रीत या वारीत अनुभवतात. शिकतात.
आपल्यापेक्षा लहानांच्या पायाशी झुकत
दुस:याला मोठेपण द्यायचं कसं हे प्रत्यक्ष पाहतात.
वारीत चालणारा प्रत्येकजण 
आपापल्या नजरेनं ही वारी पाहतो, अनुभवतोही!
कुणी अभ्यास करतं, कुणी फोटो काढतो, 
कुणी वारीतले क्षण कॅमे:यानं टिपतं, 
तर कुणी चित्रं काढतं. 
कुणी वारीत चालणा:या माणसांच्या भावना 
शब्दबद्ध करत एक नवा अनुभव आपल्यागाठी जमा करतं.
कसे दिसतात वारीतले हे ‘तरुण’ चेहरे? 
कोण असतात? कुठून येतात?
याचाच एक लाइव्ह अनुभव, 
वारी कव्हर करणा:या एका तरुण पत्रकार मैत्रिणीच्या नजरेतून
खास आजच्या एकादशीनिमित्त.
पत्रकार हलीमाबी कुरेशी.
सामाजिक एकोपा, विविधता आणि सर्वसमावेशकता
 यांचं वारीत दिसलेलं तरुण चित्रच
 तिनं रेखाटलं आहे.
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Joyfully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.