जी लो जिंदगी यारो!
By Admin | Updated: October 30, 2014 20:18 IST2014-10-30T20:18:04+5:302014-10-30T20:18:04+5:30
10 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय आत्महत्त्या प्रतिबंधक दिवस. त्यादिवशी ‘ऑक्सिजन’ने एका विशेष लेखाद्वारे आत्महत्त्या या विषयावर स्पष्ट चर्चा केली. त्याच प्रतिसादातले हे दोन अनुभव. अस्वस्थ करणारे.

जी लो जिंदगी यारो!
>10 ऑक्टोबर, आंतरराष्ट्रीय आत्महत्त्या प्रतिबंधक दिवस. त्यादिवशी ‘ऑक्सिजन’ने एका विशेष लेखाद्वारे आत्महत्त्या या विषयावर स्पष्ट चर्चा केली.
तरुणांच्या ज्या देशात सर्वाधिक आत्महत्त्या होतात, तिथं तरुण मुलांशी बोलायलाच हवं. मागे वळवायला हवं मरणाच्या टोकावरून म्हणून तो एक छोटासा प्रय} होता.
अनेक मित्रमैत्रिणींनी, त्यांच्या पालकांनी या लेखाबद्दल मनमोकळ्या प्रतिक्रिया, अनुभव कळवले.
पालकांनी तर रडवेले होत फोन केले. आणि आभार मानले मुलांशी या विषयावर बोलल्याबद्दल.
त्याच प्रतिसादातले हे दोन अनुभव. अस्वस्थ करणारे.
- ऑक्सिजन टीम
-----------------
मित्रंनो सिरीयस्ली घ्या.
‘का छापलात तुम्ही तो लेख? कशाला खपल्या काढल्या माङया जखमेवरच्या?’
दहा वर्षे झाली आता त्या घटनेला. माङया जिवाभावाच्या मित्रनं आत्महत्त्या केली. मला अजूनही असं वाटतं की, मी त्याला वाचवू शकलो असतो. पण आम्हीच त्याला सिरीयस्ली घेतलं नाही. तो कधी खूप आनंदात असायचा. कधी खूप उदास. कधी खूप बोलायचा. कधी गप्पच. आम्ही मित्र त्याची खूप टर उडवायचो. माझी आणि त्याची दोस्ती खूप होती. त्याच्या वडिलांनीही आत्महत्त्या केली होती, पण का केली होती हे कधी मी त्याला विचारलं नाही, त्यानं सांगितलं नाही.
मात्र तो नेहमी म्हणायचा की, नाही जगावंसं वाटतं. मी मरून जाईन. पण मला वाटायचं घरची कायम चणचण. आई नोकरी कर म्हणून भूणभूण करायची, त्याचं आणि आईचंही पटत नव्हतंच. म्हणून हा असा उदास होत असेल. तेवढय़ापुरतं आम्ही समजवायचो त्याला.
पण टीवायची परीक्षा संपली आणि शेवटचा पेपर दिला त्याच दिवशी त्यानं घरात स्वत:ला फास लावून घेतला.
खरंच सांगतो, मलाही अजून कळलेलं नाही की, त्यानं का स्वत:ला संपवलं. त्याची आई मला भेटली की अजून विचारते की, सांग ना, का त्यानं असं केलं असेल?
पण मी काय सांगू? मला खरंच काही माहिती नाही. पण आता वाटतं की, त्याचवेळी त्याला चांगल्या डॉक्टरकडे नेलं असतं तर तो वाचला असता.
मी माङया सगळ्या तरुण मित्रंना एकच सांगतो, तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण अशी विचित्र वागत असेल तर त्यांना एकटं सोडू नका. डॉक्टरकडे जा. बोला त्यांच्याशी.
तुम्ही त्यांना गमावून बसण्याआधी मनाचे हे आजार गांभीर्यानं घ्या.
नाहीतर माङयासारखा पस्तावाच फक्त हाती राहील.
- भैरव, निगडी, पुणे
-------------------
मी खरंच, मरणं कॅन्सल केलं!
‘मरना कॅन्सल’ हा लेख वाचला, आणि मी खरंच माझं मरणं कॅन्सल केलं. थॅँक्यू ऑक्सिजन टीम.
तुमच्यामुळे मी ठरवलं आपण ही लढाई अशी पळपुटय़ासारखी सोडायची नाही. लढायची. दुस:यासाठी नाही स्वत:साठी जगायचं.
मी आयटी इंजिनिअर आहे. माङया गर्लफ्रेण्डने मला डंब केलं. म्हणजे फसवलंच. आम्ही पाच वर्षे एकत्र होतो. ती माङया पैशावर मजा करत होती. आणि आता तिला दुसरा कुणीतरी भेटला तर मला एका वाक्यात ‘इट्स ओव्हर’ म्हणत निघून गेली. जॉब बदलून टाकला.
मी मोडून पडलो. बदनामी झाली ती वेगळीच. कारण मी घरच्यांना सांगितलं होतं की, मी तिच्याशीच लग्न करणार आहे. मला खरंच जीव द्यावासा वाटतो. मी खूप डिप्रेस्ट झालोय.
मात्र परवा आईनं डोळ्यात पाणी आणून तो अंक मला वाचायला दिला. आणि माझं मलाच वाटलं की, मरून इतरांना यातना का देऊ?
मी आई म्हणते त्या डॉक्टरकडे जाऊन ट्रिटमेण्ट घ्यायलाही सुरुवात केली आहे.
खरंच मी ‘मरना कॅन्सल’.
थॅँक्स, तुमच्यामुळे !
- अंकुश, नवी मुंबई.