शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

वाटलं, अवघड आहे पण आपण करू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:04 PM

आर्थिक परिस्थितीचा शीण, शिक्षणासाठीची वणवण हे सारं अनुभवून जेव्हा शिक्षण क्षेत्रात काम करायला लागलो तेव्हा निराशच होतो. पण, विचारांना आत्मविश्वासाचं बळ मिळालं आणि नव्यानं कामाला लागलो.

ठळक मुद्देआहे त्या परिस्थितीत कसं दटून, नेटाने आणि आनंदाने काम करावे याची दृष्टी दिली. निर्माणमुळे मला माझ्या विचारांचे मित्न मिळाले.

- धीरज वाणी 

मी मूळचा नाशिकचा. आमचं एकूण पाच जणांचं कुटुंब. मी, आई, वडील, लहान बहीण व लहान भाऊ. मी सगळ्यात मोठा. सहावीला असताना वडिलांनी काम करणं सोडून दिलं त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी मोठा असल्याने माझ्यावर आली. 5 वाजता शाळा सुटल्यावर मी रोज 5.30 ते 10 वाजेर्पयत जवळच्या रेशनच्या दुकानात कामावर जायचो. मोबदल्यात मला 5 रु पये मिळायचे. जेव्हा मी रात्नीला घरी जायचो तेव्हा घरी वडील दारू पिऊन आलेले असायचे, सारखी मारझोड करायचे. प्रचंड शिव्या द्यायचे. सगळीकडे दारिद्रय़ाचं व निराशेचं वातावरण. मला वाटायचं की माझ्याच वाटय़ाला का आलं हे सगळं.? माझ्याकडे शाळेत भरायला फी नसायचीच. बर्‍याचदा मला शिक्षक वर्गात उभं करायचे कारण कधी माझ्याकडे शूज नाहीत, कधी दप्तर नाही, वह्या नाहीत असं नेहमीच व्हायचं. मला खूप वाईट वाटायचं कारण माझी कुठलीही चूक नसताना हे माझ्यासोबतच का होतं? प्रचंड रडायचो. साहजिकच मी खूप देवाला मानायला लागलो. कुठंही देवाचे फोटो, मंदिर किंवा मूर्ती बघितली कीमी हात जोडायचो. मला अकरावीला प्रवेश घ्यायचा होता आणि त्या दरम्यानच माझ्या आईचा अपघात झाला. तिच्या हिप जॉइंटच्या सर्जरीसाठी 50 हजारांचा खर्च अपेक्षित होता. त्यावेळी तेवढे पैसे नव्हते म्हणून माझ्या मामांनी त्या ऑपरेशनचा खर्च स्वतर्‍ केला. मी अकरावी करूच शकलो नाही कारण पैसेच नव्हते. माझे मामा जळगावच्या जिल्हा परिषद शिक्षण विभागात काम करत होते त्यांनी माझं वर्ष वाया जाऊ नये म्हणून अकरावी आर्ट्सला प्रवेश घेतला आणि अकरावी आर्ट्सची पास झाल्याची गुणपत्रिका आणून दिली. करणार काय? तेव्हा मी खूप रडलो कारण मला सायन्स करायचं होतं. इंजिनिअर व्हायचं होतं. मी आणखी म्हणजे खूपच निराश झालो. मला असं वाटायला लागलं की आता जगून काही फायदा नाही, यापेक्षा मरण सोप्पं. पण हे सगळं चालू असताना मी जिथं काम करायचो तिथं लोकमत वृत्तपत्रात ‘मैत्न’ नावाची पुरवणी यायची. ती पुरवणी मी दर आठवडय़ाला न चुकता वाचायचो. त्यामध्ये ‘मिलिंद थत्ते’ याचं ‘जिंदगी वसूल’ हे सदर तर उत्सुकतेने वाचायचो. त्याचा माझ्या मनावर सकारात्मक परिणाम व्हायचा. एक वेगळीच वीज अंगात तयार व्हायची. त्यामुळे जे झालं ते उत्तम झालं असं मानून बारावी आर्ट्सला प्रवेश घेतला. त्यावेळीसुद्धा माझ्याकडे फी भरायला पैसे नव्हते मग मित्नांकडून पैसे घेऊन फी भरली. घरचे माझ्यावर अवलंबून होते त्यामुळे पार्ट टाइम जॉब करू लागलो. याच दरम्यान आर्ट्सला शिकत असताना मी अनेक पुस्तकांच्या प्रेमात पडलो. पुस्तकं  वाचायला लागलो. जे हाताला येईल ते वाचायला लागलो. नुसतं न वाचता आवडत्या ओळींची वहीत नोंद करायला शिकलो. ही पुस्तकं मला खूप गोष्टी शिकवीत होती. पुढे जायला, शिकायला प्रेरणा देत होती. शिकणं म्हणजे निर्भय होणं हा अर्थ पुस्तकांनीच मला शिकवला.2009 साली बी.ए. पूर्ण झालं. मी विशेष बी.एड. करायचं ठरवलं कारण, माझं पहिलं प्राधान्य होतं लवकरात लवकर नोकरी मिळवणं आणि स्पेशल बी.एड.(दिव्यांग मुलांचे बी.एड.) करणारे खूप कमी होते. नोकरीची शक्यता जास्त होती. त्यावेळी माझ्या मनात असं काही नव्हतं की आपण समाजासाठी काही करत आहोत; पण मला शिक्षण क्षेत्नाची आवड मात्न नक्कीच होती. बी.एड.ला पहिल्याच राउण्डमध्ये माझा पुण्याच्या एका शासकीय कॉलेजमध्ये नंबर लागला. पण प्रवेश घ्यायला खिशात एकही पैसा नव्हता. मी त्या कॉलेजमध्ये गेलो. तेथील प्राचार्याना विनंती केली की मला आठ दिवसांची मुदत द्या. मी पैसे जमा करतो. त्या म्हणाल्या की, तुम्ही शिक्षण संचालकांना भेटा व त्यांना पुढील कॅम्प राउण्डला मला कृपया हेच कॉलेज द्या म्हणून विनंती करा. मी त्यांना भेटायला गेलो, पैसे जमा करायला आता आठ दिवस मिळाले होते. त्या दिवसांमध्ये मी माझे जेवढे ओळखीचे मित्न होते, शिक्षक होते, नातेवाईक होते त्या सगळ्यांना फोन लावले. मामांकडून पैसे घेतले. एकोणवीस हजार फी अगदी शेवटच्या दिवशी भरली. त्यावेळी ती खूप जास्त होती. आमच्या महाविद्यालयाने कमवा व शिका योजनेत माझं नाव घेतलं. माझी महाविद्यालयातच राहण्याची सोय केली. मी तिथेच कॉलेज सुरू होण्याच्या आधी वर्गखोल्या झाडायचो. झाडांना पाणी द्यायचो. त्याचे मला पैसे मिळायचे. त्यातून जेवणाचा खर्च निघायचा. या कॉलेजमधील प्राध्यापक दळवी सरांनी मला खर्‍या अर्थानं जीवन शिक्षण दिलं. जगण्याचा आत्मविश्वास दिला. 2010 साली बी.एड. पूर्ण झाल्यानंतर मी शाळांना अर्ज करायला सुरुवात केली. दोन-तीन शाळेत मला बोलावणंसुद्धा आलं; पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला पंधरा लाख भरावे लागतील, कुणी म्हणालं की आधी सहा लाख भरा बाकीचे तुमच्या पगारातून कापू. हे ऐकून तर मी एकदम थक्क झालो. एवढे पैसे कुठून आणायचे. परत निराश झालो. ज्याच्याकडे गुणवत्ता नाही, शिकवण्यात जो रमत नाही असा माणूस फक्त आणि फक्त वशिला असल्याने आणि पैसा असल्याने शिक्षक होतो आहे, याचा रागही आला. त्यामुळं मी आधीच ठरवलं होत की, जिथं पैसे घेतात तिथं मी काम करणार नाही. सध्या मी गेल्या सहा वर्षापासून समावेशित शिक्षण विशेषतज्ज्ञ या पदावर अपंग (दिव्यांग) समावेशित शिक्षण या विभागात पंचायत समिती बागलाण जि. नाशिक इथं काम करतो. माझ्या कार्यक्षेत्नात एकूण 468 शाळा आहेत आणि त्यामध्ये पहिली ते बारावीर्पयत शिकत असलेली 1049 दिव्यांग मुलं-मुली आहेत. अंशतर्‍ अंध, पूर्णतर्‍ अंध, कर्णबधिर, वाचा दोष, मतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, इत्यादी. तालुक्यात एकूण 21 केंद्रशाळा आहेत. मी आणि आमची टीम हे सगळं काम बघते.         जे दिव्यांग मुले-मुली आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं हे माझं मुख्य काम आहे. जी मुलं सर्वेक्षणामध्ये सापडतात, त्या दिव्यांग मुलांना आधी त्यांच्या घराजवळ असलेल्या शाळेत आम्ही दाखल करतो. परंतु असं होतं की अशा मुलांना सरकारचा आदेश असूनसुद्धा जनजागृती नसल्यामुळे तसेच कशाला त्नास वाढवून घ्यायचा म्हणून काही शाळा, शिक्षक प्रवेश देत नाही. काही पालकही अशा मुलांना घरात लपवून ठेवतात अशा विद्याथ्र्याना आम्ही सामान्य शाळांमध्ये दाखल करतो.       आम्ही दिव्यांग विद्यार्थी पालक प्रशिक्षण ठेवतो. पालकांना गृह मार्गदर्शन म्हणजे त्यांच्या घरी जाऊन बेसिक गोष्टी शिकवितो उदा. त्याला कपडे कसे घालावीत, जेवण कसं भरवावं, टॉयलेट ट्रेनिंग इ. अशाप्रकारे हळूहळू संपूर्ण तालुक्यातील पाडय़ावरच्या मुलापासून तर श्रीमंत घरातील मुलं आमच्या संपर्कात आलेली आहेत. काही पालक मुलांना घेऊन फिजिओथेरेपीसाठी शहराच्या ठिकाणी पैशाअभावी जाऊ शकत नाही त्यामुळे मी व माझ्या सहकार्‍यांनी मिळून पैसे जमा करून फिजिओथेरेपीचे बेसिक साहित्य बनवून घेतले आहे व तालुक्यावरच थेरेपी सेवा देण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठीची शिबिरंही भरवतो. याव्यतिरिक्त सुटीच्या वेळी मी नाशिकमध्ये असतो. ‘शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच’ सोबतही काम करतो. यामार्फत शिक्षणसंस्थामध्ये जी अनावश्यक फी वाढवली जात आहे त्याच्या विरोधात आम्ही पालकांना एकत्न करून आंदोलने उभारतो. या सगळ्यांमध्ये ‘निर्माण’ने माझं जगणं समृद्ध केलंय. मला जबरदस्त ऊर्जा दिली. निर्माणला येण्यापूर्वी मी कामात समाधान मिळत नसल्याने प्रचंड निराश झालो होतो. सर्व सरकारी कामे कागदोपत्नी फक्त पाटय़ा टाकावी तशी उरकली जातात म्हणून नोकरी सोडण्याचा जहाल विचार करत होतो; परंतु निर्माणने मला आहे त्या परिस्थितीत कसं दटून, नेटाने आणि आनंदाने काम करावे याची दृष्टी दिली. निर्माणमुळे मला माझ्या विचारांचे मित्न मिळाले. डॉ. अभय बंग (नायना), डॉ. राणी बंग (अम्मा) यांसारखे गुरु  मिळाले. मी स्वतर्‍ला नशीबवान समजतो. आज कामात आव्हानं खूप आहेत; पण लढण्याचा प्रखर आत्मविश्वासही आता सोबत आहे. 

(निर्माण 6)