ऑनलाइन शॉपिंग हे माहिती आहे का?

By Admin | Updated: July 24, 2014 19:11 IST2014-07-24T19:11:46+5:302014-07-24T19:11:46+5:30

एखादी वस्तू किंवा सेवा तुम्ही प्रत्यक्ष दुकानात न जाता, जुन्या पद्धतीनं प्रत्यक्ष माणसांना न भेटता तुमचा कॉम्प्युटर, मोबाइल वापरून इंटरनेटच्या माध्यमातून करता

Is it known online shopping? | ऑनलाइन शॉपिंग हे माहिती आहे का?

ऑनलाइन शॉपिंग हे माहिती आहे का?

>ऑनलाइन शॉपिंग म्हणजे काय?
एखादी वस्तू किंवा सेवा तुम्ही प्रत्यक्ष दुकानात न जाता, जुन्या पद्धतीनं प्रत्यक्ष माणसांना न भेटता तुमचा कॉम्प्युटर, मोबाइल वापरून इंटरनेटच्या माध्यमातून करता त्याला म्हणायचं ऑनलाइन शॉपिंग. दुकानात किंवा मॉलमध्ये जाण्यापेक्षा घरबसल्या आता जगभरातली माणसं असं इंटरनेटवरून शॉपिंग करू लागली. वेळ-पेट्रोल वाचतं, प्रत्यक्ष दुकानात जावं लागत नाही, व्हरायटी आणि ऑप्शन्स भरपूर, तुलनेनं दुकानापेक्षा स्वस्त असा एकूण अनुभव असल्यानं लोक आता इ शॉपिंग सहज करू लागलेत. गेल्या वर्षी ख्रिसमसमध्ये ऑनलाइन शॉपिंगद्वारे एकट्या अमेरिकेत २00 कोटी अमेरिकन डॉलर्सची उलाढाल झाली.
 
ऑनलाइन काय काय खरेदी करता येतं?
काय खरेदी करता येत नाही ते विचारा, लहान मुलांच्या डायपर्सपासून ते चमच्यापर्यंत आणि वस्तू, कपड्यांपासून ते इलेक्ट्रानिक्स वस्तू, म्हणजेच टीव्ही-फ्रीजपर्यंत काहीही विकत घेता येऊ शकतं. अर्थात अजूनही कुणी किराणा ऑनलाइन घेत नाही. जगभरात मुख्यत्वे आणि भारतात तर खासकरून सध्या ऑनलाइन रेल्वे, बस बुकिंग, सिनेमाची तिकिटंच ऑनलाइन खरेदी करतात. हॉटेल बुकिंग ऑनलाइन होतात, नोकर्‍यांसाठी माणसं शोधण्याचं काम तर आता मुख्यत्वे ऑनलाइनच होतं. म्हणजेच नुस्त्या वस्तूच नाहीत तर सेवाही ऑनलाइन खरेदी करता येतात.
 
ऑनलाइन शॉपिंग सुरू कधी, केव्हापासून झालं?
१९९९-२000 मध्ये इंटरनेटचं बूम आलं. जगभरातली माणसं इंटरनेट वापरू लागली. याच काळात जेफ बेझॉस यांनी एक ऑनलाइन बुकस्टोअर सुरू केलं. त्यांचंच नाव, अमेझॉन डॉट कॉम. जगातलं हे पहिलं असं स्टोअर होतं, जे प्रत्यक्षात नव्हतंच. फक्त ऑनलाइनच होतं. अमेझॉन जगभरात चटकन लोकप्रिय झालं. त्यांचं अनुकरण करत ज्यांची आधीपासून पुस्तकांची दुकानं होती त्यांनीही ऑनलाइन पुस्तकं विकायला सुरुवात केली.
त्यानंतर मग याहू, एमएसएन यासाठी पोर्टल्स सुरू झाली. आपल्याकडे रेडिफ डॉट कॉम. पुस्तकं ऑनलाइन घेण्यापासून झालेली सुरुवात आता फक्त ऑनलाइन शॉपिंगपर्यंत पोहचली आहे.
 
ऑनलाइन कशाची खरेदी-विक्री जास्त होते?
खरंतर प्रवासाचं प्लॅनिंग जगभरात आता ऑनलाइनच होतं. तिकिटं, हॉटेल्स हे सगळं ऑनलाइन बुक केलं जातं. भारतात सर्वाधिक ऑनलाइन व्यवहार इंडियन रेल्वेच्याच साइटवर केले जातात. आता एअर तिकिट्स, सिनेमाची तिकिटं. त्याशिवाय कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही ऑनलाइन खरेदी-विक्री जास्त प्रमाणात होत आहेत.
 
ऑनलाइन शॉपिंग का परवडतं?
एकतर ते फास्ट होतं, घरबसल्या होतं. तुलनेनं स्वस्त असतं कारण दुकानांसाठीची जागा, होलसेलर-रिटेलर या चेनमध्ये वस्तूची जी किंमत वाढते ती न वाढवता उत्पादक थेट ग्राहकाला वस्तू देतो, त्यामुळे फायदा दोघांचा होतो. वस्तू तुलनेनं स्वस्त मिळतात. रात्री बेरात्री वाट्टेल तेव्हा खरेदी करता येते, लोकांना शॉपिंग फ्रिडम ऑनलाइन शॉपिंगनं दिलंय.
 

Web Title: Is it known online shopping?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.