शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

रस्त्यावर उतरलेले इराणी तरुण म्हणतात, इनफ  इज  इनफ! आत आम्ही तयार आहोत मरायलाही, मारायलाही!

By meghana.dhoke | Published: December 19, 2019 7:50 AM

भुकेकंगाल तारुण्य जेव्हा सत्तेच्या बंदुकांसमोर उभं राहून म्हणतं, करा जे करायचं ते, आम्ही मागे हटणार नाही!

ठळक मुद्देहाताला काम, पोटात अन्न नसलेले तरुण रस्त्यांवर मारायला-मरायला तयार उभे आहेत.

मेघना  ढोके / कलीम  अजीम 

2009ची ही गोष्ट आहे. त्या काळच्या इराणमधल्या ग्रीन मुव्हमेंटच्या वेळची. हा किस्सा इराणमध्ये फार फेमस आहे आणि इंटरनेटच्या जगात तो कायम फिरत असतो.एक इराणी कमांडर त्याच्या सैनिकांना अगदी जाहीरपणे सांगत असतो की, घाबरू नका, ही रस्त्यावर उतरलेली पोरं, शहरी आहेत. पोटं भरलेली आहेत त्यांची, त्यांना आपण सहज दडपून टाकू; पण याद राखा, उद्या जर भुकेकंगाल, मागास भागातले, गरीब पोरं आपल्यासमोर उभे राहिले आणि असा मोर्चा अनवाणीच घेऊन आले, तर आपली खैर नाही..इराणी कमांडरचे हे शब्द आज शब्दशर्‍ खरे झाले आहेत. त्याची भीतीही खरीच ठरली आहे, कारण तो दिवस उजाडलाच जेव्हा हातावर पोट असलेले आणि त्या पोटात भुकेची आग असलेले अगदी विशी-पंचविशीतले तरुण सत्तेसमोर उभे राहिले. ज्या देशात कुठलंही आंदोलन करायलाच बंदी आहे, त्या देशातलं तारुण्य सरकारच्या बंदुकांसमोर उभं ठाकलं आहे.मोनिका नावाचं एक ट्विटरवरचं इराणी हॅण्डल आहे, त्या हॅण्डलवरचं एक ट्विट इराणी तारुण्याची आजची मानसिकता सांगतं आहे. तरुणांच्या आक्रोशाची एक भयंकर क्लिप दाखवत हे हॅण्डल म्हणतं, ‘40 वर्षे झाली, आम्ही जे भोगलं ते भोगलं. इनफ इज इनफ. आता आम्ही तुमच्या शस्त्रास्त्रांना, बंदुकांना घाबरत नाही. आम्हाला आमचा हक्काचा इराण हवाय, करा तुम्हाला करायचं ते करा, आम्ही मागे हटणार नाही.’इराणमध्ये इंधन दरवाढ करण्यात आली. पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या म्हणून नोव्हेंबरमध्ये हे आंदोलन सुरू झालं. तरुण मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरले; पण हे आंदोलन फक्त इंधनवाढ झाली म्हणून झालं नाही, त्याच्या पोटात आधीपासूनचा असंतोष खदखद आहेच. इराणमध्ये पेट्रोल दरवाढ मोठय़ा प्रमाणात करण्यात आली. सामान्य तरुण इराणीचं पोट या पेट्रोलच्या व्यवसायावर चालतं. तीच त्यांची जगण्यासाठीची आवश्यक गोष्ट आहे. मात्र तीच दरवाढ झाल्यानं असंतोषाचा भडका उडाला. आणि पोलीस, मिल्ट्री, पॅरामिल्ट्रीवाले रस्त्यांवर शस्त्रसज्ज असताना तरुण रस्त्यांवर आले. प्रत्येक शहरातल्या मोठय़ा शहरांत तरुणांनी आंदोलन सुरू केलं. इराणी सरकारने आंदोलकांवर गोळ्या झाडून दहशत निर्माण केली.  त्या चकमकीत 208 लोकांचा मृत्यू झाला आहे. सात हजार आंदोलकांना सरकारने अटक केली आहे. 

इराकमध्ये सुरू असलेल्या लोकशाही समर्थक आंदोलनाचे पडसाद इराणमध्ये उमटले. इंधन दरवाढ आंदोलनाचे निमित्त ठरलं. इराणी जनतेचा अनेक वर्षापासून साठलेला आक्रोश बाहेर पडला. तज्ज्ञांच्या मते 1978 साली झालेल्या इस्लामिक क्र ांतीनंतर प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात आंदोलन पेटलं आहे. इराणचे सर्वेसर्वा खोमेनी सांगत आहेत की, या सार्‍यात परकीय शक्तींचा हात आहे. मात्र तरीही त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. दुसरीकडे गृहमंत्नी अब्दुलरेझा रेहमानी सांगतात की, 2 लाख लोकांनी सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेतला. आंदोलकांनी  700 बँका, 70 पेट्रोलपंप आणि 140 सरकारी कार्यालयांना आग लावली. तसं पाहता इराण हा जगातील सर्वात मोठा पेट्रोल उत्पादक देश मानला जातो. अन्य देशाच्या तुलनेत इथे सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. पण त्याच्याच किमती वाढल्यानं, त्या व्यवसायावर ज्यांचं पोट आहे, ते तारुण्य भडकलं. मुळात हा सगळाच कष्टकरी वर्ग, त्यांच्या पोटापाण्याचाच प्रश्न निर्माण झाला तेव्हा तो रस्त्यावर आला.  इराणच्या सुमारे 100 शहरांत सरकारविरोधात जनाआंदोलनं सुरू आहेत. एकतर इराण सरकारने पेट्रोलच्या किमती 50 टक्क्यांनी वाढवल्या. पेट्रोलवरची सबसिडी पूर्णपणे बंद केली. शिवाय पेट्रोलच्या अतिरिक्त वापरावर र्निबध घातले. पेट्रोलची वितरण व्यवस्था रेशनिंगद्वारे सुरू केली. आता नागरिकांना महिन्याला केवळ 60 लिटर पेट्रोल खरेदी करता येणार आहे. यापेक्षा जास्त हवं असेल तर त्यासाठी लिटरला दुप्पट रक्कम मोजावी लागेल.त्यातून हे आंदोलन भडकलं. आंदोलनाची दाहकता ओळखून सरकारने इंटरनेट बंद केलं. नेट बंद असल्याने एकाही विद्याथ्र्याला परीक्षा अर्ज भरता आले नाहीत. परिणामी शाळा, कॉलेज, विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. देशभरात इंटरनेट शटडाउन अजूनही आहे. इराणी सरकार म्हणतंय की, काही गुंड मुलं हे सारं करत आहेत. हे आंदोलन मूठभर गुंडांचं आहे असं दाखवण्यासाठी शाळा-कॉलेज बंद करून बाकीच्या मुलांना  घरात डांबलं जात आहे. जगाशी संपर्क तोडण्यात आलाय. मात्र त्यातून तरुणांची नाराजी इतकी वाढली की, त्यांनी हातात शस्त्न घेतलं. जाळपोळ व नासधूस सुरू केली.  गेल्या वर्षी मे महिन्यापासून अमेरिकेने इराणवर अनेक आर्थिक र्निबध लादले आहेत. परिणामी देशातील अर्थव्यवस्थेवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. मूलभूत वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. आयात बंद झाल्याने देशात गरजेच्या वस्तू बाजारातून हळूहळू गायब होत आहेत. आणि हाताला काम, पोटात अन्न नसलेले तरुण रस्त्यांवर मारायला-मरायला तयार उभे आहेत.