चीननंतर इटली, अमेरिका आणि इराण हे सर्वाधिक बाधित देश. इराणचं हे संकट दुहेरी आहे. एकीकडे अमेरिकेचे आर्थिक र्निबध, तर दुसरीकडे देशातील अंतर्गत कलह, रोगराईवर नियंत्नण आणण्यास अडसर ठरत आहे. इराणच्या तारुण्याचं जगणं त्यामुळे पणाला लागलं आहे. ट्विटरचा फेरफटका मारला तर त्यांचा व्यवस्थेवरचा राग दिसून येतो. तसं पाहिलं तर सरकारविरोधात बोलण्याच्या अधिकार कुठल्याही नागरिकाला सरकारनं दिलेला नाही. तसं केल्यास कडक कायद्याचा फास आहेच. पण मध्य-आशियातील काही वेबसाइट्सवर अज्ञात नावाने अशा प्रतिक्रि या सर्रास पहायला मिळता आहेत. त्यातून इराणमध्ये नक्की काय घडतंय, याचा अंदाज येणं शक्य आहे.फेब्रुवारीत कोम शहरातून पहिला ‘पेशंट ङिारो’ दिसला म्हणजे कोरोनाची लागण झाली. त्याचकाळात इराणमध्ये एक धार्मिक संमेलन झालं, त्यातूनही प्रसार वाढला असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते.बघता बघता केवळ 16 दिवसात कोविड-19 इराणच्या सर्व 31 राज्यात पसरला. इतकं होऊनदेखील सरकारकडून पुरेशा उपाययोजना राबविल्या गेल्या नाहीत. प्रार्थनास्थळे, मॉल्स, व्यापारी बाजारपेठा सुरूच होत्या.राष्ट्रव्यापी लॉकडाउन सुरू व्हायला 11 एप्रिल उजाडावं लागलं. तोर्पयत इराणमध्ये सर्वत्न हाहाकार माजला होता. इराणमध्ये 6,2क्3 पेक्षा अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती हा लेख लिहिताना दिसत होती.4 मेस सरकारने गेल्या तीन दिवसापासून नव्या पेशंटची नोंद झाली नसल्याचे सांगत लॉकडाउनची सवलत जाहीर केली. धार्मिक स्थळं खुली केली. मात्र परिस्थिती भयान असताना सरकारने घेतलेला निर्णय बहुतेक इराणीयन लोकांना आवडला नाही. काही अपवाद वगळता, अनेकांनी नाराजी व्यक्त केली; पण त्यांचं ऐकून घ्यायची कुणी तसदी घेतली नाही.दुसरीकडे 2क्17 साली इराण ठरल्याप्रमाणो न्यूक्लिअर कार्यक्रम रोखत नसल्याचा आरोप करत अमेरिकेने इराणवर प्रतिबंध लादले. आता अमेरिकेच्या भीतीपोटी कुठलाच देश इराणला कोरोना रोगराईच्या काळात मदत करत नाहीये. पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक र्निबधामुळे इराणची चहुबाजूंनी कोंडी झाली. इराणनं आंतरराष्ट्रीय नाणोनिधीला आपत्कालीन निधीसाठी पाच अब्ज डॉलर्सची मागणी केली. परंतु या विनंतीचा पाठपुरावा झाला नाही. गेल्या महिन्यात रशियाकडून थोडीसी मदत मिळाली होती. हे सारं असताना इराणमधलं तारुण्यही हतबल आहे.फेब्रुवारीत इराणनं क्र ांतीचे 4क् वर्षे पूर्ण केली. गेल्या चार दशकपासून दोन पिढय़ा या क्र ांतीत बीज रुपाने उगवल्या. पहिली पिढी धाक आणि परंपरावाद्याच्या सावटाखाली वाढली. परंतु जागतिकीकरणाची थेट लाभार्थी झाल्याने तिला आर्थिक बलदंडता लाभली.दुस:या पिढीनं तंत्नज्ञानाच्या कुशीत डोळे उघडले. वयात येताना नवे प्रश्न, नवी आव्हानं आणि नवा देश त्यांच्यासमोर उभा होता.या चार दशकात जगभरात परिस्थिती कमालीची बदलली. तंत्नज्ञान व माहितीच्या अवाढव्य स्वरूपाने जगाला बदलण्यास भाग पाडलं. उद्योग, शिक्षण, रोजगाराची साधने विकसित झाली. जगभरात तंत्नज्ञानावर आधारित नवीन प्रणाली अस्तित्वात आली. देशा-देशात लोकशाही शासन प्रणाली अमलात आली.
कलीम अजीम(लेखक मुक्त पत्रकार आहेत)