शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

इंटिमेट थिएटर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:01 AM

कलाकार नाटक सादर करतात, प्रेक्षक फक्त ४ किंवा ५. कलाकार नाटक करताना जागा बदलतात तसे प्रेक्षकही बदलतात. आणि त्यातून साकारतो एक इंटिमेट अनुभव

पुण्यातील तरुण दिग्दर्शक - कलाकार करत असलेल्या इंटिमेट नाटकाच्या प्रयोगाविषयी

थिएटर फ्लेमिंगो. ही कम्युनिटी गेल्या दीड वर्षापासून थिएटर मीडिअममध्ये कार्यरत आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राच्या २०१७च्या बॅचचे पासआउट विद्यार्थी विनायक कोळवणकर आणि केतन जाधव यांनी याची सुरु वात केली. ललित कला केंद्रात शिकत असताना आम्ही इंटिमेट थिएटरचे प्रयोग करत होते. त्यावेळी विलास सारंग यांची एक कथा आम्ही प्रत्यक्ष लोकेशनवर करून पाहिली. तो एक इंटिमेट थिएटरचाच प्रयोग होता. त्यातून मग मनात यायला लागलं की, थिएटर या माध्यमाला अपग्रेड कसं करता येईल, नवीन पिढी या माध्यमाकडे कशी वळवता येईल, आजच्या पिढीचं थिएटर कल्चर कसं बिल्ड करता येईल या गोष्टींचा अभ्यास ‘थिएटर फ्लेमिंगो’ करत आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात आम्ही अनेक लहान-मोठे प्रयोग करून पाहिले.जसं की, ट्रॅव्हलिंग थिएटर. या संकल्पनेद्वारे महाराष्ट्रातल्या छोट्या खेड्यापाड्यात जाऊन तिथं नाटकाचे प्रयोग केले. तिथल्या जाणिवा समजून घेणं ही त्यामागची एक भावना. ते करताना आम्ही गावातल्याच अनेक जागा एक्सप्लोअर केल्या. नदी, एखादा वाडा अशा गोष्टी पाहून तिथं नाटक केलं. हाही इंटिमेट थिएटरचाच एक प्रयोग. ‘घर-घर नाटक’ ही यातील दुसरी संकल्पना. या फॉर्मद्वारे थेट प्रेक्षकांच्या घरी जाऊन नाटक करण्याचा हा एक प्रयोग केला. आसाराम लोमटेलिखित ओझं या कथेचं नाट्य सादरीकरण आम्ही असं वेगळ्या जागा एक्सप्लोअर केल्या. त्याच बरोबर चित्रकथी या लोककलेमार्फत गिरीश कर्नाड यांच्या हयवदन या नाटकावरून प्रेरित एक नाट्यप्रयोगही सादर केला जातो.हे सारे इंटिमेट थिएटरचेच प्रयोग.आता आम्ही त्याच्या पुढच्या लेव्हलचा एक प्रयोग करतो आहोत. फाईव्हडी झोन या अंतर्गत एका बंगल्यात "फीं िेी ्रल्ल 5ऊ ९ङ्मल्ली" हा नाट्यप्रयोग आम्ही सध्या करतोय. हा एक प्रयोग आहे. आम्हीही प्रयोगच करून पाहतोय. मात्र हा फॉर्म इमरसिव्ह थिएटरच्या जवळ जाणारा आहे. या प्रकाराचं वैशिष्ट्ये म्हणजे एका जागेत नाटक घडत नाही, कलाकार जागा बदलतात तसे प्रेक्षकही जागा बदलतात. हा नाट्यप्रयोग एका वेळी फक्त ४ ते ५ लोकच बघू शकतात. बंगल्यातल्या वेगवेगळ्या स्पेसेस मध्ये सिन्स घडतात आणि एक इण्टेन्स अनुभव प्रेक्षकांना मिळत राहतो. जसं नाटक पुढं जातं त्याप्रकारे त्यासोबत प्रेक्षकही आपली जागा बदलत राहतात. सध्या या मोड्युलचं आम्ही पुण्यात टेस्टिंग सुरू केलं आहे. लवकरच त्याचे प्रयोग प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येतील.हा प्रयोग करताना सिन्सच्या जागा बदलतात, कलाकारांच्या, प्रेक्षकांच्याही जागा बदलतात हे तर आहेच. मात्र हा प्रयोग इंटिमेटही आहे. नाटकाचं कथानक सांगताना, नाटक सादर करताना कलाकार थेट प्रेक्षकाच्या डोळ्यात पाहू शकतो. प्रेक्षकांचा श्वास, त्या श्वासाची लय आपल्या श्वासाशी मॅच करू शकतो इतका हा प्रयोग वेगळा जाणवतो. आपण लहान मुलाला गोष्ट सांगतो तितका थेट. समोर कॅमेरे नसतात तर प्रेक्षकांचे डोळे हेच कॅमेरे असतात. प्रेक्षकांच्या भावना, चेहऱ्यावरचे चढउतार कलाकार अनुभव शकतो. अगदी लहान-सहान तपशील जाणवू शकतात. कलाकार आणि प्रेक्षक एका भावनेनं परस्परांशी कनेक्ट होतात. म्हणजे पहा आपण एखाद्या डोंगराखाली उभे राहिलो आणि एकदम धबधबा बरसायला लागला तर कसं वाटेल तसं हा प्रयोग पाहताना वाटू शकतं. प्रेक्षकांचा श्वास, त्याच्या मानेवरून निथळत जाणारा घामाचा थेंबही कलाकाराला जाणवू शकतो. गेले ५-६ महिने आम्ही या प्रकारावर काम करत होते. गंमत म्हणजे प्रत्यक्ष नाटक उभं केलं ते फक्त १२ दिवसांत. आधी म्हटलं तसं हा एक प्रयोग मोड्युल म्हणून आम्ही करतोय. सध्या नाटकातील जाणकारांना दाखवून त्यांच्या सूचनांचाही विचार करतो आहोत. जून-जुलैच्या दरम्यान हा प्रयोग सर्वांसाठी खुला करण्याचा विचार आहे.त्याबरोबरच थिएटर फ्लेमिंगोचे इतरही काही उपक्रम करत आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘घुमच्ये कट्टर थिएटर’. या प्रोजेक्टची गोव्यात सुरु वात केली गेलेली आहे. त्याविषयी लवकरच अधिक तपशील सांगता येईल. तो सोशल मीडियात उपलब्ध करून देण्याचा विचार आहेच. त्याच बरोबर ‘एपिसोडिक थिएटर’ हा नावीन्यपूर्ण प्रकार व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याचाही आमचा विचार आहे.महत्त्वाची गोष्ट अशी की, थिएटर फ्लेमिंगो मुंबई, गोवा, पुणे, देवगड या ठिकाणांमध्ये थिएटर स्टेशन्स उभं करण्यात यशस्वी झालेले आहे. येत्या काळात संपूर्ण महाराष्ट्रातच थिएटर स्टेशन्स उभी करण्याचं उद्दिष्ट आहे. या इंटिमेट प्रयोगाला प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचाही आम्ही प्रयोग करत आहोत..- विनायक कोळवणकर/ अक्षयकुमार मांडे(थिएटर फ्लेमिंगो या उपक्रमांतर्गत इंटिमेट नाटकाचे प्रयोग करणारे दिग्दर्शक/कलाकार akshaymande6123@gmail.com)

टॅग्स :Theatreनाटक