शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

आंतरराष्ट्रीय नृत्य दिन- बेली डान्सर पिया भुर्केशी खास गप्पा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 7:30 AM

बेली डान्स. एक वेगळाच नृत्यप्रकार तरुणांच्या जगात आकर्षणाचं कारण ठरतोय. सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल होतात. आणि आता तर बेली डान्सचे खास डान्स स्टुडिओही उभे राहिलेत. त्या नजाकतदार नृत्याविषयी.

ठळक मुद्दे एवढी नजाकत, लवचिक शरीर आणि इतक्या देखणा पदन्यास हे सारं या मुलींना कसं काय जमतं?..

- भक्ती सोमण

रिअ‍ॅलिटी डान्स शो आणि सोशल मीडियात आपण हल्ली वारंवार हा नृत्यप्रकार पाहतो. चकीत होतो अनेकदा की ही एवढी नजाकत, लवचिक शरीर आणि इतक्या देखणा पदन्यास हे सारं या मुलींना कसं काय जमतं?..बेली डान्सर म्हणता त्यांना. आणि ते नृत्य म्हणजेच बेली डान्स. ते पाहताना हरखून जायला होतं. आपल्याकडचा नसलेला आणि पारंपरिक नृत्यप्रकारांपेक्षा वेगळा नृत्यप्रकार नक्की कसा असतो हे समजून घ्यायचं म्हणून मुंबईत बेली डान्सर्सनाच शोधायचं ठरवलं. आणि भेटली पिया भुर्के. तिचा बेली डान्सचा व्हिडीओ अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपवरही जोरदार व्हायरल झालेला आहे. मुंबईत बेली डान्सचं पॅशन जपणार्‍या पियाला भेटायचं ठरवलं.आणि भेट ठरली तिच्या पाल्र्यातल्या डान्स स्टुडिओत. आताशा डान्स स्टुडिओ असतातच, विशेषतर्‍ वेस्टर्न नृत्यप्रकारांचे डान्स स्टुडिओ सध्या चांगलेच प्रचलित झालेत. मात्र बेली डान्ससाठीचाही स्टुडिओ आहे हे पाहून जरा क्षणभर आश्चर्य वाटलंच.पाल्र्यातल्या ‘स्वे डान्स’ या स्टुडिओत आम्ही भेटलो.स्टुडिओत पाऊल ठेवताच कानावर पडलं मराठी गाणं. अप्सरा आलीùùù.बेली स्टुडिओ, बेली डान्स आणि मराठी गाणं, तेही काहीसं लावणीच्या वळणाचं आणि समोर पिया आणि तिच्या मैत्रिणी त्यावर बेली डान्स करत होत्या. छान गिरक्या घेत होत्या. मध्येच कंबरेची हालचाल, हाताच्या विशिष्ट हालचाली आणि पोटाच्या हालचाली करत त्यांचं नृत्य रंगत होतं. त्यांनी पोटावर लावलेल्या कॉइन बेल्टमुळे र्‍िहदमची वेगळीच मजा येत होती. त्या नृत्यातून थोडा ब्रेक घेत पियाने बेली डान्सविषयी माहिती दिली. आणि अनेक गोष्टी उलगडल्या.पिया सांगत होती, 100 वर्षाहून अधिक दीर्घ परंपरा असलेल्या या डान्सचं मूळ मध्यपूर्वेकडच्या देशात सापडते. त्याकाळी हे नृत्य विशेषतर्‍ बायकांच्या करमणुकीचं साधन होतं. त्यासाठीच ते केलं जायचं. पोटाच्या हालचालींमुळे गर्भवती ियांना त्याचा लाभ होऊ शकतो असंही म्हणतात. आपल्या शरीराचे अवयव एका लयीत हलवण्यासाठी आयसोलेशन (मेहनत घ्यायचा दृष्टिकोन) आणि माइंड बॉडी को-ऑर्डिनेशन अर्थात मन आणि शरीराचा संवाद आणि परस्पर साथ यांचा तोल सांभाळावा आणि साधावा लागतो. सरावानं हळूहळू मन आणि शरीराचा मेळ साधला जातो.’मात्र हा सराव पियाचा कसा सुरू झाला, तू कशी काय एकदम बेली डान्सकडे वळली असं विचारलं, तर पिया सांगते,  मी दहावीच्या सुटीत प्रीती कोचर यांच्याकडे बेली डान्स शिकायला सुरुवात केली. त्याआधी मी भरतनाटय़म शिकत होते. बेली डान्स शिकायला सुरुवात केली, ते मला आवडू लागलं. मग बारावीलाच असताना मी प्रीतीजींना असिस्ट करू लागले. त्यानंतर बीए करत असताना विविध डान्स स्टुडिओंमध्ये जाऊन बेली डान्स शिकवायला लागले. त्यावेळी यंगेस्ट बेली डान्सर म्हणून मला ओळखही मिळाली होती. दीपाली विचारे, भार्गवी चिरमुले, प्रिया बापट, सुकन्या काळण यांनाही काहीकाळ मी बेली डान्सचे धडे शिकवले. त्यातून मग पुढे हा स्टुडिओ सुरू केला. मेहनत घ्यायची तयारी असेल तर कुठल्याही वयात हा डान्स आपल्याला नक्की शिकता येतो.’ आत पिया तिच्या स्टुडिओत बिगनर्स, इंटरमिजिएट, अ‍ॅडव्हान्स या 3 कॅॅटेगरीत 10 लेव्हल शिकवते आहे. काही गर्भवती ियांनाही तिनं हा डान्स शिकवला आहे. अर्थात, अजूनही बेली डान्स शिकणार्‍या मुलींची संख्या कमीच. कारण पालक काही हे नृत्य शिकण्याची परवानगी सहजी देत नाहीत असं पियाचं निरीक्षण आहे. हळूहळू बदलतोय दृष्टिकोन. कारण या नृत्यात विचित्र असं काहीच नाही. हे नृत्य अत्यंत ग्रेसफुल असतं. आणि अधिकाधिक मेहनतीनं सराव करून तो जास्त चांगला करता येतो, असंही ती सांगते. 

***

पोशाखाला आक्षेप का?

बेली डान्सर्सना डान्स करताना पोट दाखवण्याची गरज असते का? तसंच त्यांना शरीराचे विविध भाग दिसतील असे कपडे का घालावे लागतात,असे प्रश्न नेहमीच विचारले जातात, त्याविषयी पिया सांगते. बेली नृत्य करताना पोटाच्या मुव्हमेंट या महत्त्वाच्या समजल्या जातात. त्यामुळे ज्या मुव्हमेंट करायच्या आहेत ते दाखवण्यासाठी पोट दाखवण्याची गरज असतेच. म्हणून बेली डार्न्‍सरचा ड्रेस हा असा असतो. शिवाय हाताच्या हालचाली करताना घट्ट कपडे वापरून चालणार नाहीतच. म्हणून त्या नृत्याला साजेसे असे कपडे घालावे लागतात.

बेली डान्सचे मुख्य प्रकारया नृत्यात इजिप्तिशियन प्रकार हा ऑथेंटिक समजला जातो. त्यानंतर बेलरी, शाबी, ट्रायबल, ओरिएंटल, अमेरिकन ट्रायबल स्टाइल असे 6 प्रकार सध्या लोकप्रिय आहेत. प्रत्येक पाश्चिमात्त्य देशाने या डान्समध्ये वेगळी स्टाइल आणली आणि तो आणखी कसा लोकप्रिय होईल याकडे लक्ष दिले. मात्र असे असले तरी इजिप्तिशियन प्रकार हा खूप महत्त्वाचा आहे.