शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रचारादरम्यान मर्यादांचे उल्लंघन, सरसंघचालकांनी टोचले राजकीय नेत्यांचे कान...
2
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कोणते खाते?; मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसेंवर मोठी जबाबदारी
3
नवीन सरकारमध्येही PM मोदींची कोअर टीम कायम; देशाची सुरक्षा 'या' मंत्र्यांच्या खांद्यावर...
4
SA vs BAN Live : वर्ल्ड कपमध्ये चाललंय काय? बांगलादेशसमोर आफ्रिकेची ट्वेंटी-२० मध्ये 'कसोटी'
5
Rohit Pawar : "८५ वर्षीय शरद पवारांना, ८५ आमदारांचं गिफ्ट देऊ"; वर्धापनदिनाच्या भाषणात रोहित पवारांनी आकडाच सांगितला
6
नरेंद्र मोदींकडे कुठली खाती, देशाचे कृषी मंत्री कोण?; खातेवाटप जाहीर, वाचा संपूर्ण यादी
7
PHOTOS : विराट कोहलीला प्रपोज करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचं गर्लफ्रेंडसोबत लग्न
8
मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर; गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र, महामार्ग अन् रेल्वे मंत्रालय भाजपकडे...
9
Ajit Pawar : वर्धापन कार्यक्रमात अजितदादा शरद पवारांचे नाव घेऊन भावुक; म्हणाले, "२४ वर्ष साहेबांनी पक्षाचं...",
10
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मोठा निर्णय; ३ कोटी लोकांना होणार फायदा
11
काहीजण संपर्कात, योग्यवेळी आमच्यासोबत येतील; जयंत पाटलांचा अजित पवार गटाला सूचक इशारा
12
टीम इंडिया पाकिस्तानात जाणार? पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ICC कडे सोपवले वेळापत्रक
13
भाजपा मोठा भाऊ मान्य, पण शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हाला मिळाव्यात - छगन भुजबळ
14
आमचे 7 खासदार असूनही आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद का नाही? शिंदे गटाने जाहीर केली नाराजी...
15
"आमचे १०५ आमदार तरीही शिंदे मुख्यमंत्री झालेत"; श्रीरंग बारणेंच्या विधानावर भाजपा संतप्त
16
अम्पायरशी भिडणं Matthew Wade च्या अंगलट; ऑस्ट्रेलियन खेळाडूला ICC चा सज्जड दम
17
२८८ मतदारसंघात ताकदीने कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे आमदार, खासदारांसह पदाधिकाऱ्यांना आदेश
18
"पक्षाचा आदेश पाळावाच लागणार"; अजितदादांसमोर सुनिल तटकरेंनी मुंडे, मुश्रीफ सगळ्यांनाच सुनावलं
19
भारत-पाक सामन्यानंतर MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन; देवेंद्र फडणवीसांशी होतं जवळचं नातं
20
... तर विधानसभेला काँग्रेसचे सगळे उमेदवार पाडणार; मनोज जरांगे का संतापले?

घुसमट... शिक्षणासाठी वणवण करताना आलेला एक अस्वस्थ अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 2:38 PM

शिक्षणासाठी वणवण करताना आलेला एक अस्वस्थ अनुभव

- माधुरी पेठकरमुलाखत आणि शब्दांकन

शिकायचं तर पैसा नाही, आपली गुणवत्ता हीच आपली ताकद याची जाणीव अगदी लहानपणीच झालेला भारतभूषण पंडित. सध्याही दिवसातला निम्मावेळ तो विद्यार्थी असतो आणि निम्मावेळ शिक्षक. जेनेटिक्स विषयात त्यानं एमएससी केलंय आणि गेल्या पाच वर्षांपासून तो ‘डाळिंब पिकावरील तेल्या रोग्यावर नियंत्रण’ या विषयावर संशोधन करतोय. त्याला यूजीसीनं पीएच.डी.साठी दिलेला सहा वर्षांचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी पीएच.डी.चं काम पूर्ण झालं तर नोकरीत कायम व्हायला मदत होईल या अपेक्षेनं तो धडपड करतो आहे.गुणवत्ता आणि इच्छा असूनही केवळ आर्थिक सहाय्य नाही या कारणानं संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात नाउमेद होण्याचा, मागे राहण्याचा अनुभव आपल्यासारख्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना नाउमेद करतो याची त्याला खंत आहे. तो म्हणतो, समाजाच्या लेखी शिक्षणातली अडचण ही प्राथमिक शिक्षणापर्यंतच सीमित राहिली आहे. शाळाप्रवेश, शालेय साहित्य खरेदी, येण्या-जाण्याच्या समस्या, वाचनलेखन अडथळे म्हणजे फक्त शैक्षणिक अडचणी नसतात. उच्चशिक्षण घेतानाही विद्यार्थ्यांपुढे अनंत अडचणी असतात. केवळ पुरेशा अर्थपुरवठ्याअभावी गुणवंत विद्यार्थ्यांना जे ठरवलं त्यापेक्षा वेगळं करावं लागतं किंवा जे ठरवलं आहे ते करण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. हे बदललं पाहिजे.!’भाजीपाला आणि फळं विकून कमावलेल्या पैशातून त्यानं आजवर शिक्षण सावरलं. अर्धवेळ नोकरी सुरू केली. अवघ्या काही गुणांनी त्याची फेलोशिप हुकली. तो सांगतो, ‘आडनावाच्या, जातीच्या विशिष्ट चष्म्यातूनच समाज प्रत्येकाकडे पाहतो. यामुळेही गरजवंताची गरजच कोणाला लक्षात येत नाही. दुसरं कारण म्हणजे शिष्यवृत्ती मिळण्यातल्या, योग्यवेळी मिळण्यातल्या अडचणी. त्याचे नियम. त्यामुळे पोटाला चिमटा देत, हजारो खटाटोपी करत अभ्यासासाठी तडफड करावी लागते. अनेकदा तर ज्यांना शिष्यवृत्ती मिळते ते त्याचा वापर भलत्याच गोष्टींसाठी करतात, हे पाहून जीव अजून तळमळतो. व्यवस्थेत चालणाºया चिरीमिरी व्यवहारांचे फटकेही बसतात. हे सारं मला समाजासमोर मांडायचं होतं.’ते त्यानं मांडलं एका शॉर्ट फिल्मद्वारे. तिचं नाव घुसमट. एकट्यानं ओरडून, पोटतिडकीनं मांडून समाज, व्यवस्था बदलत नाही हे माहीत असूनही मनातलं पोहचविण्याची जिद्द मला शांत बसू देत नव्हती. म्हणून हे माध्यम मला फार महत्त्वाचं वाटतं असं भारतभूषण सांगतो. आर्थिक चणचण होतीच; पण औरंगाबादमधल्य त्याच्या चार- दोन मित्रांनी साथ दिली. कलाकारांसकट कॅमेरा चालवणाºयांपर्यंत सगळ्यांनी फुकट कामं केली. फक्त कॅमेरा भाड्याचा असल्यानं त्याचे पैसे द्यावे लागले. पण कॅमेरा चार्जेसही कमी व्हावेत म्हणून ४२ तासात सगळं शूट संपवलं.त्यातून साडेपंधरा मिनिटांची ही फिल्म तयार झाली. अनेक स्थानिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखवली गेली. तिचं कौतुक होत आहे. भारतभूषण म्हणतो, ‘प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये या घुसमटीत जगणारे अनेकजण असतात. त्यांची कथा मी मांडली याचं समाधान आहे.’ही फिल्म पाहा, आपलंच जगणं जेव्हा कुणी सांगतं तेव्हा ते कसं भिडतं याचा हा अनुभव आहे.

घुसमट फिल्म पाहण्यासाठी ही लिंक..https://drive.google.com/file/d/0B7Az28kp4349WjNSNERLSEI2Wjg/view

टॅग्स :educationशैक्षणिक