आयआयटीतून थेट खेडय़ात

By Admin | Updated: May 21, 2015 19:53 IST2015-05-21T19:53:50+5:302015-05-21T19:53:50+5:30

इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग

From the IIT, live in the village | आयआयटीतून थेट खेडय़ात

आयआयटीतून थेट खेडय़ात

खेडय़ात काय ठेवलंय?
- नुस्ता अंधार!!
त्यापेक्षा शहरं बरी! 
‘कितीही झाला कहर तरी सोडू नये शहर!’
- अशी म्हण का उगाच पडली असेल? शिक्षण संपलं किंवा शिकायलाच जे शहरात जायचं ते परत खेडय़ात यायचंच नाही, सटीसहामाशी जत्रेला, दिवाळीला यायचं आणि एरव्ही किती सुंदर ते घर कौलारू याचे कढ काढत बसायचे.
- अशा मानसिकतेत काही पिढय़ा जगल्याच! आजची तरुण पिढीही त्याला अपवाद नाही, उलट आता तर कुणालाच खेडय़ात रहायचं नाही, सगळे शहरात निघालेत अशीच स्थिती!
शहरात काही हजारो रुपयांच्या नोक:या नाहीत की जगण्याची सारी सुखं नाहीत. दहा बाय दहाची खोकडी घरं आणि गर्दीतले धक्के, अवास्तव स्पर्धा यासा:यात श्वास गुदमरून घ्यायचा. पण रहायचं शहरातच आणि म्हणायचं खेडय़ात काही पर्यायच नाहीत!
पण,
हे पर्याय शोधायचे कुणी?
- कारण शोधलं 
तर पर्याय आहेत!
आणि ते इतके दमदार आहेत की,आपल्याच नाही तर इतर अनेक माणसांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देता येऊ शकतात! आणि हे केवळ स्वप्नरंजन नव्हे तर नवं कार्पोरेट जग आणि मल्टिनॅशनल कंपन्या भारतीय ग्रामीण भागाकडे ‘ह्यूज पोटेन्शियल’ म्हणून पाहत आहेत. शाश्वत आणि समविकासाच्या कल्पनेत आता ग्रामीण भागातच नवे उद्योग व्यवसाय सुरू करायला भारत सरकारही चालना देत आहे. कार्पोरेटवाले तर मोठी संधी सापडल्यासारखे शहरांकडून ग्रामीण भागाकडे निघायच्या तयारीत आहेत!
कारण या सा:याच्या मुळाशी आहे एक नवं क्षेत्र, ज्याचं नाव आहे, डेव्हलपमेण्ट सेक्टर!
आणि त्या सेक्टरमधला एक नवाच घटक आहे, ग्रामीण उद्योजकता. सामाजिक उद्योगांनी सुरू झालेला हा प्रवास आता ग्रामीण उद्योगांर्पयत येऊन पोहोचला आहे आणि मुख्य म्हणजे तो पूर्णत: प्रोफेशनल होतो आहे. वाटलं म्हणून जमवलं भांडवल आणि केला एखादा लघु उद्योग सुरू, इतकी ही कल्पना भाबडी नाही. उलट उद्योजकतेचं पूर्ण प्रोफेशनल ट्रेनिंग घेऊन ग्रामीण भागात उद्योग सुरू करण्याचं हे एक नवीन करिअरच उदयास येत आहे.
आणि त्या वाटेवर आजतरी काही तरुण स्वत:हून आपलं ग्रामीण उद्योजकतेचं करिअर घडवायला निघाले आहेत.
ग्रामीण भागात ज्याची पायाभरणी होते आहे आणि ग्रामीण उद्योजकता म्हणून जे नवीन क्षेत्र आकार घेतंय त्याचीच ओळख या अंकात आपण करून घेतो आहोत.
मात्र हे नक्की देशभरातल्या नामांकित आयआयटी ते केंद्र सरकार या सर्व टॉपमोस्ट टप्प्यात ग्रामीण भागात जाऊन उद्योग करणं आणि देशात नव्यानं उद्योगांची पायाभरणी करणं, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

 

Web Title: From the IIT, live in the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.