शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

AI ने उद्या आपल्या अ‍ॅडमिशनचा फॉर्मही भरुन दिला तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 3:41 PM

एकीकडे मुलांना 100 टक्के मार्क पडू लागलेत, दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेलाही मात देते आहे. हे नक्की आहे काय?

- डॉ. भूषण केळकर

हा लेख तुम्ही वाचाल तेव्हा 10-12चे निकाल जाहीर झालेले असतील. परीक्षेचा निकाल, त्यानंतरची ऑनलाइन फॉर्म भरण्याची - कॉलेज निवडण्याची प्रक्रिया, हे सारं मेंदूला झिणझिण्या आणणारी असतं हे मला स्वानुभवावरून माहिती आहे. त्यातून तुम्ही एव्हाना वाचलं असेलच की सीबीएसईमध्ये 13,000 विद्यार्थ्यांना  95 टक्क्यांच्यावर आणि 75,000 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्यावर मार्क आहेत. दिल्लीतल्या एका कॉलेजचा कटऑफ हा 100 टक्के आहे. मला तर हे रिझल्ट पाहता खात्री होत चालली आहे की, येत्या 10 वर्षात सगळे नोबेल पुरस्कार भारतातच वाटले जाणार आहेत, इतकं टॅलण्ट ऊतू चाललंय! तर ते असो. पण एक सांगा, या सगळ्या कॉम्प्लेक्स प्रवेशप्रक्रियेत नुस्ते तुमचे टक्के टाकले की आपोआप तुम्हाला फॉर्म  भरून मिळाला तर किती छान होईल ना? म्हणजे ती किचकट माहिती भरणं नको, खाडाखोड नको. हे शक्य आहे का तर आहे हे करण्याचं सामथ्र्य असणारं एक तंत्रज्ञान म्हणजे एआय अर्थात आर्टिफिशियल इंटिलिजन्स. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता! अमेरिकेतून परवा आलो त्याआधी एका कॉलेजला भेट दिली. त्यात तेथील शिक्षकांनी सांगितलं की, सॅट/जीआरईचा स्कोअर टाकला की (त्यांच्याकडची सीईटी).  कुठलं कॉलेज मिळेल. कुठे स्कॉलरशिप मिळेल हे सांगणारं एआयवर आधारित एक टुल उपलब्ध आहे. त्यानं एक उदाहरण दिलं ते collegeai.com या वेबसाइटचं. म्हणजे बघा, मी तुम्हाला पुढच्या वर्षाकरता असं तंत्रज्ञान विकसित करण्याची स्टार्टअपची आयवडियाच देतोय!मी स्वतर्‍ माझी पीएच.डी. ही या एआयमध्ये लंडनमधून केली आहे. एआयचा वापर करून करिअर कसं निवडावं आणि तुमच व्यक्तिमत्त्व, तुमचं परीक्षेचं उद्दिष्ट (जेईई, कॅट, बारावी, नीट इ.) यावर आधारित कोणती अभ्यासकौशल्य तुमचे टक्के 10 टक्क्यांर्पयत वाढवू शकतील याचं सॉफ्टवेअर मी बनवलं आहे. त्यामुळे एआयचा शिक्षण व कौशल्यविकास यामध्ये नक्की वापर होणार, तो वाढत जाणार हे मला माहिती आहे. तसा जगात ट्रेण्डपण आहे.तर या भागात आपण एआयबद्दल अधिक माहिती करून घेऊ आणि पुढील 2-3 भागात काही तांत्रिक व ‘मांत्रिक’ बाबीपण समजावून घेऊ. सध्या अजून काही तंत्रज्ञानाची नावं तुम्ही ऐकली, वाचली असतील.  उदा. डाटा मायनिंग किंवा अ‍ॅनालिटिक्स किंवा डाटा सायन्स हे सर्व शब्द एआयशी घट्ट नातं सांगतात.आपल्याला एआय माहिती असतं ते  मॅट्रिक्स किंवा आय-रोबोट वगैरेमुळे. नुसतं एवढंच नाही तर काही घरगुती उपकरणं उदा. वॉशिंग मशीन, कॅमेरा इ. ही एआय बेस्ड असू शकतात. याचं मूळ तत्त्व असं आहे की मानवी मेंदू जसे निर्णय घेऊ शकतो त्याप्रमाणेच वैचारिक पातळीवर निर्णय प्रक्रिया एखादं मशीन करेल तर त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय म्हणायचं. त्यात मुख्यतर्‍ लर्निग (ज्ञानग्रहण क्षमता) व प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (प्रश्नांची उकल करून सोडवणं) हा भाग येतो. अजून काही शब्द आपण एआयसंदर्भात ऐकतो ते म्हणजे ओसीआर (ऑप्टिकल कॅरॅक्टर रेकग्निशन) आणि स्पीच रेकग्निशन. आपली एकदा या एआयशी ओळख झालेली आहे. 1997 मध्ये आयबीएमच्या डीप ब्ल्यूने गॅरी कॅस्पारोव्ह या बुद्धिबळाच्या जगज्जेत्याला हरवलं तेव्हा. नंतर आयबीएमच्याच वॅटसनने 2011मध्ये जिओपॅण्डी या खेळात जगज्जेत्याला हरवलं. या दोन्हीपेक्षा अवघड असणारा अजून एक खेळ ‘गो’. त्यामध्ये प्रथम 2016 व नंतर 2017 मध्ये एआय तंत्रज्ञानानं मानवी तज्ज्ञाला हरवलं आणि एआय एकदम हीरो बनलं.तसं बघायला गेलं तर 1956 मध्ये सुरू झालेलं हे तंत्रज्ञान यामध्ये अनेक स्थित्यंतरंपण आली आहेत. मध्ये 1980-90 मध्ये असा एक काळ होता की जेव्हा असं वाटू लागलं होत की, एआयने पूर्ण जग बदलेल. मग 1990पासून हे तंत्रज्ञान थंडावलं होतं. खरं तर या काळाला एआय विण्टर असंच म्हणतात ! पण 2005 पासूनच्या व पुढे 2011नंतर एआय जे बहरलं आहे ते विलक्षणच. त्यातील काही तांत्रिक बाबी आपण पुढील लेखात बघू.अ‍ॅलन टय़ुरिंग हा एआयचा जनक मानला जातो. त्याच्याच नावानं असलेल्या टय़ुरिंग इन्स्टिटय़ूटच्या इंग्लंडमधील  विद्यापीठात मी माझी पीएच.डी. 1995 मध्ये केली. त्यावेळी माझा पीएच.डी. गाइड मला म्हणाला होता की, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेवर काही लोक काम करतात कारण त्यांना नैसर्गिक बुद्धिमत्तेची कमी जाणवत असते!’ त्याच्या या ‘भविष्यदर्शी’’ वाक्याचं प्रत्यंतर पुढे लग्नानंतरची गेली 23 वर्षे माझ्या सुविधा पत्नीबरोबरच्या ‘सुसंवादातून’ सतत जाणवत राहिल्याने माझा एआयमधला इंटरेस्ट वाढतच राहिला आहे.(लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)

bhooshankelkar@hotmail.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञान