केसांवरचा दागीणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:59 IST2016-02-28T11:59:44+5:302016-02-28T04:59:44+5:30
तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.

केसांवरचा दागीणा
स त्री सौंदर्यात भर टाकणाºया केशभूषकांनी (हेअर ड्रेसरनी) आता केसांची सुरेख बांधणी करताना राजे-महाराजांच्या काळातील हेअर ज्वेलरीकडे मोर्चा वळवला आहे.
नव्या हेअर ज्वेलरी म्हणजेच केशालंकार किंवा केशाभूषणे जुन्या काळातील फॅशनचा आणि चित्रपटांचा प्रभाव दिसून येतो. तरुणींची आवड लक्षात घेऊन कारागिरांनी अशी केसांची आभूषणे बाजारात आणली आहेत.
यामध्ये पारंपरिक जुडा पिन, टीकली, बिंदी, हेअर पिन, मुकुट, वेणी अशा दागिन्यांचा समावेश होतो. लांब केस असलेल्या तरुणी केसांचा काही भाग वेणीने सजवून त्यामध्ये हेअर पिन्स, मुकुट, बिंदी यांनी सजवू शकतात. तसेच आंबाडा घालून तो जुडा पिनने सजवता येऊ शकतो. आंबाड्याचा एका बाजूचा भाग लटकणे लावून सजवता येतो.
तसेच एखादी केशभूषा करून तीही केश दागिन्यांनी सजवल्यावर छान दिसते. लेहंगा, साडी, सलवार कुर्ता अशा ड्रेसवर अशी केशभूषा शोभून दिसते. हल्ली केशभूषणांवर पानं, फुलं, वेली, मोर, पोपट, कोयºया यांचाच प्रभाव जास्त दिसतो.