चॉकलेटच्या पानांचं लुटलं सोनं

By Admin | Updated: October 30, 2014 19:44 IST2014-10-30T19:44:43+5:302014-10-30T19:44:43+5:30

आपण छोटछोटय़ा गोष्टींनीही पर्यावरणासाठी खूप काही करू शकतो. त्यातलीच एक गोष्ट चॉकलेट, कॅडबरीचा कचरा.

Gold of chocolate products | चॉकलेटच्या पानांचं लुटलं सोनं

चॉकलेटच्या पानांचं लुटलं सोनं

आपण छोटछोटय़ा गोष्टींनीही पर्यावरणासाठी खूप काही करू शकतो. त्यातलीच एक गोष्ट चॉकलेट, कॅडबरीचा कचरा. खातो आणि रस्त्यावर फेकून देतो कागद. आठवी-नववीत असल्यापासून मी मात्र स्वत:ला सवय लावून घेतलीये की रॅपर खाली वाट्टेल तसे भिरकवायचे नाहीत. चॉकलेट खाल्लं की कागद खिशात आणि मग कचराकुंडीत ही सवयच लागली हाताला. मित्र आधी हसायचे आता त्यांनाही ही सवय लागली आहे.

‘मीच का करायचं’ असं म्हणण्यापेक्षा हे ‘मीच करीन’ असं म्हणत काम करायची सवय आम्ही आता स्वत:ला लावून घेतली आहे. गेल्या दस:याला मीच असाच एक उपक्रम केला. अवतीभोवतीची लहान मुलं गोळा केली आणि काही इतस्तत: पडलेले रॅपर जमवले. पॅम्प्लेट जमवले. ते आपटय़ांच्या पानासारखे कापले. आपटय़ाची पानंच तयार केली. किमान 6क्क् पानं बनली. मग त्या पानातल्या को:या जागेत पाणी वाचवा, झाडं वाचवा यासारखी प्रदूषणपर जनजागृती करणारी पत्रं लिहिली.
ती पानं आम्ही सगळ्यांनी वाटून घेतली आणि दस:याला सोनं म्हणून ती पानंच लुटली. मित्रंना वाटली. आमच्या कॉलेजातही वाटली. अनेकांना या कल्पनेचं खूप कौतुक वाटलं. काम करताना मजा तर आलीच, काहीतरी क्रिएटिव्ह डोकं चाललं याचा आनंदही झाला आणि खरं एक सीमोल्लंघनही झालं!
- हेमंतकुमार भोये, नाशिक
---------------------
प्लॅस्टिक रिटर्न
मी बारावी झालेय, कॉलेजात शिकतेय. कॉलेजात म्हणजे काय सगळ्यांची नुस्ती चंगळ. कॅण्टिन, तिथलं खाणं, कोल्ड्रिंकच्या बाटल्या असा सगळ्यांचा शिरस्ता. मी मात्र चुकून कधी बाटलीबंद पाणी विकत घेत नाही. बाहेर काही खात नाही, डबाच नेते. कारण बाहेर खाताना जे प्लॅस्टिकबंद डबे येतात ते आपण असेच फेकून देतो. ट्रेनच्या-बसच्या बाहेर तर हात पटकन जातो, घेतलं की फेक.
हे सारं मी कटाक्षानं टाळतेच, पण माङया घरच्यांनाही सक्तीनं करायला लावते. एवढंच नव्हे तर किराणा भरून ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आमच्या घरी येतात. त्याही आम्ही किराणा दुकानदाराला परत करतो, पुन्हा वापर असं सांगतो. 
मला कल्पना आहे की, हे सारं फार मोठं नाही, पण असे छोटे प्रय}च मोठी स्वच्छता करतील अशी मला आशा आहे.
- रेणू अवचार, चंद्रपूर

Web Title: Gold of chocolate products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.