गो लाऊड!!

By Admin | Updated: September 25, 2014 16:54 IST2014-09-25T16:54:35+5:302014-09-25T16:54:35+5:30

रेड+ग्रीन+यलो हे तीन रंग बिंधास्त वापरा, आणि चमका!

Go-Loud !! | गो लाऊड!!

गो लाऊड!!

 

 
 
 
 
ग रबा सुरू.
काय घालू?
असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर एकच, गो लाऊड!!
पण बजेट?
बजेटवालीच स्टाईल सांगतेय !
मिक्स अँण्ड मॅच करा. विकतबिकत घेण्यापेक्षा स्वत:च्याच आहे त्या कपड्यांचं कॉम्बिनेशन करा, मित्रमैत्रिणींचे एक्सचेंज करा.
रेड+ग्रीन+यलो हाच या सिझनचा रंग.
त्यामुळे याचं कॉम्बिनेशन करा, तुम्ही स्टायलिश, ब्राईट दिसाल हे नक्की!
- प्राची खाडे
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर
 
 
तरुणींसाठी. ३ चा फॉर्म्युला
बाजारात रेडिमेड मिळणार्‍या ‘चोली’ विकत आणा. तीन प्रकारच्या. बॅकलेस, फुल स्लीव्हज-नेटवाली, हॉल्टर/स्पॅगेटी अशा प्रकारात या ‘चोली’ मिळतात. 
३ घागरे, गोल्डन, सिल्व्हर बॉर्डरवाले घ्या. एकदम ब्राईट कलरचे.
३ प्लेन दुपट्टे. घागरा किंवा ब्लाऊजशी हे दुपट्टे मॅचिंग असले पाहिजेत.
हे सारं विकत घेताना रेड+यलो+ग्रीन हे तीन मुख्य रंग हे सारं घेताना लक्षात ठेवा.
तीन सेट्स करा ज्वेलरीचे, गोल्डन-सिल्व्हर कॉम्बिनेशन असलं म्हणजे झालं!
 
तरुणांसाठी. ३ चा फॉर्म्युला
३ सॉलीड, ब्राईट कलरचे कुर्ते घ्या. 
३ प्लेन धोती, पांढर्‍या, ऑफवाईट, मोती कलरच्या
३ शॉर्ट जॅकेट
हे कॉम्बिनेशन तुम्हाला मस्त हवं तसं वापरता येऊ शकतं. तुमची जिन्स आणि त्यावर कुर्ते, बिंधास वापरा. आणि जरा डेअरिंग असेल तर रणवीर सिंगने वापरलेले ‘केडिया’ही तुमच्या जिन्सवर घालून पहा.बेधडक! स्टायलिश.
 

Web Title: Go-Loud !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.