Generation YZ- ही कोणती तरुण पिढी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:09 IST2019-01-10T13:08:50+5:302019-01-10T13:09:24+5:30
कोण काय म्हणतं/म्हणेल, याची पर्वा नाही! डोक्यात जुना चिखल नाही. नवे प्रयोग करून बघायची भीती? - जराही नाही. पैसा हवा आहे, पण तोच सर्वस्व असतो असा मूर्ख विचार नाही.

Generation YZ- ही कोणती तरुण पिढी?
-ऑक्सिजन टीम
विशेषांक लेखन
प्राची पाठक
काय वायझेड प्रश्न विचारतोस,
काय वायझेड ताप झालेत डोक्याला.
काय वायझेड किचाट झालाय डोक्यात
कसले वायझेड लोक आहेत.
ही अशी वाक्य तरुण मुलांच्या जगात फार काही बर्या अर्थानं वापरली जात नाहीत आणि ती ‘असभ्य’ आहेत, द्वयअर्थी आहेत असंही म्हणता येत नाहीत. (म्हणजे काहीजण म्हणतात तसं, पण बदलत्या तरुण भाषेचं म्हणजे स्लॅँगचं सगळंच असभ्य हे म्हणण्याची रीत तशी काही नवीन नाही. ती जुनीच आहे.)
तर सगळं जग कूल, सही, ओकेटाइप्स आणि कधीकधी वायझेड ज्यांना वाटतं, त्या पिढीची ही चर्चा.
खरं तर या पिढीलाच ‘वाय-झेड’ म्हणायला हवं.
म्हणजे काय तर ‘जनरेशन वाय’ नावानं ओळखले जाणारे ‘मिलेनिअल्स’ आणि ‘जनरेशन झेड’ नावानं ओळखली जाणारी त्यांच्या पुढची पिढी पण तुलनेनं तरुण.
मिलेनिअल्स कोण तर आज वय वर्षे 22 ते 38 वयात असलेले
आणि झेड जनरेशन कोण?
- त्यात मोठा वाद आहे. कुणी म्हणतं 1995 ते 2014 दरम्यान जन्मलेली झेड जनरेशन. कुणी म्हणतं 1995 ते 2009 दरम्यान जन्मलेली झेड जनरेशन.
मात्र मिलेनिअल्स म्हणजे वाय जनरेशनमधले अत्यंत कमी वयाचे म्हणजे तरुण आणि झेडमधले वयस्क म्हणजे आता तरुण असलेले मुलंमुली यांची मिळून बनते ती वायझेड जनरेशन!
झेडवाले तसे अजून कोवळे आहेत, नवीन आहेत, तरुण म्हणून पण मिलेनिअल्स?
त्यांना कुणी कौतुकानं ‘मिलेनिअल्स’ म्हणतं, कुणी हेटाळणीच्या स्वरुपात म्हणतं, कुणी त्यांच्या खिशातला पैसा आपल्या खिशात यावा म्हणून मार्केटिंगची गणितं आखतं, पण त्यांच्या खिशातला पैसा आणि त्यांची संख्या यांचं अप्रूप सार्या जगाला आहे. भारतातच नाही तर जगभरात सर्वाधिक क्रयशक्ती म्हणजेच पैसे खर्च करण्याची ताकद या ‘मिलेनिअल्स’कडे आहे. पण आजच्या घडीला आर्थिक, सामाजिक बदल करण्याचे सुकाणू जर कुणाच्या हाती असतील तर ते या मिलेनिअल्सच्या आणि त्यांच्या पुढच्या तरुण झेड पिढीच्या हाती!
अमेरिकन मल्टिनॅशनल इन्व्हेस्टमेन्ट बॅँक आणि फिनॅन्शियल सव्र्हिस कंपनी मॉर्गन स्टॅनलेच्या मते, 2020 र्पयत भारतात 41 कोटी फक्त हे मिलेनिअल्स असतील. आणि साधारण 33 हजार कोटी अमेरिकन डॉलर्स खर्च करण्याची क्षमता त्यांच्या हाती असेल. आता एवढा पैसा खर्च करणार्या माणसांसाठी मार्केटिंग कंपन्या पायघडय़ा घालतील, त्यांना भुरळ पाडण्यासाठी वाट्टेल ते करतील हे तर उघड आहेच.
भारतातलं हे तरुण मार्केट आपल्याकडे यावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न बाजारपेठ करतेच आहे. त्याला आता बदलत्या वेगवान तंत्रज्ञानाचीही साथ आहे. दुसरीकडे ही वयाच्या पंचविशीच्या आत-बाहेर असलेली तरुण मुलं सामाजिक-कौटुंबिक आणि मानसिक बदलही मोठय़ा प्रमाणात करत निघाली आहेत. एवढंच काय कार्यालयात जर मिलेनिअल्सची संख्या जास्त असेल तर त्यांच्याशी कसं ‘डील’ करायचं, याचं नव्यानं प्रशिक्षण एचआरला देणंही सुरू झालं आहे. इतका हा कार्यपद्धतीतला फरकही वेगवान आहे. त्यांचं वर्तन, दृष्टिकोन, वागण्यातला मोकळेपणा, स्वकेंद्रीपणा आणि तरीही ‘कनेक्टेड’ असणं यासार्याचा सामाजिक अभ्यासही आता तज्ज्ञ करू लागले आहेत.
या पिढीचा हा बदल फक्त अर्थव्यवहाराचा नाही तर तो बदल विचारांचा आहे, लाइफ स्टाइलचा आहे, आपल्या जगण्याचे प्रयोग करून पाहण्याचा आहे, मळलेली वाट नाकारून भलत्याच वाटेनं जाणार्या धाडसाचा आहे, एकेकटय़ा स्वप्नांचा आहे आणि चुकण्याचा आणि चुका मान्य करण्याचाही आहे.
मोकळ्या स्वप्नांचा, जेन्डर स्वीकारून दोस्ती करण्याचा आहे आणि कुटुंबव्यवस्थेला प्रश्न विचारताना त्यातून मार्ग शोधण्याचाही आहे.
म्हटलं तर प्रत्येकच तरुण पिढी आपल्या आपल्या तारुण्यात काही जुनं मोडत, काही नवीन घडवत निघते. मात्र ज्यांना तंत्रज्ञानानं सुपर जनरेशन बनवून टाकलं आहे, ती तरुण पिढी नव्या वाटांवर कशी चालते आहे.
त्याची एक झलक दाखवणारा हा अंक.
पर्यावरण, मायक्रोबायोलॉजी, मानसशास्त्र या विषयांतली तज्ज्ञ असलेली प्राची स्वतर् मिनिमिलिस्ट आणि अत्यंत प्रयोगशील आयुष्य जगते, वयाच्या विशीत तिनं एकटीनं राहण्याचे प्रयोग करत स्वतर्ला नेमकं काय हवंय हे शोधून पाहिलंय. एकटीनं प्रवास केलाय आणि शिकत-प्रयोग करत ती नवं काही शोधत राहातेय.
तिच्या प्रवासात सतत भेटणार्या शहरी आणि ग्रामीण तारुण्याचा एक ‘बदलता’ चेहरा आणि त्यातल्या जमेच्या बाजू मांडणारा हा विशेष अंक.
वायझेड जनरेशनची काही महत्त्वाची वैशिष्टय़ं सांगणारा.