जीव घेणारे दोस्त
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30
‘कुछ नहीं होता यार, मर्द बन. मर्द बन. पहिल्यांदा वाटेल भीती, मग मस्त थ्रिल. मजा. आणि पॉवर!

जीव घेणारे दोस्त
त्यांच्यापासून स्वत:ला कसं वाचवता येईल?
‘कुछ नहीं होता यार,
मर्द बन. मर्द बन.
पहिल्यांदा वाटेल भीती,
मग मस्त थ्रिल. मजा. आणि पॉवर!
लोक टरकतील तुला,
सलाम ठोकतील.
दुनिया डरती है,
डराना सीख.’
- हे असं सगळं सांगून
मित्र तुम्हाला वाईटसाईट काम
करायला भरीस पाडताहेत का?
घरून पैसे आण सांगताहेत का?
‘एकच पेग’चा आग्रह करत,
दारू पी म्हणतात,
एकच कश म्हणत
सिगरेटचा नाद लावताहेत?
गाडय़ा उडवत,
मुलींची छेड काढत फिरण्यात
त्यांना डेअरिंग वाटतं?
प्रत्यक्ष आणि ऑनलाइन जुगार खेळणं,
टू व्हीलर चोरणं,
सोडून देणं,
हे सारं त्यांना थ्रिलिंग वाटतंय?
मग अशा
दोस्तांपासून वेळीच सावध व्हा!
ते तुम्हाला खड्डय़ात लोटताहेत.
आणि काय सांगावं,
त्या खड्डय़ातून
तुम्हाला कधी बाहेरच पडता येणार नाही?
- कधीच!!
अलीकडेच नाशकात
एक सतरा वर्षाच्या मुलाची
त्याच्या मित्रंनीच हत्त्या केली.
एका तरुणानं पैशासाठी आपल्या
आजीचा खून केला.
दोस्तीच्या नावाखाली
होणा:या या फसगतीपासून स्वत:ला
कसं रोखता येईल?
- ऑक्सिजन टीम
पान 4+5 वर
जगण्याची
माती
करणारे दोस्त