फिटनेस- फन - फटाफट- वायझेड तारुण्याचे 3 मंत्र!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 13:41 IST2019-01-10T13:41:18+5:302019-01-10T13:41:37+5:30
व्यक्तिगत आयुष्यात ही पिढी ‘बेफिकीर’ नाही, उलट जास्त सजग आहे!

फिटनेस- फन - फटाफट- वायझेड तारुण्याचे 3 मंत्र!
या पोरांची लाइस्टाइलच समजत नाही, पैशाचं काही मोलच नाही, असे शेरे सर्रास मारले जातात. मात्र लाइफस्टाइल चेंज म्हणून या वायझेड पिढीच्या आयुष्याकडे पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही काही बदल दिसतात. इंटरनेटचा स्पीड जरा कमी झाला तरी हायपर होणारी ही पिढी, त्यांचा संयम कमी, त्यांना सगळं फटाफट हवं हे खरंच आहे. मात्र त्यातून अनेक रंगीबेरंगी विरोधाभासही या पिढीच्या आयुष्यात निर्माण झाले आहेत. त्यामुळे या नव्या गोष्टीत खट्टामिठ्ठा फ्लेवर जबरदस्त आहे.
1. फिटनेस फस्ट
या पिढीत फिटनेसची क्रेझ मोठी आहे. सगळे फिटनेस अॅप्स हाताशी आहेत. जीम मारणं कॉमन आहे. मॅरेथॉन पळण्याची, सायकलिंगची आणि ट्रेकिंगची विलक्षण क्रेझ आहे. विराट कोहलीचा आदर्श समोर ठेवून सुपर एक्सरसाइज करणारेही अनेकजण आहेत. त्यामुळे भारतात पूर्वीच्या कधीही नव्हती इतकी फिटनेस फ्रिक अशी आजची तरुण पिढी आहे.
2. शेअरिंग
अतिशेअरिंग हा या पिढीचा प्रॉब्लेम आहे आणि दुसरीकडे मनातलं शेअर करायला, बोलायला कुणीही नाही अशीही परिस्थिती आहे. ओव्हर शेअरिंगचे बळी आणि कुढे अशी दोन्ही अवस्था जगणारं हे तारुण्य.
3. सगळं ऑनलाइन
जरा डोळे उघडून जग बघा असं म्हणणार्यांना लिंक फॉरवर्ड करा असं उत्तर जातं असं जोक फॉरवर्ड होतात त्या तरुण जगात सगळं ऑनलाइन चालतं. बिलं भरणं, जेवण मागवणं, गप्पा, संताप, मैत्री आणि व्यवहारही ऑनलाइनच जाण्याचा हा काळ. तुम्ही ऑनलाइन आहात, म्हणजे उत्तम आहात, जिवंत आहात असंही अनेकजण मानतात.
4. टीव्ही बाद-मोबाइल हातात
अनेक तरुण मुलं टीव्ही पाहतच नाहीत. त्यांना फॅमिली ड्रामा सिरीअलमध्ये काही रस नाही. त्यांचं मनोरंजन त्यांच्या हातातल्या मोबाइलमध्ये आहे. ते मोबाइलवर इंटरनेटवर हवं ते पाहतात. त्यामुळे तरुण मनोरंजन टीव्हीला बाय म्हणून पुढं सरकतं आहे, असा हा नवीन ट्रेण्ड.
5. बोलबच्चन
बडबडे या अर्थानं नाही; पण ही पिढी व्होकल आहे. बहुतांश लोक आपल्याला जे पटलं नाही, आवडलं नाही ते खुलेआम स्पष्ट सांगतात. अनेक साइट्स, पोर्टल्स यावर आपली मतं मांडतात. अनुभव लिहितात. ज्यांचं चुकलं त्यांना सरळ टॅग करतात. घरीही सडेतोड जे पटलं नाही ते सांगतात. हे ‘सांगणं’ उद्धट वाटण्यार्पयतही अनेकदा जातं. पण ही पिढी ‘व्होकल’ आहे हे नक्की.
6. विकत कशाला? भाडय़ानं आणू.
सगळंच विकत आणायचं, आपल्या मालकीचंच हवं हे आता कमी होत चाललं आहे. जे आवडलं ते भाडय़ानं आणलं, घातलं, परत केलं. हे नवीन चक्र आहे. पार्टीवेअर, दागिने, चपला हे सारं आता भाडय़ानं मिळतं, ऑनलाइनही रेण्ट करता येतं. त्यामुळे ते रेण्ट करण्यापासून भाडय़ाच्या घरात राहणं, गाडी हवी तेव्हा भाडय़ानं घेणं हे सारं आता सुरू झालं आहे.
7. वेळ घेऊ.
कुठलाही निर्णय विशेषतर् नात्यांसंदर्भातला निर्णय घेताना वेळ घेणं आता वाढलं आहे. लगA ठरवताना ते प्रेमात पडून असो वा अरेंज मॅरेज असो त्याचा निर्णय घेताना पुरेसा वेळ घेणं, परस्परांना समजून घेणं, नाहीच पटलं तर वेळेत वेगळं होणं हे सारं आता तरुण मुलंमुली सर्रास करतात. मेट्रो शहरात लिव्ह इन नंतर लगAाचा निर्णय घेताना अनेकजण दिसतात. करिअर की लगA ही लढाई न लढता, दोन्हींचा विचार करून पुरेशा विचारांती निर्णय घेतले जातात.