कॉलेजचा पहिला दिवस उजाडण्यापूर्वी..
By Admin | Updated: June 30, 2016 12:34 IST2016-06-30T12:34:43+5:302016-06-30T12:34:43+5:30
कॉलेजच्या अॅडमिशनची धावपळ, धांदल संपली की वेध लागतात कॉलेज सुरू होण्याचे. आणि मग जो तो/जी ती धडपड सुरू करते कॉलेजात प्रत्यक्ष जाण्याच्या तयारीची! दिसणं, स्टाईल, फॅशन्स हे सारं तर महत्वाचं आहेच, पण त्यासोबतच आणखी काही गोष्टींचीही तयारी करुन ठेवा..

कॉलेजचा पहिला दिवस उजाडण्यापूर्वी..
- विनोद चव्हाण
कॉलेजच्या अॅडमिशनची धावपळ, धांदल संपली की वेध लागतात कॉलेज सुरू होण्याचे.
आणि मग जो तो/जी ती धडपड सुरू करते कॉलेजात प्रत्यक्ष जाण्याच्या तयारीची!
दिसणं, स्टाईल, फॅशन्स हे सारं तर महत्वाचं आहेच, पण त्यासोबतच आणखी काही गोष्टींचीही तयारी करुन ठेवा..
ही एक चेकलिस्ट
* आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेतलाय त्याचे माजी विद्यार्थी कोण, शिक्षक कसे आहेत याची सविस्तर माहिती काढा.
* ज्या शहरात अॅडमिशन घेणार तेथे राहण्याची व्यवस्था कशी आहे - होस्टेल, भाड्यानं रूम किंवा नातेवाईकांकडे नेमकं कुठं रहायची याची नीट चौकटी करुन शक्यतो शांत व कॉलेजच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करावा.
* त्या शहरात राहण्याची, जेवणाची व्यवस्था महाग आहे की स्वस्त, याची माहित करून घ्या. योग्य ठिकाणी मेस लावा. त्यासंदर्भात चौकशी करणं फार महत्वाचं.
* ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी सुरूवातीला थोडे गंगारुन जातात. जागा आणि आसपासचं वातावरण बदलल्यामुळे अॅडजस्ट करण्यास थोडावेळ लागतो. म्हणून कॉलेज सुरू होण्यापूर्वीच काही दिवस अगोदर त्या शहरात दाखल व्हा.
* कॉलेजमध्ये जर रँगिग किंवा वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास होत असेल तर घाबरून न जाता तात्काळ माहिती आपल्या पालकांना व कॉलेज प्रशासनाला द्या. रॅगिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधावा. प्रत्येक कॉलेजमध्ये यासाठी पोलिसांचा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो.
मैं हू ना
कॉलेजमध्ये गेल्यावर साधारणत: काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा ‘मैं हूve ’ चित्रपट. शाहरुख (मे. राम) जेव्हा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतो तेव्हा धमाल उडते. तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष या चित्रपटात एकदम अचुक टिपलेला आहे. शाहरुखला कॉलेजमध्ये कुठे काय आहे हे माहितच नसते. मग तो इतरांना विचारतो पण त्याला सरळ वाक्यात कोणीच काही सांगत नाही. तुमचेसुद्धा असे हाल होऊ नये म्हणून निदान कॉलेज सुरू होण्यापूर्वी आपलं कॅम्पस, डीपार्टमेण्ट नीट पाहून या!