शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बेधुंद...ब्राझिलमध्ये ‘रिओ कार्निव्हल’ अनुभवताना...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 6:44 PM

रिओ कार्निव्हलची धूम जगभर असते. या कार्निव्हलमध्ये सारं ब्राझिल दहा दिवस रस्त्यावर उतरतं, तासन्तास नाचतं. खातं-पितं, धुंद होऊन स्वत:ला विसरून जातं! मात्र त्या धुंदीपलीकडे असतो आणखी एक कार्निव्हल! वर्णसंघर्षात पिचलेल्या काळ्या तारुण्याचा!

- सुलक्षणा व-हाडकर

ब्राझिलमधला जगप्रसिद्ध रिओ कार्निव्हल नुकताच संपला. दहा दिवस देशभर चालतो हा आनंदसोहळा. पोर्तुगीज भाषेत एका शब्दात या कार्निव्हलबद्दल सांगायचं झालं तर त्याला राष्ट्रीय पातळीवरील ‘अलेग्रिया ई फोलिया’ म्हणतात. म्हणजे काय तर आनंदाचं, क्रेझी असण्याचं कलासक्त आणि स्वच्छंद असं एक रूप.या कार्निव्हल काळात साधारण वीस लाख लोकं रस्त्यावर येऊन एकत्र खातात, पितात, नाचतात आणि देखण्या परेडमध्ये फिरतात. हे सारं कुठल्याही पोलीस संरक्षणाशिवाय चालतं. या कार्निव्हलमध्ये वागण्या-नाचण्याचे नियम सारेचजण पाळतात. कुठेही हुल्लडबाजी नाही, छेडछाड नाही की विनयभंगही नाही.रस्त्यांनाच उत्सवाचं एका मोठ्या पार्टीचं रूप आलेलं असतं. या कार्निव्हलमध्ये सहभागी होणारे लाखो लोक अक्षरश: एका दिवसात अख्खं आयुष्य जगून घ्यावं अशी मजा करतात. त्यासाठीची तयारी वर्षभर आधीच सुरू होते.यावर्षी माझ्या तीन मैत्रिणी ग्रॅण्ड परेडच्या फ्लोट्सवर नाचल्या. सोपं नसतं ते. तासन्तास नृत्य करायचं, तेही जोषात. त्यासाठी सराव लागतो. तो त्यांनी कितीतरी महिने आधीच सुरू केला होता. ते नृत्य शिकवणारे क्लासेस असतात. तिथं नृत्य शिकवतातही, सरावही करून घेतात. मात्र हे नृत्य बिकिनी घालून करतात. मी त्या क्लासला गेले; पण बिकिनी घालून नृत्य करावं लागेल या भयानं दोनेक क्लास करूनच पळून आले. माझं भारतीय मन अजूनही बिकिनीला तयार होत नाही. सार्वजनिक ठिकाणी लाखो लोकांसमोर बिकिनी घालून धुंद होऊन नाचणं ही कल्पनाही माझ्यासाठी अवघड होती. माझ्या ब्राझिलियन मैत्रिणी मात्र अत्यंत मेहनतीनं नृत्याचा नियमित सराव करत होत्या.रस्त्यावर माणसं उतरतात, पण कार्निव्हलची जी खास परेड असते ती मोफत नसते. त्याची तिकिटे खूप महाग असतात. जनरल क्लासची तिकिटेसुद्धा सहा-सात हजारांची असतात. खास टेबल बुक केले तर प्रत्येकी वीसएक हजार द्यावे लागतात. आगाऊ बुकिंग केलं तर थोडं स्वस्त तिकीट मिळू शकतं.मला हे परवडण्यासारखं नव्हतं त्यामुळे मी हा सोहळा पडद्यावर पाहिला. या कार्निव्हलच्या परेडमध्ये जो तो रंगबिरंगी वेशभूषा करून फिरत असतो. केसांत तुरे घालून, विविध टोप्या घालून सांघिकरीत्या लोक परेड करताना दिसतात. शहराच्या विविध भागात म्हणजे ब्लोकोमध्ये मोठ्या उघड्या गाडीत संगीत चालू असतं. आवडत्या गायकाच्या किंवा म्युझिक बॅण्डच्या साथीने लोकं त्या त्या विभागातील म्युझिकल परेडमध्ये सहभागी होताना दिसतात.कार्निव्हल काळात ब्राझिलमध्ये राष्ट्रीय सुट्या असतात. त्या त्या शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक प्रकृतीप्रमाणे उत्सव साजरा होतो.या कार्निव्हल काळात ब्राझिलमध्ये चाळीस लाख लिटर बिअर प्यायली जाते, असं म्हटलं जातं. एकूण वर्षभराच्या पाच टक्के बिअर कार्निव्हल काळातच प्यायली जाते. मात्र या परेडमध्ये काचेच्या बाटलीतील बिअर पिण्यास मनाई केली जाते. त्याऐवजी टीनच्या कॅनमधील बिअर सगळीकडे मिळतात. रस्त्याने चालत आम जनता बिअर पीत नाचत असते. वातावरणात एक प्रकारची धुंदी असते. काचेच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पडल्यास दुखापत होऊ शकते म्हणून कॅनची सक्ती करण्यात आलीय. लोकंही हा नियम पाळतात.देशातली गरीब माणसं मात्र लहान लहान हातगाड्यांवर बर्फाच्या गाड्यात घातलेल्या चिल्ड बिअर विकताना दिसतात. कचरा एका ठिकाणी साचवला जातो. हे टीनचे कॅन पायानं चपटे करून भंगारमध्ये विकले जात असावेत. कारण मध्यरात्री उशिरापर्यंत किंवा दुसºया दिवशी भल्या पहाटेही बरीच तरुण आणि वयस्क माणसंही पायात स्पोर्ट्स शूज घालून पायानं हे कॅन चपटे करताना दिसतात. अक्षरश: लाखांच्या संख्येत कॅन चपटे केले जातात. मोठमोठ्या पिशव्यांमध्ये भरले जातात. कधी कधी तर अख्खं गरीब कुटुंब हेच काम करताना दिसतं.एरवी याही समाजात गरीब-श्रीमंतातली, कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीयांतली दरी मोठी असली तरी सांबा हा नृत्यप्रकार गरीब-श्रीमंत हा भेदभाव दूर करतो. आफ्रिकन संस्कृतीमधलं सांबा नृत्य या कार्निव्हलचं खास आकर्षण. एरवीचा ब्राझिलमधला वर्णसंघर्षही काहीसा बाजूला ठेवत कार्निव्हलमध्ये सांबावर सारेच नाचतात. अन्यथा ब्राझिलमध्ये कृष्णवर्णीय म्हणजे अजूनही फुटबॉल, संगीत आणि नृत्य. मुख्य प्रवाहात कृष्णवर्णीयांना अजूनही फारसं स्थान नाही. अगदी इथल्या वर्तमानपत्रातील जाहिराती पाहिल्या तरी काही गोष्टी सहज लक्षात येतात. त्या जाहिरातीत आवर्जून लिहिलेलं असतं, ‘आकर्षक व्यक्तिमत्त्व म्हणजे फक्त गोरा रंग किंवा थोडासा मिसळलेला मिश्र रंग’. थोडक्यात कृष्णवर्णीयांनी अर्जही करायची तसदी घेऊ नये. सध्याच्या ब्राझिल सरकारनं आर्थिकदृष्ट्या गरीब वर्गासाठी अनेक योजना राबवणं सुरू केलं आहे, मात्र विकास आणि बदल अजूनही दृष्टिपथात नाही.सरकारनं मतदान सक्तीचं केलं, त्यातून कृष्णवर्णीयांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. म्हणून गौरवर्णीय या सरकारवर नाराज दिसतात. नवा वर्गसंघर्ष पुन्हा ठसठसतो आहेच.या कार्निव्हल व्यतिरिक्त स्वत:ला सिद्ध करण्याचं कुठलंही व्यासपीठ कृष्णवर्णीयांकडे नाही. सारे सामाजिक भेद विसरून तेही या परेडमध्ये सहभागी होतात. दु:खच काय वर्तमानाचं सारं भान विसरून नाचतात.रिओमधील रस्त्या-रस्त्यांवर कार्निव्हल परेडप्रमाणे सांबा स्कूलमधील भव्य चित्ररथांची परेडसुद्धा असते. तीही जगप्रसिद्ध आहे. जगभरातून लक्षावधी पर्यटक यानिमित्तानं रिओमध्ये येतात. तब्बल ९६ तास सलग, कुठंही न थांबता हे चित्ररथ नृत्य, संगीत आणि वेशभूषेच्या माध्यमातून आपापली कल्पना सर्वांसमोर मांडतात. सामाजिक संदेश देत किंवा वैविध्यपूर्ण संकल्पना घेऊन ही नृत्यं बसवली जातात.सांबा परेडमध्ये जे चित्ररथ असतात त्यावर पिसांच्या पेहरावात नृत्य करणारी मुख्य नृत्यांगना आपल्याला नेहमी दिसते. तिच्या हातात तिच्या सांबा स्कूलचा झेंडा असतो. हा झेंडा तिच्या पिसांच्या पेहरावाला किंवा अंगाला लागता कामा नये किंवा झेंड्याच्या दांड्याला लागता कामा नये असा नियम असतो. तसंं झाल्यास त्या स्कूलला निगेटिव्ह गुण मिळतात. अत्यंत कुशल नृत्यांगनेलाच चित्ररथाच्या वर नृत्य करण्याची संधी मिळते.रिओ कार्निव्हलमध्ये सहभागी होणारे सांबा स्कूलमधील बहुसंख्य नर्तक हे फवेलात राहणारे असतात. फवेला ही रिओ शहरातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी. मुंबईची धारावी तशीच ही फवेला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणारे सर्वसामान्य तरुण यात सहभागी होतात. जिवाचं रान करून, अथक मेहनत करून चित्ररथात आपापली कला सादर करतात. कार्निव्हल परेडसोबतच ही सांबा स्कूल परेड हा एक अद्भुत अनुभव असतो. या परेडसाठी दरवर्षी गाणी लिहिली जातात. ब्लोको म्हणजे स्थानिक पातळीवर विविध परिसरात आधी परेडची रंगीत तालीम केली जाते. वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये, ब्लोकोमध्ये याचे मोबाइल अ‍ॅपसुद्धा तयार होतात. विभागीय परेडची तयारीही जोरात होते.या ब्लोकोमध्ये सगळ्या वयोगटातील स्त्री-पुरुष धुंद होऊन नाचतात. तरुण तर बहुसंख्येनी असतात. पद, शिक्षण, सामाजिक हुद्दा अशी कसलीही बंधनं मानली जात नाहीत. सारं झुगारून धुंद नाचतात. खातात, पितात. लाइव्ह म्युझिक शो असतात, त्यावर तर अनेकजण तासन्तास नाचतात.ज्या पद्धतीने ब्राझिलियन तरुण-तरुणी ती नृत्य करतात ते पाहूनही हेवा वाटतो. त्यांच्या अंगाअंगात लय असते. सध्याच्या कार्निव्हलमध्ये आफ्रिकन तरुणही मोठी छाप पाडताना दिसतात. त्यांचं संगीत, नृत्यसंस्कृती जगासमोर ठेवतात. लाखो माणसं एक लयीत, एका तालात नाचतात.हा कार्निव्हल उत्सव असतो, मजा असते; पण एक सामाजिक स्टेटमेण्टही असतो. जो अनेक गोष्टी खुलेपणानं बोलतो..नृत्य-संगीत आणि थरार यापलीकडे जात तो जगण्याचे संघर्ष साधू पाहतो...

( लेखिका ब्राझिलस्थित मुक्त पत्रकार आहेत.)