एन्जॉय!!!

By Admin | Updated: December 18, 2014 18:37 IST2014-12-18T18:37:09+5:302014-12-18T18:37:09+5:30

डिअर फ्रेण्डस. जरा आपली एक शाळकरी गंमत आठवा. भूगोलाचा पेपर. नकाशा भरा, असा एक पाच-दहा मार्काचा प्रश्न असायचा. तो प्रश्न, म्हणजे पेपर संपल्यावर हसून हसून फुटून मरण्याची खास सोय.

ENJOY !!! | एन्जॉय!!!

एन्जॉय!!!

 

डिअर फ्रेण्डस. 
जरा आपली एक शाळकरी गंमत आठवा.
भूगोलाचा पेपर. नकाशा भरा, 
असा एक पाच-दहा मार्काचा प्रश्न असायचा.
तो प्रश्न, म्हणजे पेपर संपल्यावर हसून हसून फुटून मरण्याची खास सोय.
मुंबई श्रीलंकेत, नागपूर राजस्थानात, तर नाशिक कोकणात आणि दिल्ली कुठंतरी पंजाबात दाखवण्याची, म्हणजे मनाला येईल त्या जागी पेन्सिलनं काळा ठिपका दाखवून ही आपली दिल्ली असा भयंकर आत्मविश्‍वास दाखवण्याचा तो काळ !
नकाशे वाचणं, ते भरणं, त्याप्रमाणे दिशा ओळखणं हे सारं आपण शाळेत शिकणं अपेक्षित होतं; मात्र मुळातच भूगोल आपल्याकडे ज्या रटाळ पद्धतीनं शिकवला जातो, त्या पद्धतीत आपल्याला नकाशे भरणं, वाचणं, आपला देश, त्यातली शहरं, राज्यं नीट ओळखून समजून घेणं काही जमलंच नाही. पुन्हा एक लोकप्रिय समज असा की, लागतो कशाला भूगोल नंतर, रटला-ओकला परीक्षेत की झालं काम. मार्क मिळाले, विषय संपला. त्याच अज्ञानाचं रूपांतर अत्यंत मोठय़ा समस्येत होतं हे आपल्या लक्षातही येत नाही.
कारण तेच, आपला देश आपल्याला नेमका कुठं, कसा आहे, हेच माहिती नसतं. म्हणून तर आपल्या कॉलेजात, शहरात राहणार्‍या बारीक डोळ्यांच्या, वेगळ्या धाटणीच्या आपल्याच ईशान्य भारतीय माणसांना आपण ‘चिनी-नेपाळी’ म्हणतो, परके समजतो. त्यांना अपमानास्पद वागणूक देतो आणि त्याचं आपल्याला काही वाटत नाही. ना खेद, ना खंत.
त्याच्या मुळाशी आपलं अज्ञान असतं हेच आपण समजून घेत नाही. ते समजून घेता यावं म्हणून कधीतरी ‘जान से प्यारा’ असलेल्या हिंदोस्ताचा नकाशा तरी आपण एकदा नीट वाचावा. आपल्या देशात राज्यं किती, ती नेमकी कुठं आहेत, त्यांच्या राजधान्या कोणत्या, तिथं भाषा कुठली बोलली जाते, तिथली माणसं नेमकी दिसतात कशी.
हे एवढं जरी सामान्यज्ञान आपण कमावू शकलो ना, तरी आपल्याच देशात मैत्रीचे पूल बांधले जाण्याची आशा निर्माण होईल.
ते कसे.तेच तर वाचा, या अंकात.
- ऑक्सिजन टीम
oxygen@lokmat.com

Web Title: ENJOY !!!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.