शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

इमोशनल इटिंग करताय?-सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 07:00 IST

प्रेमभंग झालाय, स्ट्रेस आहे, उदास वाटतं आणि तुम्हाला खा खा सुटली आहे, मग समजा की, तुम्ही एका लाइफस्टाइल डिसऑर्डरचे बळी आहात.

ठळक मुद्देगेल्या 15 वर्षात कर्नाटकात 15 ते 39 वर्षे वयात ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यात 11.4 टक्के मृत्यू हे लाइफस्टाइल डिसऑर्डरने झालेले आहेत.

- निशांत महाजन

इमोशनल इटिंग हा शब्द गेलाय तुमच्या कानावरून? आपल्याला खूप लो वाटतंय, एकदम उदास, एकदम डिप्रेस्ट किंवा प्रेमभंगच झालाय तर मग खा काहीतरी गोड. चॉकलेट. आइस्क्रीम. वेफर्स असा मारा सुरू होतो. भावनेच्या भरात जरा अतीच खाल्लं जातं. त्याक्षणी भूक नसते; पण केवळ बरं वाटावं, मस्त वाटावं म्हणून खा खा सुरू होते. दुर्‍खात भूक जशी पळते तशी ही खा खा ही मागे लागते. आणि अतिखाणं सुरू होतं. तेच हे इमोशनल इटिंग. आपल्या लक्षातही येत नाही पण अलीकडच्या काळात, विशेषतर्‍ जंक फूड सहज उपलब्ध होऊ लागल्यापासून हे इमोशनल इटिंग फारच वाढत चाललं आहे. अगदी अलीकडच्या काळात विशेषतर्‍ अमेरिकन लाइफस्टाइलमध्ये हा शब्द सर्रास वापरला जायचा; पण म्हणता म्हणता हे प्रकरण आपल्याकडेही चांगलंच रूळलं. स्थिरावलं.आपल्याला त्याक्षणी चांगलं वाटावं, सुख वाटावं म्हणून भरपूर साखर किंवा मीठ घातलेले, जिभेला मस्त वाटणारे पदार्थ एखादा किंवा एखादी खातच सुटतो. त्यातून वजन वाढतं, मग वाढत्या वजनानं पुन्हा निराश वाटतं. डाएटचे प्लॅन होतात; पण तेही बारगळतं. परिणाम काय तर हे इमोशनल इटिंग सुरूच राहतो. मन भरावं म्हणून जे खाणं होतं ते प्रत्यक्षात पोट भरत असतं आणि अकारण वजनाचे आकडे फुगायला लागतात.त्या सार्‍याचा परिणाम आपल्या प्रकृतीवर वजन वाढीच्या पलीकडे होतो हे इतके दिवस आपल्या गावीही नव्हतं. म्हणजे अंदाज असेल; पण आकडेवारीचा सबळ पुरावा नव्हता. आता मात्र तो सबळ पुरावाही हातात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे तो भारतातलाच आहे.इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह या उपक्रमांतर्गत एक अभ्यास अलीकडेच करण्यात आला. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, पब्लिक हेल्थ फाउण्डेशन ऑफ इंडिया, इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रिक्स, युनिव्हर्सिटी वॉशिंग्टन यांनी संयुक्तरीत्या केलेला अभ्यास सांगतो की, भारतातही तरुण मुलांमध्ये इमोशनल इटिंगचं प्रमाण वाढतं आहे आणि त्यामुळे थेट दुष्परिणाम त्यांच्या जगण्यावर होत आहे.त्याचाच एक पुरावा म्हणजे गेल्या 15 वर्षात कर्नाटकात 15 ते 39 वर्षे वयात ज्या मुलांचा मृत्यू झाला त्यात 11.4 टक्के मृत्यू हे लाइफस्टाइल डिसऑर्डरने झालेले आहेत. त्याच्या मुळाशी अन्य गोष्टींसह हे इमोशनल इटिंगही आहे. अचानक कार्डियाक अटॅक येणं, डिप्रेशन, मानसिक अस्वास्थ्य यासार्‍यानं मृत्यू ओढावलेले दिसतात. आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे की, याविषयी वेळीच जागरुकता आली तर ही लाइफस्टाइल डिसऑर्डर टाळता येईल.भावनिक अस्थैर्य, प्रेमभंग, नात्यात तणाव, झोप नीट नाही यातून हे इमोशनल इटिंग वाढतं आहे. वाढती वजन, व्यायाम नाही, जंक खाण्याचं प्रमाण, स्थानिक खाण्याकडे पाठ आणि सतत पॅक्ड फूड खाणं हा जिवाशी खेळ आहे, हे तरुणांनी समजून घ्यायला हवं असं हा अभ्यास सांगतो.यानिमित्तानं आपणही आपल्या खाण्याचा विचार करून पाहू. ते हेल्दी आहे की इमोशनल.?ठरवायला हवं.