सतत 12 वर्षे एकटीनं जगभरात समुद्र सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 04:21 PM2020-08-20T16:21:20+5:302020-08-20T16:22:30+5:30

ती समुद्री सफर करत जगभर फिरते आहे. गेली ती समुद्री कचरा विषयात जनजागृती करत समुद्राची गोष्ट सांगतेय.

Emily penn - Sea- around the world alone for 12 years | सतत 12 वर्षे एकटीनं जगभरात समुद्र सफर

सतत 12 वर्षे एकटीनं जगभरात समुद्र सफर

Next
ठळक मुद्दे ‘ई - एक्सपिडिशन राउंड द वर्ल्ड’

 - भाग्यश्री मुळे

जगभरातल्या समुद्रांमध्ये विविध प्रकारचे प्लॅस्टिक जमा होत आहे. पाणी प्रदूषित होत आहे. 
प्लॅस्टिक माशांसह इतर समुद्री जिवांच्या पोटात जात आहे. अन्नसाखळीतून परत ते मानवाच्या पोटात जाते. 
 एका अशाच सागरी प्रवासात महिलांच्या आरोग्यावर या सा:याचा काय परिणाम होतो, हा प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लंडन येथील एमिली पेन या 35 वर्षीय तरु णीने या विषयावर काम करायचे ठरवलं.
जगाला या समस्येची माहिती व्हावी यासाठी तिने प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करून संशोधन सुरू केले. या मोहिमेअंतर्गत आतार्पयत एमिलीबरोबर 28 देशांतील 80 महिला संशोधकांनी 10,330 नॉटिकल मैल प्रवास केला. 
या अंतर्गत 3 वर्षात 38 हजार नॉटिकल मैल प्रवास करून सागरी आरोग्य समजावून घेतले. 
सध्या जगातील एकूण प्लॅस्टिक उत्पादनाच्या 20 टक्के पुनर्प्रक्रि या होते. 
जगभरातल्या समुद्रांना प्लॅस्टिकच्या विळख्यापासून कसे वाचवायचे यासाठी धडपड करणो हेच आता या तरुणींच्या जीवनाचे ध्येय बनले आहे.
एमिली, त्यांचा चमू, त्यांनी केलेला प्रवास, त्यांना आढळलेल्या गोष्टी, त्यांना पडलेले प्रश्न, त्यातील काही प्रश्नांची आपसूक गवसलेली उत्तरे, उपाययोजना सारे काही अद्भुत आहे. त्यांच्या मोहिमेचे नाव आहे ‘ई - एक्सपिडिशन राउंड द वर्ल्ड’ .
आर्किटेक्चरच्या शिक्षणादरम्यान लंडन येथून चीनमधील शांघाय येथे बांधल्या जात असलेल्या एकमेक इको-सीटी येथे तिला डेझरटेशन करण्यासाठी जायचे होते. विमानाऐवजी एमिलीने युरोप, रशिया, मंगोलिया आणि पुढे चीन असा प्रवास रेल्वे, घोडा, उंट अशा साधनांनी करण्याचं ठरवलं.
 तिच्या आयुष्यातला तो पहिला साहसी प्रवास होता. जैवइंधनावर चालणा:या अर्थरेस बोटीवरून ती 12क् दिवसांच्या सागरी प्रवासाला निघाली. प्रवासात तिची बोट एक दिवस प्लॅस्टिक कच:याला धडकली. ते प्लॅस्टिक बघून ती चक्र ावून गेली. तिने बोटीतून पाण्यात उडी मारली; पण जिकडे तिकडे नुसते प्लॅस्टिकच होते. ती जवळपास 1 मैल पोहत गेली. 
प्लॅस्टिक समस्येनी ग्रासलेल्या काही बेटाँना या प्रवासात तिने भेटी दिल्या, माहिती घेतली. या प्रश्नातून या प्लॅस्टिकमुक्तीसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना तिच्या मनात आली. 


या विषयावर काम करायचंच असा दृढ निश्चय करून प्लॅस्टिकमुक्त समुद्रासाठी तिचा प्रवास सुरू झाला. 
मूळची आर्किटेक्चर असल्याने केवळ समस्या बघायची नाही तर तिच्यावरचा उपायही शोधायचा हे तिने तेव्हाच ठरवून टाकले होते. 
त्यातून समुद्रकिना:यावरचे, समुद्रातले प्लॅस्टिक गोळा करणो, प्रदूषणाचे नमुने गोळा करणो, त्याचा अभ्यास करणो, लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणो यासह अशा अनेक मोहिमा तिने पुढे  तिच्या सहका:यांसह केल्या. मोठमोठय़ा मोहिमा केल्या, अजूनही चालूच आहेत. हा सारा प्रवास केवळ महिलांसोबतच करण्याचे ठरवले. 
जगभरातल्या संवेदनशील महिला तिला येऊन मिळाल्या. महिला सफरीवर निघाल्या तेव्हा ‘या बायका काम करण्याऐवजी एकमेकींशी भांडत तर नाहीना बसणार’ असे म्हणत अनेकांनी त्यांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला; पण बोटीवर एकत्न आलेल्या या धाडसी महिला विशेषत: तरु णी अधिकच एकोप्याने, सहका:याने आणि एकमेकींना प्रेरणा देत मोहिमा पूर्ण करत आहेत. 
वा:याचा वेग, उसळत्या लाटा आणि अशात 7क् फूट उंच शिडाच्या होडीवर उभे राहणो ही कल्पनाच पोटात भीतीचा गोळा आणणारी ठरते.
 पण या महिलांनी हे आव्हान स्वीकारले, त्या त्यावर स्वर झाल्या. 
गेल्या 12 वर्षात एमिली या न त्या मोहिमेमुळे सतत समुद्रात आहे, समुद्र प्रदूषणाविषयी काम करण्याच्या निमित्ताने घराबाहेर आहे.
तिची फिरस्ती सुरूआहे, आणि नवं जग सतत खुलं होत ती ते समजून घेते आहे.


( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)
 

Web Title: Emily penn - Sea- around the world alone for 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.