शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

सावधान - ई-सीमच्या  नावाने  तुमचा  घात होऊ शकतो !   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 4:20 PM

ई-सीमच्या नावाखाली हॅकर्स अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. असे काही फोन आले तर सावध राहा.

ठळक मुद्देई-सीमचे बळी

प्रसाद  ताम्हनकर 

कोरोनाच्या या धोकादायक काळात, आता जगभरातील इंटरनेट आणि मोबाइल यूझर्सला इतरही अनेक धोक्यांचा सामना करावा लागतो आहे.विशेषत: भारतात सध्या हॅकर्सद्वारे आर्थिक फसवणूक होण्याच्या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसते आहे. हे हुशार आणि तंत्रकुशल हॅकर्स विविध युक्त्या वापरून लोकांना भूल पाडत आहेत आणि मग त्यांच्या बँक खात्यांची लूट करत आहेत. हैदराबादमध्ये नुकतेच असे एक प्रकरण समोर आले असून, या प्रकरणात ‘ई-सीम’चे आमिष दाखवत चार व्यक्तींची आर्थिक फसवणूक करून तब्बल 21 लाख  रु पयांचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतातील अनेक टेलिकॉम ऑपरेटर ई-सीम सेवा देत आहेत. या सेवेच्या साहाय्याने वापरकर्ते फोनमध्ये सीमकार्ड न बसवताच, कंपनीच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. म्हणजेच कॉलिंग, डेटा आणि मेसेजिंग सीमकार्डशिवाय पूर्वीसारखे केले जाऊ शकते. मात्र, या ई-सीम सेवेच्या नावाखाली फसवणूकही सुरू झाली आहे. 

हैदराबादच्या चार जणांची या ई-सीम सेवेच्या एक्टिव्हेशनच्या नावाखालीच फसवणूक करण्यात आली.केवायसीची प्रक्रिया अद्ययावत नाही किंवा सीमकार्ड घेताना दिलेली कागदपत्रे अपूर्ण आहेत आणि त्यामुळे पुढील 24 तासात तुमचे सीमकार्ड ब्लॉक केले जाणार आहे असे सांगून सीमकार्डधारकाला घाबरवलं जातं.या विषयातली फारशी माहिती नसलेला सामान्य माणूस सहजपणो या थापेला बळी पाडतो. एकदा का तो जाळ्यात फसला, की नंतर या वापरकत्र्याला ई-सीमच्या पर्यायाची माहिती देऊन भुरळ घालण्याची नवीन पद्धत यात पहिल्यांदाच वापरली गेली आहे. हे हॅकर्स प्रथम ग्राहकाला एक संदेश पाठवतात आणि सीमकार्ड ब्लॉक होणार असल्याची भीती दाखवतात. संदेशानंतर, हे हॅकर्स काही काळानंतर ग्राहकाला फोन करून, आपण कस्टमर केअरमधून कॉल करत असल्याचे भासवतात. फोनवरच केवायसीची प्रक्रि या पूर्ण करण्याचा किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करण्याचा पर्याय देतात, जेणोकरून सीमकार्ड ब्लॉक होणार नाही. लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या भीतीने गर्दी टाळणं अशा कारणांनी ही नवीन फोनवरून कागदपत्रे अद्ययावत करण्याची सुविधा कंपनीने सुरू केल्याचे ग्राहकाला भासवले जाते, त्यामुळे ग्राहकदेखील अशा सुविधेवरती पटकन विश्वास ठेवतात. यानंतर ग्राहकाला एक लिंक पाठवून त्यावरती असलेला फॉर्म भरण्यास सांगण्यात येतं. यात ग्राहकाची वैयक्तिक माहिती, नाव, आईचे व वडिलांचे नाव,पत्ता, जन्मतारीख इ. माहिती भरायला सांगतात. त्याचप्रमाणो बँक खात्याचीदेखील संपूर्ण माहिती भरून घेण्यात येते. त्यानंतर हे हॅकर्स ग्राहकाच्या मोबाइल नंबरला आपल्या स्वत:च्या ई-मेल आयडीबरोबर रजिस्टर्ड करतात आणि मग ग्राहकाला ई-सीमसाठी कंपनीकडे रीक्वेस्ट मेसेज पाठवण्यास सांगितले जाते. ग्राहकाने असा रीक्वेस्ट मेसेज पाठवला की त्याच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरती कंपनीतर्फेओटीपी पाठवला जातो, जो की अर्थातच या हॅकर्सच्या हातात सहजतेने पडतो. एकदा ही ई-सीम सेवा सुरू झाली, की कंपनीतर्फे पुन्हा एकदा रजिस्टर्ड ई-मेल आयडीवरती एक क्यूआर कोड पाठवण्यात येतो. आता हॅकर हा क्यूआर कोड आपल्या मोबाइलद्वारे स्कॅन करतात आणि ग्राहकाच्या फोनच्या सर्व सेवा आता हॅकर्सच्या मोबाइलवरती चालू होतात आणि ग्राहकाचं सीम मात्र पूर्णपूणो बंद पडते. ग्राहकाच्या बँक खात्याचा तपशील आणि इतर वैयिक्तक महत्त्वाची माहिती हॅकर्सने आधीच मिळवलेली असल्याने, आता तो सहजपणो त्याच्या मदतीने ग्राहकाच्या बँक खात्यावर नियंत्रण मिळवतो. आर्थिक व्यवहार करून ते खाते रिकामे करतो. या आर्थिक व्यवहारांसाठी अत्यंत गरजेचा असलेला ओटीटीदेखील ग्राहकाच्या मोबाइलच्या सेवा आता त्याच्या मोबाइलवरती सुरू असल्याने त्यालाच मिळतात आणि ग्राहकाला कोणताही थांगपत्ता न लागता त्याचे खाते साफ झालेले असते.त्यामुळे आता सावध राहा यापुढे सीमकार्डसंदर्भात कोणताही मेसेज अथवा फोन आल्यास, स्वत: कस्टमर केअरला फोन करून खात्री करून घ्या. कोणतीही कंपनी फोनद्वारे केवायसीची सुविधा पूर्ण करण्याची सोय देत नाही हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे अशा फोनला फसू नका. सावध राहा.

( प्रसाद विज्ञानविषयक लेखक/पत्रकार आहे.)