शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

इण्टर्न डॉक्टर्स जीवघेण्या वेदनांच्या दुखर्‍या जगातलं भयंकर चित्र !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 3:53 PM

घरच्यांना वाटतं मुलगा डॉक्टर झाला. आता खोर्‍यानं पैसे ओढेल; पण पोस्ट ग्रॅज्युएशन करताना पैसे असतात कुठे? स्टायपेण्ड जेमतेम. त्यात पुस्तकांचा खर्च, कॉन्फरन्सला जाण्याचा खर्च, घराबाहेर राहत असल्यानं स्वतर्‍चा खर्च!! .. एका खोलीत तीन तीन तरुण डॉक्टर्स स्वतर्‍ला कोंबून घेत कसेबसे राहातात. कॉल आला की पळतात, डे-नाइट शिफ्ट मारतात!! त्यात घरून ‘लगA कर’चा लकडा! म्हणायला डॉक्टर; पण कमाई शून्य! स्पेशलायझेशनच्या नादात शिक्षण संपत नाही. डोक्यावर छत नाही. तिशी आली तरी हे सारं संपत नाही.

ठळक मुद्देइण्टर्न डॉक्टरांच्या जगाचं दार नुसतं वाजवा, हे सारं कानावर पडतंच. आणि दिसते ऊर फुटेस्तोवर धावावं लागण्याची सक्ती!!!

- पूजा मनीष

इण्टर्नशिप करणार्‍या डॉक्टरांना मी भेटायला निघाले होते. त्यांच्या संपावरून नुकताच गदारोळ झाला होता, तेव्हाची ही गोष्ट. बातम्यांत संपाची चर्चा होती म्हणून मग सगळेच त्याविषयी बोलत असावेत त्यातल्याच त्या दोघी.इण्टर्नी डॉक्टरांच्या जगात जाताना नाही म्हटलं तरी त्या दोघींच्या बोलण्यातली हळहळ माझ्यासोबत आलीच. एक झलकच दिसली डॉक्टर होण्याच्या प्रवासाची.वयाच्या सतराव्या किंवा अठराव्या वर्षी बारावीची परीक्षा झाल्यावर सीईटी परीक्षा चांगल्या मार्कानी ‘क्रॅक’ करायची. मग एमबीबीएसला अ‍ॅडमिशन मिळाली, त्यातही सरकारी, नावाजलेलं कॉलेज मिळालं की निम्मं जग जिंकल्यासारखंच वाटतं. अ‍ॅडमिशन घेऊन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश केल्यावर मात्र खरा प्रवास सुरू होतो. घरापासून दूर राहून शिक्षणाला सुरुवात होते. पाच वर्षे या शिक्षणात जातात. वयाच्या 22 किंवा 23व्या वर्षी होतात एमबीबीएसची डिग्री पडते. म्हणायला नावासमोर ‘डॉक्टर’ अशी ‘डॉ’ पदवी लागते. घरात आजूबाजूच्यांकडून खूप कौतुक होतं. एक स्वप्न पूर्ण झालेलं असतं. पण ते तेवढंच, घरच्यांना वाटतं, पोरगं डॉक्टर झालं आता खूप पैसा कमावणार.प्रत्यक्षात मात्र नुसतं एमबीबीएस करून पॅ्रक्टिस करता येणं शक्य नाही, हे त्या डॉक्टर झालेल्या मुलाला किंवा मुलीला कळून चुकलेलं असतं. बरोबरचे मित्र-मैत्रिणी तोवर उत्तम नोकरी पत्करून मार्गी लागलेले असतात. तेव्हा यांची पुन्हा पदव्युत्तर प्रवेशाच्या अभ्यासाला सुरुवात झालेली असते. जो तो म्हणतो, स्पेशलायझेशनला पर्याय नाही. मग रात्रंदिवस अभ्यास. पुन्हा ती परीक्षाही  पहिल्याच प्रय}ात क्रॅक होतेच असं नाही. दुसरीकडे डिग्री हातात आल्यावर एक वर्षाच्या बॉण्डसाठी काम करावं लागतं. स्पेशलायझेशनला जाता जाता पंचविशी सहज येते. आणि स्पेशलायझेशन आणि सुपर स्पेशलायझेशन हे चक्र पुढच्या पुढच्या भोवर्‍यात पाय ओढत राहतं.त्या चक्रावणार्‍या जगातल्या इण्टर्नी डॉक्टरांना भेटायलाच तर मी गेले होते. तेही मुंबईतल्या काही प्रख्यात सरकारी रुग्णालयांत. जिथं देशभरातून रुग्ण आलेले असतात. कॉरिडोरमध्ये शांतता आणि मंद दिव्याचा प्रकाश. एका 10 बाय 10च्या खोलीत तीन जण शांत झोपलेले. सकाळी साडेपाच वाजता एकाचा अलार्म जोरात वाजतो. दुसर्‍या दोघांना जाग येऊ नये म्हणून पटकन मोबाइल शोधून अलार्म बंद करतो. काल रात्री 2 वाजता झोपल्यानं आता उठायची अजिबातच इच्छा नाही. तरीही वॉर्ड राउण्ड घ्यायला 6 वाजता पोहचायचं असल्यानं तो उठतो. त्या छोटय़ाशा खोलीत दुसर्‍या दोघांची झोप डिस्टर्ब न करता टूथब्रश, पेस्ट, टॉवेल, कपडे घेऊन खोलीच्या तो बाहेर पडतो. त्या मजल्यावरच्या कॉमन टॉयलेटमध्ये फस्र्ट इअर स्टुण्डंटची आधीच रांग लागलेली असते. डोळे चोळतच एकमेकांना ‘गुड मॉर्निग’ केलं जातं. सहाला वॉर्डमध्ये जायचं म्हणून मधेच नंबर लावण्याची विनंती केली जाते. एखाद्याला उशिरा जायचं असल्यानं संधी मिळते. नंबर लागल्यावर पटकन 10 मिनिटांत सगळं आवरून रूम गाठतो. रूमवर आल्यावर दुसर्‍याला उठवून थेट हॉस्पिटलच्या वॉर्डच्या इमारतीकडे धाव घेतो.वॉर्डमध्ये जवळपास तीस पेशंट असतात. प्रत्येक पेशंटची फाईल पाहायची. त्याच्या कोणत्या तपासण्या केल्या आहेत, याची नोंद करायची. त्या तपासण्यांचे अहवाल आलेत का याची खातरजमा करायची. कोणत्या तपासण्या करायच्या आहेत त्यासाठी रक्त घ्यायचं आहे का, हे पाहायचं. पेशंटचं बीपी, हिमोग्लोबिन अन्य सामान्य तपासण्या करून ते रीडिंग लिहून ठेवायचं. यात तासभर जातो. त्यानंतर सातच्या सुमारास सेकंड इअरचा डॉक्टर वॉर्डमध्ये येतो. फाईल हातात घेऊन सगळं बरोबर आहे का, तपासतो. त्यात काही राहिलं असल्यास तिथंच लगेच काहीवेळा ओरडाआरडा करत तर काहीवेळा शांतपणे सांगतो. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत ते पूर्ण करणे आवश्यक असते. ऑर्थोपेडिक्स किंवा सजर्री वॉर्ड असेल तर ऑपरेशनच्या दिवशी ड्रेसिंग करणं हे अजून काम असतं. साडेसातच्या सुमारास थर्ड इअरचे डॉक्टर वॉर्डमध्ये येऊन राउण्ड घेतात. आणि 8 वाजता मुख्य डॉक्टर वॉर्डमध्ये हजेरी लावतात. त्यावेळी त्यांना सगळं कसं नीटनेटकं लागतं.

एकाही रुग्णाच्या फाईलमध्ये काहीही राहिलेलं चालत नाही. शिस्तच ती. महत्त्वाचीही असते. मग सगळ्या राउण्डची माहिती दिल्यावर साडेआठ-पावणेनऊच्या सुमारास बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) पोहचावं लागतं. तिथे जाईर्पयतच आज किती काम आहे याचा अंदाज आलेला असतो. रुग्णांसह त्यांचे नातेवाईक ओपीडीमध्ये रांगेत बसलेले असतात. तिथे सकाळपासूनच गर्दी झालेली असते. एखादा तास थांबायला लागल्यानं डॉक्टर उशिरा आले, आता पुढे इतके नंबर मग कधी तपासणार अशा नजरा झेलतच ओपीडीत प्रवेश होतो. ओपीडीत जाण्याआधी 5 ते 10 मिनिटांचा वेळ मिळालाच त्यात नास्त्यासाठी धावत जावं लागतं. कॅण्टीनमध्ये गर्दी असल्यास तिथेही खायला मिळत नाही. अशावेळी परत धावत रूममध्ये जाऊन जे असेल आणि खरं म्हणजे पटकन समोर दिसेल ते खाऊन घ्यावं लागतं. यावेळीही रूममध्ये अंथरूण, पांघरूणं तशीच पडलेली असतात. अभ्यासाची पुस्तक तशीच अर्धवट बंद केलेली असतात. पण, याकडे पाहायला वेळ नसतो. ओपीडीत जाणं भाग असतं.अनेकदा ओपीडीत बसल्यावर एका मागून एक रुग्ण येतच असतात. रुग्णांशी संवाद साधणं मनात असले तरीही शक्य होत नाही. कारण, कारण एका रुग्णाला पाहण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटे असतात. या इतक्या कमी वेळात रुग्णाशी संवाद कसा साधणार? त्यांना काय त्रास होतोय, आधी कधी असा त्रास झालेला का? हे प्रश्न विचारता विचारताच तपासावे लागते. त्यानंतर अजून काही लक्षणं आहेत का? हे विचारावं लागते. यानंतर नक्की काय आजार असेल याचा विचार करून निश्चित करावा लागतो. तो आजार रुग्णाला सांगावा लागतो. त्याचवेळी औषधं लिहून देणं भाग असते. ही सगळी प्रक्रिया सुरू असताना औषधं कशी घ्यायची, पुढील तपासण्या कुठे करायच्या याचंही मार्गदर्शन करावं लागतं. या रुग्णाचे त्याच्या नातेवाइकांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना मागचा रुग्ण समोर उभा ठाकलेला असतो. त्यामुळे या रुग्णाला तपासून उठवताना दुसरा रुग्ण बसलेला असतो. असे एका मागून एक रुग्ण पाहताना 1 वाजतो. पण, त्यावेळीही रुग्ण असल्यास त्यांना तपासून सर्वसाधारणपणे 1.30 वाजता ओपीडी बंद होते.अशी सगळी कहाणी अनेक दोस्त सांगत असतात. त्यांच्या ओपीडीत बसून हे चित्र अनुभवताना आपल्यालाच टेन्शन येतं अनेकदा. पहाटे सुरू झालेला त्यांचा दिवस आता अर्धा संपलेला असतो. पण, पोट मात्र पूर्ण रिकामंच असतं. पोटात काहीतरी ढकलावं म्हणून डबा खाण्यासाठी कॅण्टीनमध्ये धाव घ्यावी लागते तर कधी तरी रूमवर जायला मिळतं. डब्यांच्या रांगेतून आपला डबा शोधून घेऊन कॅण्टीनमध्ये बसायला जागा शोधावी लागते. डबा उघडल्यावर त्यात असणारी ती भाजी, आमटी, भात, पोळी, सलाड असा परिपूर्ण डबा वाटत असला तरी चव किती असते आणि सकस किती असतो, असले प्रश्न विचारयचे नसतात. पोटाला आधार मिळतोय ना मग तेच अन्न ढकलायचं. तेही रोज नशिबात असतेच असं नाही. त्यामुळे ज्या दिवशी आहे त्या दिवशी गोड मानून घ्यायचे. दुपारी जेवायला बसताना थोडी काही मिनिटं मिळतात, त्यावेळी घराची आठवण येते. सकाळपासून घरात आई-बाबा, बहीण-भाऊ यांच्याविषयी एक मिनिटही विचार करायला वेळ मिळालेला नसतो. घरात काय चाललं आहे हेदेखील माहीत नसतं.इतक्यात 2 वाजतात. ओपीडीमधली रुग्णांची गर्दी ओसरलेली असते. पण, तरीही लेक्चरची वेळ झालेली असल्यानं पुन्हा एकदा डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं. लेक्चर म्हणजे काहीवेळा प्रेझेंटेशन होतात. प्रत्येकवेळी शिकवलं जातं असं नाही. त्यामुळे एमडी, एमएसची पदवी घेण्यासाठी अभ्यासाची जबाबदारी स्वतर्‍च घ्यावी लागते. पहिल्या वर्षात असताना प्रॅक्टिस म्हणून रुग्ण पाहणं आणि स्वतर्‍च पुस्तकं वाचून समजून घेणं हे सुरू असतं. दोन तासांचं लेक्चर संपलं की चार-साडेचारच्या सुमारास पुन्हा एकदा वॉर्डमध्ये जावं लागतं. नवीन अ‍ॅडमिशन झालेल्या असतात. रुग्णाची अ‍ॅडमिशन प्रोसेस नीट पूर्ण केली ना तपासून फाईल तयार करायची. त्यात झालेल्या तपासण्या, रिपोर्ट पाहायचे. त्यानंतर आधीच्या रुग्णांना तपासायचे. या सगळ्यात सहजच दीड ते दोन तास जातात. सायंकाळी साडेसहा सातला वॉर्डमधलं काम संपतं. आता हे काम संपल्यावर आपसूकच रूमकडे पाय वळतात. कॉरिडोरमध्ये अंधार असतो. खोलीचं दार उघडतो तेव्हा दिवसभर बंद असल्यामुळे कुबट वास येतो. लाईट लावल्यावर सकाळी जाताना टाकून गेलेले कपडे, न उचलता आलेल्या गाद्या, रात्री उशिरार्पयत वाचून टाकलेली पुस्तके, वाळत टाकलेले कपडे, अर्धवट उघडी ठेवलेली बॅग, अर्धवट खाऊन ठेवलेली पॅकेट्स सगळं कसं अगदी जागच्या जागीच असतं  या सगळ्यातून उरलेल्या जागी पाठ टेकावीशी वाटते. अनेकदा जागा आधीच रूममेटने काबीज केलेली असते. शीण घालवण्यासाठी घरी कॉल केला जातो तेव्हा दिवसात पहिल्यांदा आपल्या व्यक्तींशी बोलणे होतं.थोड रिलॅक्स व्हावे म्हणून आजूबाजूचे मित्र एकत्र येतो. तेव्हापण अनेकदा विषय हे कामासंबंधीचे असतात. हॉस्पिटलच्या आवारात असल्यामुळे आवाजाची आणि अन्य गोष्टींची मर्यादा राखूनच मजामस्ती करावी लागते. कॉलवर असल्यास ज्या वॉर्डमधून फोन येईल त्या वॉर्डमध्ये रुग्णाला तपासणीसाठी धावावं लागतं. मग पुन्हा एकदा काहीतरी पोटात ढकलण्यासाठी डब्याची वाट पहावी लागते. जे जसं असेल तसं खावं लागते. पण, पुन्हा एकदा दिवसाची सुरुवात होते, कारण दिवसभरात अभ्यास झालेलाच नसतो.  रात्री हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्टेलमध्ये सामसूम झाल्यावर अभ्यास सुरू होतो. फस्र्ट इअरला तुलनेनं अभ्यासाचे प्रेशर कमी असतं. दुसर्‍या वर्षात थिसीसचा विषय ठरवणं, त्यावर अभ्यास सुरू करावा लागतो. तुमच्या गाइडशी तुमचं चांगलं असल्यास थिसिसमध्ये जास्त प्रोब्लेम येत नाही. पण, तसं नसल्यास अनेक चुका काढल्या जातात. असंच नाही, तसंच हवं, बदलून आणचे खेळ सुरू होतात. त्याचा तणाव वाढतो. दुसर्‍या वर्षाच्या सेकंड हाफनंतर परीक्षेचा अभ्यासही सुरू करावा लागतो. लेखी परीक्षेची तयारी सुरू होते. त्यामुळे रात्र कमी वाटू लागते. प्रॅक्टिकल नॉलेज असतं; पण लेखीसाठी पुन्हा एकदा पुस्तकं, नोट्स असा अभ्यास करावा लागतो. या सगळ्यात कधी रात्री एक दीड कधी वाचतात हे कळतही नाही. असा एक दिवस संपतो, दुसरा पुन्हा तसाच सुरू होतो.हे रोजच आहे. ज्या ज्या मुलामुलींशी बोलले, त्यांना आपलं नाव छापून यावं म्हणून वाटत नव्हतं. आपली परवड खुलेपणानं सांगायचीही नव्हती.पण एक डॉक्टर म्हणालाच, तीन वर्षे आम्ही असं चरकात जगतो. शेवटी अठ्ठावीस किंवा एकोणतीस वर्षार्पयत एमडी, एमएस डिग्री हातात मिळते. बॉण्डपण पूर्ण करायचाच असतो. एमबीबीएसनंतर बॉण्ड केला नसेल तर दोन वर्षाचा बॉण्ड असतो. यातच वयाची तिशी येते हे कळतही नाही. बाकीचे मित्र गाडी, घर घेऊन सेटल असतात. त्यांच्या नोकरीला सात ते आठ वर्षे झालेली असतात. अनेकांची लग्न झालेली असतात. आमचं काहीच खरं नसतं, म्हणायला आम्ही डॉक्टर झालेलो असतो!’पण त्याला विचारलं की, तुम्हाला विद्यावेतन मिळतं ना?तर अनेकांनी सांगितलं की घरच्यांना वाटतं मुलगा डॉक्टर झाला. खोर्‍यानं पैसे ओढेल, म्हणून मग काही पैसे घरी पाठवायचे असतात. पुस्तकांचा खर्च, कॉन्फरन्सला जाण्याचा खर्च, घराबाहेर राहत असल्यानं स्वतर्‍चा खर्च असे अनेक खर्च असतात. या सगळ्यात लग्न हा विषयावर विचार करायलाही फुरसत मिळत नाही. त्यात लग्न कर म्हणून घरचे मागे लागतात. कमाई नाही, एकत्र राहण्यासाठी डोक्यावर छत नाही. हॉस्टेलमध्ये एकाला एक खोली कधीच मिळत नाही, शेअरिंग शिवाय पर्याय नाही. त्या खोल्याही इतक्या लहान असतात की तिथे संसार थाटणं शक्य नाही. नवरा किंवा बायको त्याच हॉस्पिटलमध्ये शिकत असेल तर तुम्हाला एक स्वतंत्र खोली मिळू शकते. पण, अनेकदा तेही शक्य होत नाही. वयाच्या विसाव्या वर्षी सुरू झालेला डॉक्टर होण्याचा प्रवास असा तिशीत येतो. भयंकर ताण, कष्ट, अवतीभोवती ‘सहन’ करावे लागणारे अनेक क्षण यात आम्ही स्वतर्‍ला सामावून घेत राहतो.असं ही मुलं सांगतात.पण ते सांगत नाहीत असा बराच ताण, त्यांच्या जगात नक्की आहे असं बरंच बोलूनही वाटत राहतं.

(पूजा स्वतंत्र पत्रकार आहे.)