शहरं
Join us  
Trending Stories
1
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
2
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
3
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
4
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
5
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
6
मी नवखा उमेदवार नाही, माझं काम हा माझा ब्रँड; रवींद्र वायकर यांची पहिली प्रतिक्रिया
7
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
8
... मग मोदी टीका करणारच; भटकत्या आत्म्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
9
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक
10
T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ; टेम्बा बवुमाला डच्चू!
11
“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
अमित शहा फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक
13
बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
14
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं
15
IPL 2024 MI vs LSG: Mumbai Indians च्या संघात केला जाणार महत्त्वाचा बदल? 'या' स्टार खेळाडूला संघात स्थान मिळण्याची शक्यता
16
INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?
17
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
18
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
19
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
20
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

पोटासाठी आणि मनासाठी करायचं काम एकच असेल तर छानच, पण  नसेल  तर ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 5:25 PM

आपल्या क्षमता ओळखा त्यावर पोट भरा, आवडीचं काम वेगळं शोधा. सांगताहेत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे

ठळक मुद्देहला.. कृती करा!

डॉ. मोहन आगाशे

तरुण पोरांकडे पाहून मागच्या पिढीला वाटतं, यांना कसं काय काहीच अडचणीचं वाटत नाही?  निदान मी तरुण असताना तरी वडीलधा:यांना वाटायचं की, ही मुलं कशी बिंधास्त आहेत.तसंच असतं ते वय. लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी धमकी असते. ऊर्जा भरपूर आणि गरजा कमी असतात. पण आता माध्यमांमुळे  काय झालंय, की नसलेल्या गरजा आपल्या ‘गरजा’ आहेत, गरजेचे नसलेले पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत अशा सगळ्या धारणा पक्क्या होताहेत. मला वाटतं ही मनोभूमिका तरु णांनी आधी बदलली पाहिजे.पूर्वी माणसांना खूप कष्ट केल्याखेरीज, मोठं झाल्याखेरीज खूप पैसे मिळायचे नाहीत. लोक म्हातारं झाल्यावर कुठंतरी बंगले बांधायचे आणि त्याला श्रमसाफल्य  नाव द्यायचे. आता नोकरीला लागलं, की लगेच तीन बेडरूमचा फ्लॅट, गाडी सगळं घ्यायचं आणि मग त्याचा इएमआय भरत राहायचा. ही नवी आलेली विचारधारा आहे.  आत्ता चैन करा या अशा तत्त्वज्ञानात जे अडकलेत त्यांची मला काळजी वाटते याकाळात.दादा कोंडकेच्या तोंडी ‘विच्छा माझी पुरी करा’च्या बतावणीत एक संवाद आहे, वसंत सबनिसांनी लिहिलेला. दादा म्हणतात, ‘शिकलेल्या लोकांचं काय माहिताय का, तुम्ही विचार करण्यात खूप वेळ घालवता.’तसं काहीतरी होतंय, यामुळं आपण कृतीर्पयत पोचतच नाही. त्यामुळे काय होतंय, ते मी जरा मोकळेपणानं बोलतो.

1. सध्याच्या काळात असुरक्षितता मात्न दिसते आहे. तिचं एक कारण मला दिसतं, की अनावश्यक माहितीचा भडीमार होतोय. आजच्या युगात हरेकाला अवास्तव माहिती मिळते आहे. चुकीची किती, बरोबर किती इथर्पयत कुणीच पोचत नाही. गूगल सांगतं म्हणजे ते बरोबरच असतं असं नाही. माहिती आणि ज्ञानाला अनुभवाची जोड द्यावी लागते.2. दुसरं म्हणजे तरु णांनी केवळ श्रीमंतीच्या मागं धावू नये.  आताची पिढी पैशानं विकत घेता येणारी स्वप्नं बघते. मग 100 र्वष जिवंत राहण्याची धडपड कशाला करायची?3. एक लक्षात घ्या, आता कोरोनामुळे उद्भवणा:या प्रश्नांना सोपी उत्तरं नाहीत. त्यासाठी जीवनशैलीच बदलली पाहिजे. व्यायाम, आहार , स्वच्छता यांची काळजी घेतली नाही तर वैद्यकशास्त्न कसं आणि किती काळ आपल्याला तारू शकेल, याचा प्रत्येकाने विचार करावा. 4. पोटासाठी आणि मनासाठी करायचं काम एकच असेल तर छानच. पण आवडलेली पोरगी आणि होणारी नवरी 99 टक्के लग्नात एक नसतेच अजूनही आपल्याकडे. आणि आवडलेल्या मुलीशी लग्न केल्यावरही संसार सुखाचा होतो याचीही खात्नी नसते. त्यामुळे  कामाचाही तसाच विचार करा.   आपल्या अॅबिलिटिज आणि इंटरेस्ट्स मॅच होत नसतील तर काय करायचं? तर अॅबिलिटिजने शीर सलामत राहील. मग इंटरेस्टप्रमाणो पगडी बदलता येईल!5. काटेकोर आखणी करायला आयुष्य काय बांधलेली इमारत आहे का? सगळ्या गोष्टी आपल्याच हातात असतात या भ्रमात राहू नये. आपल्या हातात असतं कष्ट करणं. 6. आपण स्वप्न पाहू शकतो.  स्वप्न पहायची असतात ती खरी करण्यासाठी.7. साधं सोपं सांगायचं तर सांगेन, झोप आणि भूक चांगली लागली पाहिजे असं जगावं. काहीतरी चुकीचं वागल्यावर झोप कशी लागेल?8. मी कलावंत आहे. रंगमंचावर दीर्घकाळ वावरलो. थिएटरने मला झोप आणि भूक दिली. नाहीतर मऊमऊ गाद्या घालून झोप येत नसेल तर काय उपयोग?9. निसर्गाचा अभ्यास करा, त्याच्या जवळ जा. तुमच्या लक्षात येईल, निसर्ग खूप मोठा आहे. तुम्ही त्याच्या फक्त एक भाग आहात.  खूप पाऊस पडत असेल तर कुणाला कसला चॉइस नसतो. प्रत्येकाने आपला आडोसा शोधायचा असतो. भावनांचं अवडंबर माजवू नका. इमोशनल ब्लॅकमेलिंग आणि इंटलेकच्युअल मॅनिप्युलेशन या दोन्ही गोष्टींपासून आपण स्वत:ला वाचवलं पाहिजे.1क्. अनुभवांच्या निकषावर गोष्टी तपासून घ्यायला शिकलं पाहिजे. स्वत:शी आणि इतरांशी प्रामाणिक राहिलं पाहिजे.11. एकूणच समाज म्हणून आपण बुद्धिप्रामाण्यवादी कमी आणि भावनिक जास्त आहोत.  नीट जगलो तरच नीट मरण येईल.  हा विचार या कोरोनाकाळाच्या निमित्तानं मनाशी जगवूया.( डॉ. आगाशे मानसोपचारतज्ज्ञ आणि ख्यातनाम अभिनेते आहेत.)मुलाखत आणि शब्दांकन - शर्मिष्ठा भोसले