शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

तुम्हाला मोठं करिअर करायचं आहे? -मग इण्टर्नशिप शोधा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:13 IST

ड्रिम जॉब हवा आहे? नक्की हे करू की ते? या वळणावर उभे आहात? तर मग इण्टर्नशिप करून पहा.

ठळक मुद्देनोकरी नंतर आणि उन्हाळी सुटीत इण्टर्नशिप शोधा !

-सर्वेश अग्रवाल

आशिष चावला. मुंबईत इंजिनिअरिंग करणारा विद्यार्थी. इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्षाला असतानाच त्याला वेब डेव्हलपमेण्टची आवड निर्माण झाली. हे आपल्याला आवडतं, जमतं हे त्याला कळत होतं; पण आपण नेमके किती पाण्यात आहोत हे लक्षात येत नव्हतं. आपल्याला काय येतंय, काय शिकायला हवं, प्रॅक्टिकल ज्ञान काय आहे हे त्याला तपासून पहायचं होतं. मग त्यानं ठरवलं की, या विषयात काम करणार्‍या एखाद्या कंपनीत आपण इण्टर्नशिप करून पाहू. त्याच्या कॉलेजच्याच सिनिअर स्टुडण्टचा ब्लॉग मेण्टेन करण्याचं काम त्याला त्या सिनिअरच्याच कंपनीत मिळालं. त्याच दरम्यान त्याला ऑनलाइन इण्टर्नशिप प्लॅटफॉर्म विषयी कळलं. त्यानं मग वेगवेगळ्या ठिकाणी  अ‍ॅप्लिकेशन पाठवायला सुरुवात केली. वर्डप्रेस डेव्हलपर कंपनीत त्याला इण्टर्नशिप मिळाली. तीन महिन्यांची इण्टर्नशिप होती. त्यातून त्याला प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव मिळाला. उत्तम प्रोफेशनल अनुभव त्याला मिळाला.मग सुटीत अशाच इण्टर्नशिप करण्याचं त्यानं ठरवलं. इंजिनिअरिंग आणि अनेक वेब टेक्नॉलॉजीच्या कंपन्यांमध्ये त्यानं इण्र्टनशिप केली. त्याची पदवी संपता संपता त्याच्याकडे टेक्निकल स्किल्स तर होतेच; पण त्यानं अनेक ठिकाणी प्रत्यक्ष काम केलं असल्याचा अनुभवही होता. त्यानं त्याचा रिझ्यूम इतरांपेक्षा वेगळा दिसत होता. कॉलेज प्लेसमेण्टमध्ये त्याला त्यामुळे अजिबात झगडावं लागलं नाही. दरम्यान त्याला दुबईतल्या एका एज्युकेशनल स्टार्टअपमध्ये इण्र्टनशिप मिळाली. सहा महिने त्याला तिथं काम करता आलं.  तीन महिन्यानंतरच त्याला एका मोठय़ा कंपनीचं अपॉइण्टमेंट लेटर दिलं. त्यानं या कंपनीला सांगितलं की, मला नोकरी मिळाली असल्यानं मी ही इण्र्टनशिप सोडत आहे. त्यावर त्यांनीच त्याला आपल्या कंपनीत नोकरी दिली. दुबईत त्याला स्टॅक डेव्हलपरची नोकरी मिळाली. एकावेळी हातात इंजिनिअरिंगची आणि वेब डेव्हलपमेण्टची नोकरी होती. मग त्यानं आपल्याला आवडत असलेलंच काम करायचं ठरवलं आणि आणि वेब डेव्हलपमेण्टचीच दुबईतली नोकरी स्वीकारली.आता सांगा, आशिषने इण्टर्नशिप करून आपल्याला नक्की काय काम आवडतं, हे प्रत्यक्ष अनुभव घेऊन तपासलं नसतं तर त्याला आपल्याला नक्की काय आवडतं, काय संधी आहेत, हे कसं समजलं असतं? त्याला नाकासमोर मिळेल ती नोकरी करत समाधान मानावं लागलं असतं.त्याहून महत्त्वाचं म्हणजे हल्ली कंपन्या नोकर्‍या देतात तेव्हा प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती, क्षमता किती हे पाहतात. अगदी एण्ट्री लेव्हल जॉबसाठीही हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे इण्टर्नशिप करणं ही संधी आहे हे लक्षात घ्या. ते आता अनेक तरुण मुलांना कळतं इतकंच काय तर हायस्कूलमध्ये जाणार्‍या विद्याथ्र्यानाही इण्टर्नशिप करता येते. इण्टर्नशिपने तुम्हाला प्रोफेशनल अनुभव तर मिळतोच; पण नवीन स्किल सेट मिळतात. करिअर सुरू करण्यापूर्वी आवडत्या क्षेत्रात काम करून पाहता येतं.त्यामुळे इण्टर्नशिप करणं फार महत्त्वाचं आहे. ते का महत्त्वाचं आहे हे सांगणारी 5 कारणं मी इथं नोंदवतो आहे, निदान त्या कारणांसाठी तरी तुम्ही इण्र्टनशिप करायलाच हवी.

1. अनुभवमुळात  इण्टर्नशिपची कल्पनाच यातून जन्माला आली की, प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा. कामाचं वातावरण नेमकं कस असतं, काम कसं चालतं हे कळावं. त्या वातावरणाचा सराव व्हावा. इण्टर्नशिप करताना तुम्ही अनेक लहान-मोठी कामं करता. अगदी व्यावसायिक इमेल्स लिहिणं, कस्टमर कॉल घेणं, त्यावर बोलणं, प्रोजेक्ट सांभाळणं, एखादं काम स्वतर्‍ करणं किंवा टीम लिडर म्हणून करून घेणं. प्रत्यक्ष काम करताना काही संघर्ष वाटय़ाला येतात, ते हाताळण्याचं प्रशिक्षण मिळतं. अगदी कुणी उद्धट बोलतं, अपमान करणं हे सहन करण्यापासून शांत राहण्यार्पयतचे अनुभव मिळतात. व्यावसायिक वातावरणातली शिस्त, तिथलं वागणं यासाठी इण्टर्नशिप तुम्हाला तयार करते. कामाची मूल्यं कळतात. ती शिकता येतात, ती जगायची कशी हे कळतं. इमेल लिहिणं, फोनवर बोलणं यातली शिस्त, सहजता, एटिकेट्स ते संयम, पॉझिटिव्ह अ‍ॅटिटय़ूड, कामावरची निष्ठा, परिस्थितीशी जुळवून घेणं, स्वतर्‍ला सतत प्रेरणा देत राहणं हे सारं इण्टर्नशिप शिकवते.

2. करिअरचा मोठा निर्णय घेण्यापूर्वी.इण्टर्नशिप छोटय़ा कालावधीसाठी असते. साधारण 1 ते 6 महिन्यांचा हा काळ. आपल्याला जे क्षेत्र आवडतं, जे स्किल्स येतात, जे काम आवडतं असं वाटतं ते खरोखर आपल्याला आवडतं का, ते या काळात तपासून पाहता येतं. उदा. तुम्ही इंजिनिअरिंग करताय आणि तुम्हाला लेखन आवडतं, सुचतं. तर मग एखाद्या वर्तमानपत्रात किंवा क्रिएटिव्ह रायटिंग फर्ममध्ये इण्टर्नशिप करून पहा. त्यातून तुम्हाला आवाका कळेल. आणि मग नेमकं आपल्याला कशात करिअर करायचं हा निर्णय घेणं सोपं होईल.3. करिअर रेडीपदवी आहे; पण ‘लायक’ नाहीत, प्रत्यक्ष काम करता येत नाही अशी तक्रार वारंवार केली जाते. त्यामुळे इण्टर्नशिप करून प्रत्यक्ष अनुभव घेतलेला असेल तर स्किल्स शिकता येतील. काही चांगली व्यावसा¨यक माणसं तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमचे मेण्टॉर होतील. त्यातून तुम्ही काम शिकाल, करिअर रेडी व्हाल. वर्क एथिक्स, अप टू डेट स्किल्स, कामाचं एक्सपोजर, आत्मविश्वास ही सारी कमाई तुम्हाला इण्टर्नशिप करून देते.4. टाइम मॅनेजमेण्टअनेकदा उत्तम गुणवत्ता असलेल्या माणसांना सगळं  येतं; पण टाइम मॅनेजमेण्ट येत नाही. टाइम मॅनजेमेण्ट आणि वर्क एफिशियन्सी हे सध्या परवलीचे शब्द झालेले आहेत. इण्टर्नशिप तुम्हाला हे कामाचं नियोजन शिकवते.

5. ड्रिम जॉबच्या दिशेनं एक पाऊलअनुभव मिळतो, स्किल्स शिकता येतात, नव्या जगात दाखल होता येतं आणि उत्तम काम येत असेल तर अनेक कंपन्या नोकर्‍याही देतात. त्यामुळे आपल्या शक्यता वाढतात. आपण नुस्ता ड्रिम जॉबचा विचार करत राहिलो तर तो मिळणार नाही. त्यादिशेनं एकेक पाऊल पुढं टाकावं लागेल, आपलं नेटवर्क वाढवावं लागेल आणि म्हणूनही इण्टर्नशिप महत्त्वाची आहे.

( संस्थापक आणि सीईओ इण्र्टनशाला)