आनंदवनातल्या श्रमसंस्कार छावणीला जायचंय?
By Admin | Updated: March 31, 2016 14:30 IST2016-03-31T14:30:07+5:302016-03-31T14:30:07+5:30
मी, माझीे खोली, माझे मित्र, माझे कॉलेज, माझे स्वातंत्र्य, सारा सारा ‘माझा’च बोलबाला. असा मी, आजचा तरुण!

आनंदवनातल्या श्रमसंस्कार छावणीला जायचंय?
मी, माझीे खोली, माझे मित्र, माझे कॉलेज, माझे स्वातंत्र्य, सारा सारा ‘माझा’च बोलबाला. असा मी, आजचा तरुण! वयाची सोळा वर्षे उलटली की आईवडिल, संस्कार हे सगळे कसे मागे पडत जाते आणि ‘माझं’ हे आयुष्य आता एकदाचे सर्वस्वी ‘माङया’ ताब्यात आल्याचा आभास होत असतो. हार्मोन्स नकळत माङया तारुण्याचा आपसूकपणो ताबा घेतात आणि मी जास्तीत जास्त उन्मादाचे क्षण अनुभवायला अधिकाधिक मर्यादा ओलांडायला लागतो. यासा:यात माझा मीच माङयापासून दुरावत जातो.
प्रश्नांच्या भोव:यात, प्रेमात, अध्यामात, कामात जगण्याचा खरा अर्थ काय असा प्रश्न कधीकधी छळू लागतो.
सुमारे 67 वर्षापूर्वी अशाच एका तरुणाला एका पावसाळी रात्री गटाराशेजारी कुष्ठरोगाने पिडीत असलेलं एक जिवंत प्रेत दिसलं आणि भीतीने तो घरी पळून गेला. रेल्वेतून प्रवास करताना एका भारतीय स्त्रीशी अतिप्रसंग करणा:या ब्रिटीश सोजीरांशी अभूतपूर्व लढा देणारा, गांधीजींनी ‘अभयसाधक’ म्हणून गौरविलेला तो एका जिवंत माणसाला बघून चक्क पळून गेला! काही वेळ प्रचंड अवस्थतेत गेल्यानंतर केवळ स्वत:च्या भीतीवर विजय मिळवायला म्हणून तो परतला व त्या कुष्ठरुग्णाची जमेल ती सेवा केली. त्या तरुणाच्या कुशीत प्प्राण सोडतांना त्या कुष्ठरोग्याच्या डोळ्यांत जे चैतन्य होते त्यात त्याला तारुण्याचं गुपित उलगडलं. जिथे भीती आहे तिथे प्रीती नाही, जिथे प्रीती नाही तिथे परमेश्वर नाही’.. त्या चैतन्याच्या तीव्र ओढीने या तरुणाने आपले आयुष्य कुष्ठरुग्णांसाठी झोकून द्यायचे ठरविले.
हाच तो चीरतरुण मुरलीधर देविदास आमटे आज ‘बाबा आमटे’ नावाने अजरामर झाला आहे. त्याने अमर्याद श्रमांतून कुष्ठरुग्णांसमवेत घनघोर निबिड अरण्यात आनंदवन उभारलं. आणि हट्टय़ाकट्टय़ा युवाशक्तीच्या अंतरात्म्याला साद घालण्यासाठी 1967 साली मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात चंद्रपूर जिल्ह्यातील सोमनाथच्या निबिड अरण्यात एक छावणी उभारली. तिचं नाव ‘श्रम-संस्कार छावणी’.
ही छावणी गेली 48 वर्षे तशीच अव्याहत सुरु आहे. छावणीचा मंत्र एकच- ‘श्रम ही है श्रीराम हमारा। छावणी दरवर्षी 15ते 22 मे या कालावधीत भरते.
ही छावणी काय शिकवते? छावणी साध्या साध्या गोष्टींतून जीवनाकडे बघण्याचा नवा दूष्टीकोन देते. देशाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी सामाजिक प्रश्नांकडे वातानुकुलीेत बिल्डींगच्या पारदर्शक तावदानातून दुर्बीण लावून न बघता शेताच्या बांधावर बसून मायक्रोस्कोप मधून बघावे लागते हे प्रकर्षाने जाणवते. श्रमदानात दगड उचलताना हाताला घट्टे पडतात तेव्हा कळतं की देशातील शेतीविषयक प्रश्नांचं अर्थशास्त्र समजण्यासाठी श्रमिकांच्या सोबत घाम गाळून अंग दुखवून घ्यावं लागतं.
छावणी कुठलाही कागद देत नाही पण तुमच्या घोटीव विचारांच्या पत्थरांमध्ये मुळांसारखी घुसुन जुन्या विचारांचे दगड चिरत जीवनरस आतवर भिनवायला जागा बनवते.
एका वेगळ्या, आव्हानात्मक, खरंतर ‘अर्थपूर्ण आणि आशयसंपन्न’ अशा आयुष्याचा शोध घेणा:या मनस्वी तरुणाईला छावणी यंदाही साद घालते आहे.
-डॉ. शीतल आमटे
सोमनाथ श्रमसंस्कार छावणी
छावणी कधी? -
15 ते 22 मे 2016,
वय- 10 वर्षे आणि पुढील व्यक्ती.
शुल्क- 750 रुपये
संपर्क- महारोगी सेवा समीती, वरोरा
फोन- 9689888381, 8408855522