Dont worry, U Know it well!
By Admin | Updated: May 28, 2015 14:34 IST2015-05-28T14:34:11+5:302015-05-28T14:34:11+5:30
फेसबुक व्हॉट्सअॅपवर इंग्रजी लिहिता-वाचता येतं ना, मग येतं की तुम्हाला इंग्रजी, घाबरता कशाला?

Dont worry, U Know it well!
>इंग्रजीची जाम भीती वाटते, काय करू?
माझं इंग्रजी फार कच्चं आहे, त्यामुळे परीक्षेत तर कमी मार्क मिळतातच, पण इंग्रजी मीडियमवाल्यांसमोर फारच वाबवळ पण दिसतो, त्यांच्याइतके स्मार्टही दिसत नाहीत, तर काय करायचं?
हे खरंय की, मातृभाषेत शिक्षण घेतलेल्या मुलांना इंग्रजीची भीती वाटते. आपलं इंग्रजी कच्चं आहे हा न्यूनगंडपण अनेकांच्या मनात असतो. पण मातृभाषेतून शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याच्या बेसिक कन्सेप्ट इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मुलांपेक्षा जास्त क्लिअर असतात असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. कारण ते भाषेतून विषय शिकतात आणि इंग्रजी माध्यमातील मुलं विषयातून भाषा शिकतात. खरंतर बेसिक कन्सेप्ट्स भविष्यातील यशाचा पाया असतात. नवीन भाषा केव्हाही आत्मसात करता येऊ शकते.
त्यामुळे आपल्याला चांगलं इंग्रजी येत नाही, कारण आपण मराठी मीडियममधून शिकलोय हा गंड मनातून काढून टाका. जर तुमचा विषय पक्का असेल, तुमच्या विषयातल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर केवळ इंग्रजी येत नाही म्हणून मागे हटायची काही गरज नाही.
विषयाचा पाया पक्का असणं ही तांत्रिक शिक्षण घेऊ इच्छिणा:या विद्याथ्र्याची जमेची बाजू असते.
टीव्हीवर नट-नटय़ांच्या मुलाखती बघून तुम्हाला न्यूनगंड येत असेल तर ते फारच वाईट. आयपीएलमध्ये क्रिकेटपटूंच्या मुलाखती तुम्ही ऐकल्यानं त्या इंग्रजीचं दडपण येऊन गांगरल्यासारखं होत असेल तर ते त्याहूनही वाईट. अमिताभ बच्चन आणि गावस्कर यांच्यासारखे काही अपवाद वगळता इतर सर्व सेलीबेट्रिज ‘यू नो’ पलीकडे अंगविक्षेप आणि चेह:यावरील विचित्र हावभावांनी मुलाखतीत वेळ मारून नेतात. म्हणूनच महाविद्यालयीन शिक्षणासाठी बाहेर पडत असताना हे टीव्हीवरचं इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमात शिकणा:यांचं वेळ मारून नेणारं इंग्रजी यांची भीती घरातल्या खुंटीवरच ठेवून निघा.
कारण तुम्हाला किती इंग्रजी येतं याच्याशी तुमच्या अभ्यासाचा संबंध नाही.
तुम्ही नीट विषय समजून घेतला तर या निव्वळ बोलक्या बदललेल्या इंग्रजीची धास्ती वाटण्याचं काहीच कारण नाही!
शॉर्टफॉर्म आणि
नवीन इंग्रजी भाषेचा जन्म
‘इलू’ हा शब्द तुमच्या कानावरून गेला असेल. ‘सौदागर’ या चित्रपटात कछव या शब्दाचा वापर झाला आणि प्रियकर आणि प्रेयसींना जणू जादूची कांडीच हाती लागली असं वाटून गेलं. ब:याच दिवसांनी सर्रास वापरण्यासाठी एक नवीन संक्षिप्तरूप सापडल्याचा आनंद झाला होता. आजही तो शब्द वापरला जातो, पण म्हणून हा शब्द इंग्रजी नाही.
टी. एस. एलियट या कवीच्या ‘वेस्टलँड’ या कवितेबाबतीत काही विद्वानांनी ‘तुकडय़ात विखुरलेल्या जगाचे तुकडय़ा विखुरलेले वर्णन’ असे केले आहे. आज मोबाइलच्या जगात डोकावले तर इंग्रजीसुद्धा नवनवीन संक्षिप्तरुपे शोधत नवनवीन तुकडय़ांमध्ये विभागली जात आहे. बांधेसूद गद्य, पद्य याचे गोडवे गाण्याचे दिवस संपुष्टात आल्यासारखे वाटावे असा ‘माहौल’ तयार झाला आहे. आजच्या पिढीचे ‘टेक्सटिंग’, ई-मेल, व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील संदेश वाचले तर लक्षात येतं की, एक नवीनच भाषा जन्माला येत आहे. हा प्रकार इंग्रजीच्या प्रकांड पंडितांना न पचणारा असला तरी प्रस्थापित झाला आहे ही वास्तविकता आहे.
जुन्या पिढीला साचेबंद संक्षिप्तरुपे मान्य होती. आज जी संक्षिप्तरुपे ‘ ‘ई’-इंग्रजी जगात वापरल्या जातात त्यांना कुठलाही धरबंध नाही.
या प्रकरणात जास्त लक्ष घातलं की लक्षात येतं की, ही इंग्रजी समूहापरत्वे बदलत असते. इंजिनिअरिंगच्या विद्याथ्र्याची एक वेगळी ‘बोली’ असते तर आर्ट्सवाल्याची वेगळी. तरुणांना त्याचं ‘डी कोडिंग’ सरावामुळे सोपं जातं.
शिक्षकांचा प्रयत्न असतो की, विद्याथ्र्याना इंग्रजीचं किमान ज्ञान तरी असावं. पण विद्याथ्र्याना कागदोपत्री इंग्रजी भाषा कठीणच वाटत राहिली आहे. पण आता ‘मोबाइल इंग्रजीत’ ते शिक्षकांपेक्षा आघाडीवर आहेत. भाषेच्या कुठल्याही पितृपुरुषाच्या आशीर्वादाशिवाय ही भाषा प्रस्थापित झाली आहे आणि या पिढीची गरजसुद्धा भागवत आहे.
आता पाळी आहे शिक्षकांची की त्यांनी इंग्रजीच्या या नव्या रुपाशी जुळतं घ्यावं आणि अडचण आल्यास विद्याथ्र्याची मदत घ्यावी. हेही मान्य करायला हवं की या ‘मोबाइल इंग्रजी’ने नवीन पिढीला जणू प्राणवायूच दिला आहे. ही भाषा अजून प्रगल्भ होत जाणार हेही निश्चित आहे. या प्रकारामुळे इंग्रजीचं सौंदर्य कमी होत आहे असे इंग्रजीचे जाणकार मानत नाही. उलट इंग्रजी समृद्ध होत आहे.
प्रत्येक पिढी आपल्या गरजांनुसार भाषेला वळवत असते. आजच्या पिढीने ई-इंग्रजी शोधून काढली आहे. खेडय़ापाडय़ातही ही भाषा ‘पॉप्युलर’ आहे. मुख्य म्हणजे ही भाषा संदेश वहनाचे काम यशस्वीपणो करीत आहे, जे भाषेचे मूळ कार्य आहे.
त्यामुळे उगीच इंग्रजीची भीती मनात ठेवून स्वत:ला कमी लेखू नका.
जे शिकायचं आहे त्यात भाषेचा अडसर होऊ नये इतपत भाषा शिका. पण केवळ भाषेला घाबरून मागे राहू नका.
पण आजच्या घटकेस तुम्हाला मोबाइल, ईमेल, फेसबुकवर इंग्रजी लिहिणं-वाचणं जमत असेल, संवाद साधता येत असेल तर बिनधास्त तुम्हाला आवडत असलेल्या विद्याशाखेत प्रवेश घ्या. तुम्हाला विषय समजला पाहिजे, भाषा जमेल! तिची धास्ती मनातून काढून टाका!
प्रा. डॉ. शिरीष उ-हेकर,
इंग्रजी विभागप्रमुख, समर्थ महाविद्यालय, लखानी, जि. भंडारा.
मोबी आणि लॅपीची इंग्रजी
इंजिनिअरिंगला जाणा:या मुलांना इंग्रजीची जास्त भीती वाटते. पण प्रवेशापूर्वी इंजिनिअरिंग करत असलेल्या एखाद्या दोस्ताच्या ग्रुपसोबत फक्त दोन दिवस घालवा, तुमची भीती गायब होईल. कारण इंजिनिअरिंग करणा:यांनी स्वत:चीच एक इंग्रजी भाषा आता वापरात आणली आहे. तिची ही झलक.
’lappylaptop
congocongratulations
picspictures
dipsDepartmental Store
nand
rare
uyou
2to
mobimobile
acall clear
deskyday scholar
camcamera
calcycalculator
propropose, programme
omgO My God!
ttulTalk to you later
fabfabulous
awsawesome