शहरी तारुण्याचा एक भन्नाट उपक्रम
By Admin | Updated: May 21, 2015 20:21 IST2015-05-21T20:21:33+5:302015-05-21T20:21:33+5:30
पश्चिम महाराष्ट्रातल्या एक छोटय़ाशा गावातला हा मुलगा. सध्या तो ईडीआय म्हणजेच आंत्रप्य्रुनरशिप डेव्हलपमेण्ट इन्स्टिटय़ूट

शहरी तारुण्याचा एक भन्नाट उपक्रम
सागर कारंडे
बीई करून ग्रामीण उद्योग
सागर कारंडे
राहुरी खुर्द, ता. फलटण, जिल्हा सातारा
हा त्याचा पत्ता. पश्चिम महाराष्ट्रातल्या एक छोटय़ाशा गावातला हा मुलगा. सध्या तो ईडीआय म्हणजेच आंत्रप्य्रुनरशिप डेव्हलपमेण्ट इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या नावाजलेल्या संस्थेत डेव्हलपमेण्ट स्टडीज आणि सोशल इंत्रप्रिनरशिपचा कोर्स करतो आहे!
ज्या संस्थेत देशभरातले ‘धडपडे’ मुलं स्वत:तला उद्योजक घडवायला येतात त्या अत्यंत प्रतिष्ठित संस्थेत शिकणारा हा मुलगा!
तो सांगतो, ‘बिझनेस करायच्या आयडिया डोक्यात कितीतरी येतात. पण आपण जे करू ते उत्तम, अत्यंत प्रोफेशनल आणि तरीही यशस्वी, समाजाभिमुख असेल हे जमायचं तर ट्रेनिंग लागतं. प्रशिक्षणच तुम्हाला उत्तम व्यवसाय करण्याची सूत्रं शिकवतं. ती सूत्रं मी शिकतोय. बाकी करायचं काय, हे माङया डोक्यात आधीपासून पक्कं आहे.’
सागरला सहकार क्षेत्रत काही भरीव उद्योग करायचा आहे. त्यासाठीच सध्या तो प्रशिक्षण घेतोय. पण या प्रशिक्षणार्पयत पोहचण्याची वाटसुद्धा सोपी नव्हती. तो सांगतो, ‘मी गावातला, त्यामुळे शेतीतले प्रश्न माहिती होते. वडील सहकारी संस्थेमधे आहेत, त्यामुळे ते जग माहिती होतं. मी शिकत असतानाच एकदोन जॉब करून पाहिले. त्यात मला काहीतरी सोशल अॅग्रीकल्चर बेस बिझनेस करायचा हे पक्कं होत गेलं. मात्र तेव्हाच मी बीई करत होतो, मेकॅनिकल इंजिनिअर बनत होतो. आणि मला काहीतरी वेगळं करायचं होतं. पण ‘डेव्हलपमेण्ट’ नावाचं नवीन क्षेत्र आकाराला येतं आहे, त्यात आपण उद्योजक बनू शकतो असं काहीही माहिती नव्हतं. मी शिकत होतो, पण इंजिनिअर म्हणून मला माझं करिअर काही दिसत नव्हतं. मग पुढं मला ‘इरमा’ नावाच्या संस्थेची माहिती मिळाली. तिथं रुरल मॅनेजमेण्ट शिकवतात. तिथंच मला इडीआय-अहमदाबादविषयी कळलं आणि मी तिकडे प्रशिक्षणाला गेलो. यात मी हेच शिकलो की, जे आपल्याला करायचं ते शोधत रहायचं. एकेक लिंक लागत जाते. माहिती मिळते.’
सागर हे सांगतो,पण बीई झालेल्या मुलानं अशी भलतीच वाट निवडणं सोपं कसं असेल? सागरला विचारलं तर तो सांगतो, ‘सुरुवातीला घरचेच काय पण मित्रसुद्धा विश्वास ठेवायला तयार नव्हते. मी समाजसेवा करायला निघालो आहे, असंच त्यांना वाटत होतं. आणि प्रश्न होताच, समाजसेवा करायची तर इंजिनिअरिंग कशाला केलं? असं सगळे जण म्हणू लागले. पण मी ठाम होतो. हळूहळू वडिलांनाही मी जे करतोय ते कळायला लागलं.’
सागरच्या डोक्यात हे पक्कंच आहे की, त्याला ग्रामीण भागात जाऊनच काम करायचं आहे. त्यामुळे आता तो दोन वर्षाची डिग्री पूर्ण करताच पुढं काय याचा विचार करतो आहे. सागर सांगतो, ‘डेव्हलपमेण्ट क्षेत्रत संधी अनेक आहेत. मार्केट पोटेन्शियलही जास्त आहे. आमची संस्था तर नुस्तं ट्रेनिंग नाही देत, तर व्यवसाय सुरू करायला मार्गदर्शन करते, मदत करते. ‘सीड फंडिंग’ म्हणजे बीजभांडवलही देते, तेही बिनव्याजी! फक्त हे सारं करायचं तर आपल्या डोक्यात काहीतरी एक्सायटिंग आयडिया पाहिजे, विषय ठाम पाहिजे आणि स्वत:च स्वत:ला ‘अपडेट’ करत राहण्याचं तंत्र जमलं पाहिजे.’
- सागरची ही तर सुरुवात आहे.
मात्र ग्रामीण उद्योजकतेच्या वाटेवर ठामपणो पाऊल टाकायची त्यानं तयारी केली आहे.
पंकज महाले
ब्रॅण्ड कुठला? ग्रामीण!
पंकज महाले.
यवतमाळ जिल्ह्यातल्या पैनगंगा तालुक्यातल्या गरुड आर्मी नावाच्या गावातला तरुण. टाटा समाजसेवा संस्थेमार्फत चालवला जाणारा ग्रामीण उद्योजक अभ्यासक्रम त्यानं नुकताच पूर्ण केला, तोही गोल्डमेडल जिंकून! टीसीएससारख्या संस्थेतल्या प्रतिष्ठित अभ्यासक्रमात अव्वल ठरणं ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट. त्याआधी पंकजने सोशल वर्कमधे एमए केलं. मात्र विदर्भात नुस्तं शेतीवर अवलंबून न राहता पर्यायी साधनांचा काही शोध घेता येईल का हे शोधण्याचा त्याचा प्रयत्न चालूच होता.
पंकज सांगतो, आमच्या घरची पाच एकर शेती. मी शेतीवर काम करत काही प्रयोग करतच होतो. त्याचवेळी लक्षात येत होतं की, शेतीशिवाय उत्पन्नाचं काही साधन हवं. ते नसेल तर नुस्त्या शेतीवर जगणं अवघड. एकतर शेती हंगामी, त्यात विदर्भातली. माङया वडिलांचा दुधाचा व्यवसाय होता.
मी माझा पहिला उद्योग तिथूनच सुरू केला. जुन्या वळणाचा दुग्धव्यवसाय मी मॉडीफाय केला. नीटनेटका गोठा बांधला, चारापाण्याचं नीट व्यवस्थापन केलं, दुधाचा व्यवसाय अधिक नेमक्या पद्धतीनं सुरू ठेवला.
गेल्या दोन वर्षात दुष्काळानं आमच्या भागात नापिकी झाली. सगळ्यांच्या घरावर आर्थिक ताण प्रचंड आला. खूप तंगी. त्यातल्या त्यात या व्यवसायानं आमच्या कुटुंबाला तारलं! त्यानंतर मी अधिक बारकाईनं अभ्यास करू लागलो की, आपल्या भागात असा काही उद्योग सगळ्याच गावासाठी सुरू करता यायला हवा.
साधा हिशेब आहे, माङया गावात शंभर घरं. एकरी 25 क्विंटल कापसाचं उत्पन्न निघतं. म्हणजे गावातच आठ हजार क्विंटल सरासरी कापसाचं उत्पादन होतं. मात्र तरीही गावातले 95 टक्के शेतकरी गरीबच, कर्जबाजारीच असं का?
कारण आमच्या गावात एकही प्रोसेसिंग युनिट नाही. कापूस, सोयाबिनचं उत्पादन होतं. पण शेतक:यांकडून जेमतेम किमतीनं घेतलेलं हे उत्पादन बाहेर दामदुपटीनं विकलं जातं.
त्यामुळे नुस्त्या शेतीला पर्यायी म्हणून उद्योग सुरू करणं गरजेचं आहे. आणि ते करायचंच असेल तर ते दुस:या कुणी कशाला मीच करावं असं मी ठरवलंय. त्यासाठीच तर उद्योगाचं एक ‘फॉर्मल’ प्रशिक्षण मी घेतलं. त्या शिक्षणातून स्मार्ट उद्योग करण्याची सूत्रं शिकता आली.’
ग्रामीण भागातून येऊन शिकून पुन्हा ग्रामीण भागात जाणा:या पंकजला विचारलं, ‘पुढे स्कोप आहे या ग्रामीण उद्योजकतेला? तुला काय वाटतं?’
तर तो सांगतो, ‘खूप स्कोप आहे. ग्रामीण भागात करू तितके उद्योग कमी आहेत. मी काही महिला बचतगटांबरोबरही काम केलं होतं. मला वाटतं उत्पादन करण्यार्पयतच काम आपल्याला चांगलं जमतं. पण आपण उत्पादन केलेल्या वस्तू आणि गोष्टींचं मार्केटिंग करणं. त्याचं एका ब्रॅण्डमधे रूपांतर करणं आपल्याला जमत नाही. आणि ते जमवायचं असेल तर ग्रामीण उद्योजकतेचं प्रशिक्षण हवं. सोयाबिन नुस्तं पिकवून चालणार नाही, तर त्याचं तेल काढून त्याच्या ब्रॅण्डचा गाजावाजा पण करता यायला हवा! हे जमलं तर ग्रामीण उद्योगात खूप स्कोप आहे.’
एक दिवस आपलंही एक युनिट असेल, उद्योग सुरू होईल या प्रयत्नात सध्या पंकज आहे.
खरा स्कोप,
खेडय़ापाडय़ातच..
या दोस्तांचं कामच भन्नाट.
ते सगळेच उच्चशिक्षित. मुंबईसारख्या शहरात अॅण्टॉप हिलसारख्या उच्चभ्रू वस्तीत त्यांचं ऑफिस आहे. आणि ग्रुपचं नाव आहे, एसआरएस- म्हणजेच सायन्स फॉर सोसायटी!
या ग्रुपमधे बरेच जण वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ आहेत. काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनिअर्स. कुणी आयआयटीवाले, तर कुणी बीटेक. त्याचं काम एकच, ग्रामीण भागात वापरता येईल अशी टेक्नॉलॉजी आणि उपकरणं तयार करणं. टेक्नॉलॉजीचा वापर जास्तीत जास्त ग्रामीण भागातील लोकांना व्हावा आणि त्यांचं जीवनमान उंचवावं, कष्ट कमी व्हावेत म्हणून वेगवेगळी तांत्रिक उपकरणं हा ग्रुप तयार करतो.
त्यातलंच एक सोलर ड्रायर.
त्यासाठीचे तर त्यांना दोन पेटंटही मिळालेले आहेत.
हे सोलर ड्रायर काम काय करतं, तर वेगवेगळ्या भाज्या वाळवून देतं, तेही सौरऊर्जेवर. म्हणजे गावात वीज असो नसो, त्यानं काही फरक पडत नाही.
या सोलर ड्रायरचं काम प्रत्यक्ष नंदुरबार जिल्ह्यात सुरू असताना आणि भर उन्हात त्यासाठी दोन महिने दौरे करणा:या आश्विन पावडेशी बोलणं झालं. आश्विन या एसआरएसचा एक खंदा शिलेदार. तो सांगतो, ‘आमच्या ग्रुपचा हेतूच आहे की अशी उपकरणं तयार करायची जी थेट ग्रामीण भागात वापरली जातील. त्यासाठी ग्रामीण भागातील गरज ओळखून उपकरणं आम्ही बनवत आहोत. त्यातलंच हे एक सोलर ड्रायर. भाज्या वाळवण्याचं उपकरण. सध्या कैरी वाळवून त्याची पावडर करण्याची प्रक्रिया नंदुरबार भागात सुरू आहे, तिथं आमचं उपकरण वापरलं जातं.’
2क्क्8 मधे अनौपचारिकरीत्या हा ग्रुप सुरू झाला. वैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी यांनी काही दोस्तांना एकत्र करून काम सुरू केलं. 2क्11 मधे त्याची थेट नोंदणीच करण्यात आली.
त्यातून साकारलं हे सोलर ड्रायर. या ग्रुपचा प्रयत्न असा की, कच्च माल नाशवंत असतो. फार काळ शेतकरी तो टिकवून ठेवू शकत नाहीत. मात्र त्यावर प्रक्रिया केली तर ती पावडर टिकतेही आणि तिला बाजारपेठेत मागणीही जास्त आहे. एका उपकरणातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. दुसरं असंच एक उपकरण त्यांनी तयार केलं, अंडी उबवण्याचं यंत्र. वीज न वापरून अंडी उबवता येऊ शकतात असं हे एक सोलर यंत्र आहे. त्यातूनही एक जोडधंदा ग्रामीण भागात उपलब्ध होऊ शकतो. हळदीवर प्रक्रिया करण्याचं एक यंत्र, एक मदर केअर अॅपही त्यांनी डेव्हलप केलं. ज्या अतिधोकादायक गरोदरपणाच्या केसेस असतात त्या गरोदर मातांना योग्य वेळी मदत मिळवून देण्याचं काम हे अॅप करतं!
विशेष म्हणजे, ही सारी मुलं तशी शहरी आहेत. ग्रामीण भागात व्यवसाय करायचा आणि तंत्रज्ञानाचा वापर समाजासाठी करायचा म्हणून ते या ग्रामीण उद्योजकतेकडे वळले आहेत.
अश्विन स्वत: विदर्भातल्या अकोल्याचा, आता असतो मुंबईत, आणि आयआयटीमधे एमटेकही करतो आहे. तो सांगतो, ‘तंत्रज्ञान ग्रामीण भागात पोहचले तर जीवनमान सुधारेल असा आमच्या ग्रुपचा विश्वास आहे. म्हणूनच त्यांनी तयार केलेल्या उपकरणांसाठीचे पेटंटंही घेतले आहेत. दोन वर्षापूर्वी जागतिक स्तरावर घेण्यात आलेल्या एका स्पर्धेत त्यांच्या सोलर ड्रायरला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकही मिळालं होतं. 16 देशांतून आलेल्या 25क्क् एण्ट्रीजमधून या सोलर ड्रायरला 6क् हजार डॉलर्सचं बक्षीसही मिळालं.’
उच्चशिक्षित शहरी तारुण्याचं हे एक आश्वासक पाऊल आहे, ग्रामीण उद्योजकतेच्या दिशेनं!