सुटलेल्या कण्ट्रोलची घसरगुंडी
By Admin | Updated: October 29, 2015 16:26 IST2015-10-29T16:26:37+5:302015-10-29T16:26:37+5:30
अनेक जणांना वाटतं की, आपण काही बेवडे नाही, आपला आपल्यावर खूप कण्ट्रोल आहे. पण हा एक निव्वळ गैरसमज. सतत व्यसन करत असाल तर लवकरात लवकर व्यसनमुक्ती केंद्र गाठलं पाहिजे. नाहीतर व्यसन जगणं पोखरून टाकेलच!

सुटलेल्या कण्ट्रोलची घसरगुंडी
>‘मी बेवडा आहे पण तेवढा नाही’,
‘माझा माझ्यावर फूल कंट्रोल आहे’.
पण या म्हणण्याला काही अर्थ नसतो. आपलं व्यसन वाढलंय पण आपल्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती करू नये म्हणून बचावापोटी हे स्वत:ला आणि इतरांनाही सांगितलं जातं.
पण व्यसनी तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेण्याचे प्रमुख पाच हेतू लक्षात घेतले पाहिजेत.
व्यसनमुक्तीचं तंत्र, जगण्याचा मंत्र
व्यसनी व्यक्तीला पुन्हा एकदा कुटुंबात आणि मग समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचे प्रयत्न व्यसनमुक्ती केंद्रात केले जातात. व्यसनमुक्ती केंद्र हा तुरुंग नाही की काळकोठडी नाही. माणसाला सुधारण्याचं म्हणा किंवा अगदी योग्य शब्द म्हणजे व्यसनापासून लांब राहण्याचं निवासी शिबिर असतं. जशी शालेय मुलांची वेगवेगळी शिबिरे असतात तसंच हे व्यसनमुक्तीचं शिबिर.
या शिबिरात पाऊल टाकल्यापासून तो शिबिरातून बाहेर पडेपर्यंत इथे जे काही होत असतं त्या प्रत्येक गोष्टीत मानसिक आणि शारीरिक उपचार होत असतात. घडत असतात. याची जाणीव रुग्ण-मित्नाला सुरुवातीला होत नाही. कारण व्यसनी माणसाचं सगळ्यात मोठं वावडं असतं ते शिस्त या शब्दाशी. त्यांना फक्त एकाच गोष्टीत शिस्त हवी असते- ती म्हणजे नशा. व्यसनी माणसाचं जगणं म्हणजे कमालीची बेशिस्त दिनचर्या. कधीही उठावं, कधीही झोपावं, जेवला तर जेवला नाहीतर कुठे वडा-पाव खावा. नशेनंतर तर भूकतहान आठवत नाहीच. नशा आणि श्वास याच दोन गोष्टी त्याला जगायला पुरे असतात. कुटुंबाच्या जबाबदा:या, काम-धंद्यातील बांधिलकी याचा काही संबंध नसतो.
पण व्यसनमुक्ती केंद्रात येताच व्यसनी व्यक्तीला एकामागोमाग एक धक्के बसू लागतात. मिळेल तो बेड, मिळेल तो लॉकर, पंखा डोक्यावर असला तर नशीब किंवा कमनशीब. या उप्पर म्हणजे गणवेश. शाळा सुटल्यापासून गणवेश घालणं, तोही स्वत:च्या हाताने धुवून चांगलं ठेवणं, चहासाठी रांग, नाष्टय़ासाठी रांग, इतकंच नाही तर ताट, ग्लास आपणच धुवायचा. सगळं शिस्तीत. हे कधी जन्मात केलं नसतं. त्यामुळे हा तुरुंग आहे असे वाटू लागतं.
पण आठ दिवस झाले की आठ कधी वाजत आहेत आणि नाष्टा कधी मिळतोय असे होते. शरीराचे घडय़ाळ योग्य त:हेने सुरू होते. कोणतीही झोपेची गोळी न देता दहा वाजता घोरायला सुरु वात. आणि अनेकजण तर असे असतात की केंद्रात दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच सूर्योदय बघतात!
शारीरिक आजारांसाठी औषधोपचार आणि शारीरिक व्यायाम, मानसिक आजारांसाठी औषधे, योगासने आणि मानसोपचार दिले जातात.
विचारात परिवर्तन व्हावे म्हणून विविध गटोपचार, डायरी लिहिणो, महत्त्वाची पुस्तके वाचायला देणो, शिकलेल्या गोष्टींची उजळणी असे सर्व महत्त्वाचे उपचार केले जातात. मुक्तांगणमधील मित्नांना मग कधीतरी लक्षात येतं की, भांडी घासणं, केर काढणं, स्वत:चे कपडे धुणं, भाजी चिरणं ही कामं म्हणजे आपल्या अहंकाराला छेद देणंच असतं. सफाई करणं म्हणजे चुकीच्या विचारांची साफसफाई करणंच असतं.
अर्थात पहिल्या झटक्यात माणूस शिकेल असं नाही. आजार जितका जुना तितका उपचारांचा कालावधी मोठा करणं आणि व्यसनाकडे परत वळल्यास पुन्हा निवासी उपचार देणं, हे चक्र सुरू राहतं.
अशा चक्रात फिरून व्यसनमुक्त झालेली, व्यसनापासून धडा शिकलेली आणि इतरांचं व्यसन सोडवायला मदत करणारी अनेक माणसं या सा:या प्रवासात भेटली. त्यांचे अनुभव वाचून ‘ऑक्सिजन’च्या तरुण वाचकांनी व्यसनांना कायमचा नकार द्यावा म्हणून हा एक प्रय} होता. त्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील सर्वानी खूप मदत केली. त्यांच्यासह माङो सहकारी मनोज कार्तिक यांनीही मोलाची साथ दिली. त्या सगळ्यांना धन्यवाद म्हणत या मालिकेचा प्रवास आता इथेच थांबतोय.
धन्यवाद!
( समाप्त)
- आनंद पटवर्धन