तळव्यावरची नाजूक कला
By Admin | Updated: September 17, 2015 22:33 IST2015-09-17T22:33:09+5:302015-09-17T22:33:09+5:30
लहानपणी आवड, छंद म्हणून त्यांनी मेंदी रेखाटनास सुरुवात केली खरी; परंतु आज बॉलिवूडमधील विवाह समारंभही मेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत.

तळव्यावरची नाजूक कला
- उषा शाह
(मेंदी आर्टिस्ट)
लहानपणी आवड, छंद म्हणून त्यांनी मेंदी रेखाटनास सुरुवात केली खरी; परंतु आज बॉलिवूडमधील विवाह समारंभही मेंदीशिवाय पूर्ण होत नाहीत. ऐश्वर्या राय, रविना टंडन, काजोल, अजय देवगण, हृतिक रोशन, जॅकी श्रॉफ, नीता अंबानी, प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसेन यांनीही माङया डिझाईन्सचं कौतुक केलं. मेंदी काढण्यासाठी मी जगभर फिरलेय. मला वाटतं खरंच मेहंदी काढणं ही कला जुनी असली तरी आता तिचं रूप बदललंय. आणि माङयासाठी तर ही कलाच एक साधना आहे.
मध्य प्रदेशमधील अलिजापूर या छोटय़ा गावात जैन मारवाडी कुटुंबात माझा जन्म झाला. आकाशात उडणारे विमानही कधी पाहायला मिळाले नाही असे ते गाव. एकत्र कुटुंबात नऊ भावंडांबरोबर लहानची मोठी झाले. त्या काळात मारवाडी परिवारातील महिला सहसा घराबाहेर पडत नसत. घर, संसार, मुले-बाळे, सणवार हेच विश्व. काही काम करायचं तर कौटुंबिक वातावरणाच्या चौकटीत राहूनच करावं लागणार होतं. लहानपणापासूनच कलाकुसरीच्या वस्तू बनवून पाहण्याचा छंद होता. फेब्रिक पेंटिंग, हाती भरतकाम, रांगोळी काढणं हे छंद. पण सर्वाधिक हौस होती ती मेंदी काढण्याची.
मात्र स्वत:चा हा छंद स्वत:पुरताच व कुटुंबापुरताच मर्यादित होता. माङया कामाचा प्रवास सुरू झाला तो खरंतर माङया लगAानंतर. कमलेश शाह यांच्याशी लगA करून मुंबईत आले. आपल्या हातात जी कला आहे, कौशल्य आहे त्याचा व्यवसाय म्हणून विस्तारण्याचा विचारही मनाला शिवला नव्हता; पण वाळकेश्वर महिला मंडळाने घेतलेल्या मेहंदी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आणि तेथूनच मग सुरू झाला कलाविष्काराचा अनोखा प्रवास.. या स्पर्धेतील त्यांचे डिझाइन पाहून अनेकांनी त्यांच्याकडे मेंदी शिकवण्याचा हट्टच धरला. मग मेहंदीचे क्लास घेणं सुरू केलं.
‘एअर इंडिया’च्या ‘नमस्कार’ या मासिकात मेहंदी डिझाइन प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध अभिनेते कुमार गौरव यांची पत्नी नम्रता दत्त हिने ते पाहिल्यावर जाम आवडले. तिने मेहंदी काढायला तडक घरीच बोलावले. ‘मेंदी आर्टिस्ट’ म्हणून बॉलिवूडमधील ही जणू एंट्रीच होती. हळूहळू इतरांना माङया कामाची माहिती होत गेली. आणि काम वाढलं. आज माङयासोबत 3क् सहकारी काम करतात आणि ते दिवसभरात तब्बल एक हजार हातांवर मेंदी रेखाटतात.
पूर्वी मी माचिसमधील काडीने मेंदी काढत होते. पण आता टय़ूबही मिळतात. डिझाइन्सचेही तेच झाले आहे. लहान-मोठे ठिपके, सूर्य-चंद्र, पाने-फुले हेच आधी मेंदीत काढले जात असे. आता मात्र माङया डिझाइन्सचे क्षितिज विस्तारले आहे. या कलेमुळे मला अंबानी, बिर्ला यांसारख्या दिग्गजांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधता आला. मला मेंदीने रोजगार तर दिलाच; शिवाय आत्मविश्वासही दिला. कला, मग ती कोणतीही असो, तिच्यावर निष्ठा ठेवली तर ती असेच भरभरून देते, असे मला वाटते.