दीपिकाचे गिंघम चेक्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 07:36 IST2018-01-17T16:51:53+5:302018-01-18T07:36:37+5:30
शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते.

दीपिकाचे गिंघम चेक्स
- श्रुती साठे
ट्राय करताय का?
तरुण मुलगे काय घालतात?
शर्ट घेतानही प्लेन किंवा स्ट्राइप्स किंवा फार फार तर चेक्स शर्ट इथपर्यंतच त्यांची मजल. पुरु ष आणि महिलांसाठीच्या कपड्यात, स्टाइल आणि डिझाइनमध्ये कायमच खूप तफावत पहायला मिळते. आपण एखादं डिझाईन पाहूनही सांगू शकतो की, हे कोणासाठी आहे आणि खरं तर कुणासाठी नाही.
परंतु आजच्या ‘युनिसेक्स’ मानणाºया नव्या काळात काही प्रिंट्स, डिझाईन्स या जुन्या धारणेला अपवाद आहेत. त्यातच एक म्हणजे गिंघम चेक्स ! दीपिका पदुकोणने या चेक्सचा ड्रेस अलीकडेच घातला. गिंघम चेक्स असलेला आॅफ शोल्डर लॉँग टॉप घालून ती मस्त मिरवली. अंगभर चेक्स घालायचं तसं धाडसच; पण ते दीपिकाने केलं आणि तिला ते शोभलंही!
आता पुढचा प्रश्न. हे गिंघम चेक्स आपल्याला शोभेल का?
१) गिंघम चेक्समध्ये शर्ट, टॉप्स, ड्रेसेस, स्कर्ट उठून दिसतात. गिंघम चेक्स हे कॉटन किंवा कॉटन ब्लेंडमध्ये असल्याने ते कोणत्याही ॠतूत वापरण्यास योग्य असतात. फक्त ॠतूप्रमाणे स्टाइल ठरवावी इतकंच!
२) उन्हाळ्यात गिंघम चेक्स मधला स्लीव्हलेस फ्रंट ओपन शर्ट किंवा ड्रेस फ्रेश लूक देतो.
३) थंडीमध्ये फुल बाह्यांचा गिंघम चेक्स ड्रेस, किंवा कॉन्ट्रास्ट श्रग उत्तम.
४) गिंघम चेक्सचा टॉप किंवा ड्रेस आपल्याला शोभेल की नाही असा संकोच वाटत असेल तर गिंघम चेक्समध्ये स्टोल्ससुद्धा तुम्हाला ट्रेण्डी लूक देईल.
५) कपड्यांत ट्रायआउट करायचं नसेल तर पर्स, बॅग आणि सँडल्सचेही पर्याय उपलब्ध आहेत.
(श्रुती फॅशन डिझायनर आणि स्टायलिंग एक्सपर्ट आहे.)