डॅनियल दावारी र्जमन इराणी
By Admin | Updated: June 13, 2014 09:38 IST2014-06-13T09:38:53+5:302014-06-13T09:38:53+5:30
फुटबॉल जगाला जोडतो असं म्हणतात, पण ती आख्यायिका नाही हे पटवून घ्यायचं असेल तर इराणच्या गोलकिपरला भेटा.

डॅनियल दावारी र्जमन इराणी
फुटबॉल जगाला जोडतो असं म्हणतात, पण ती आख्यायिका नाही हे पटवून घ्यायचं असेल तर इराणच्या गोलकिपरला भेटा.
त्याचं नाव काही टॉप फुटबॉलर्सच्या यादीत नाही, पण आजच्या घडीला फुटबॉलवेड्या जगात त्याच्या नावाची चर्चा आहे. कारण त्याला संघात स्थान मिळावं म्हणून दोन देशांना डिप्लोमॅटिक चर्चाबिर्चा करायला लागल्या. त्या सार्या चर्चांना यश आलं म्हणून तर आता हा ‘र्जमन’ वळणाचा तरुण इराणचा गोलकिपर म्हणून फुटबॉलच्या मॅचसाठी किपिंग करणार आहे.
डॅनियलची आई र्जमन, वडील इराणी. त्याच्याकडे पासपोर्टही दोन आहेत. (म्हणजे नागरिकत्व दोन देशांचं) र्जमन पासपोर्टवर त्याचं नाव डॅनियल आहे तर इराण पासपोर्टवर मोहम्मद. ‘फिफा’वाल्यांना प्रश्न पडला की, हा माणूस नेमका कुठल्या देशाचा? शेवटी इराणीयन राजनैतिक अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटाघाटी करून हा प्रश्न सोडवला आणि डॅनियन दावारीचा इराणकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला.
अर्थात दावारीला फारसी बोलता येत नाही, तसा तो इराणी चेहर्यामोहर्याचाही नाही पण आपण ‘इराणी’च आहोत, असं म्हणत तो मैदानात उतरतोय.
दावारी वाढला र्जमनीतच. फ्रँकफर्टपासून ६0 किलोमीटर अंतरावरचं त्याचं गाव. फुटबॉल खेळत तो मोठा झाला. इराणच्या प्रशिक्षकांनी त्याला र्जमनीत खेळताना पाहिला. त्याचं टॅलण्ट आणि इराणी असणं, दोन्हीही जमून आलं आणि त्याचं इराणच्या संघात सिलेक्शन झालं.
इराणच्या टीमकडे या वर्ल्डकपमध्ये उत्सुकतेनं पाहिलं जात आहे, ही टीम उत्तम परफॉर्म करू शकते असा जाणकारांचा होरा आहे. तसं झालंच तर दावारीच्या गोलकिपिंगचा त्यात मोठा वाटा असेल.