६ सेकंदात सीव्ही रिजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:03 AM2018-05-17T09:03:58+5:302018-05-17T09:03:58+5:30

किती ठिकाणी सीव्ही पाठवला; पण साधा नोकरीचा कॉल येत नाही.. असं होतं का तुमचं? मग तुम्ही नक्कीच सहा सेकंदात रिजेक्ट होण्यासारख्या चुका करताहेत?

CV Reject In 6 Seconds | ६ सेकंदात सीव्ही रिजेक्ट

६ सेकंदात सीव्ही रिजेक्ट

Next


- नितेश महाजन

‘वॉण्टेड’ची जाहिरात दिसली की आपण तातडीनं सीव्ही मेल करतो. उत्साहानं मुलाखतीला येण्याच्या आमंत्रणाची वाट पाहतो. पण तसा काही ‘कॉल’ येत नाही. सीव्ही पे सीव्ही पाठवतो पण कायम नकारच. म्हणजे कुणी इंटरव्ह्यूलाही बोलवत नाही. असं का होत असेल?
या प्रकाराला म्हणतात ‘सिक्स सेकंद रिजेक्शन’. म्हणजे आपला सीव्ही हातात पडताच आणि तो पाहताच पहिल्या सहा सेकंदात नोकरी देणारे तो बाजूला टाकतात. त्याला रिजेक्ट करतात. सहा सेकंदात बाजूला सारावा इतका का आपला सीव्ही वाईट असतो? अनेकदा तर त्या नोकरीसाठी आवश्यक असलेल्या पात्रतेहून अधिक आपली पात्रता असते. शिक्षण, अनुभव दोन्ही असतं; पण तरी सीव्ही रिजेक्टच होतो. असं का होतं?
या सहा सेकंदात सीव्ही नाकारण्याच्या गुंत्यात काही चुका आपल्याचकडून होतात. आणि त्याचा परिणाम म्हणून हे रिजेक्शन आपल्या वाट्याला येतं. ताडून पाहा, या चुका आपण करतो का?

१) ग्रॅज्युएशनचं वर्ष
अनेकजण सीव्हीत अनेकदा ठळकपणे आपलं ग्रॅज्युएशन झाल्याचं वर्ष लिहितात, फर्स्ट क्लास मिळाला वगैरे सांगतात. तिथंच चुकतं, ते वर्ष पाहून नोकरी देणाऱ्यांना वाटतं, हा उमेदवार फार तरुण अनुभवी आहे, हा नको. त्याउलट काहींना वाटतं, हा फार वयस्क आहे. तरुण नाही हा नको. त्यामुळे गरज नसेल तर सीव्हीत ग्रॅज्युएशनचं वर्ष घालू नका.
२) ई-मेल आयडी
कॅचमीइफयूकॅन, स्मार्टनंबरवन, स्टाइलमारु, लाइव्हलॉँग, वगैरे स्वत:च्या नावापुढे लावलेल्या विशेषणाचा जर तुमचा ई-मेल आयडी असेल तर तो पाहूनच तुम्ही पोरकट आहात, असा समज होतो. साधं नाव असलेला ई-मेल आयडी हवा, उगीच भासमारू ई-मेल आयडी नको. तो असला की सीव्ही रिजेक्ट.
३) फोटो कशाला पाठवता?
जर जाहिरातीत तुमचा फोटो पाठवा असा स्पष्ट उल्लेख असेल तरच फोटो पाठवायचा. नाहीतर नाही, अनेकदा आपले फोटो पाहून गैरसमज वाढतो, काहीतरी भलताच समज होतो. आणि सीव्ही रिजेक्ट होतो.
४) किती नोकºया सोडल्या?
अनेकांना आपण फार नोकºया सोडल्या याचं भूषण वाटतं. ते अमुक ते अमुक साल अशी विशेष नोंद करून सीव्ही पाठवतात. लांबच लांब लिस्ट. नोकरी देणारा विचार करतो हा कुठंच टिकत नाही हा नको. त्यामुळे पूर्वी कुठं नोकरी केली ते लिहा, किती वर्षे केली तो कालखंड लिहूच नका.
५) शहर सोडायची तयारी?
दुसºया शहरात नोकरी असेल तर आपण या नोकरीसाठी त्या शहरात यायला तयार आहोत, असा स्पष्ट उल्लेख करा. नाहीतर बाहेरगावचा माणूस नको, हा ठप्पा मारून सीव्ही रिजेक्ट होतो.


 

Web Title: CV Reject In 6 Seconds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.