शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

Creativity - जग नव्या नजरेनं पाहण्याचं ‘हे’ कौशल्य नसेल तर तुमचं करिअर बाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 07:45 IST

क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता. खरं तर एबीसीडी. ऑल्वेज बी कनेक्टिंग द डॉट्स! ती कल्पक साखळी जोडणं हेच तर स्किल आहे.

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

अनेक मोठमोठय़ा कंपन्यांमध्ये अलीकडे ‘डिझाइन थिंकिंग’चा बोलबाला असतो. इन्फॉसिस कंपनीची सूत्नं काही र्वष हाती घेतलेल्या विशाल सिक्का यांनी कंपनीच्या कामकाजामध्ये प्रचंड मोठे बदल करण्याचा सपाटा सुरू केला आणि त्याचाच एक भाग म्हणून ‘डिझाइन थिंकिंग’वर प्रचंड भर दिला. इतरही अनेक भारतीय कंपन्यांमध्ये ही संकल्पना वेगानं राबवली जात आहे. याच्या मुळाशी सर्जनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी नावाची अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आजच्या आणि उद्याच्या व्यवसायांना सर्जनशीलतेशिवाय म्हणावं तसं यश लाभणार नाही असं मानलं जातं. म्हणूनच आपापल्या कर्मचार्‍यांना यासंदर्भात प्रशिक्षित करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.नवीन आणि कल्पक अशा प्रकारच्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवणं म्हणजे सर्जनशीलता. वरवर सहजपणे जाणवत नसलेल्या गोष्टींमधली नाती शोधणं, नव्या नजरेनं प्रश्नांकडे बघणं, त्यातून हे प्रश्न सोडवण्यासाठी एकदम नव्या मार्गाचा वापर करणं ही सर्जनशीलतेची वैशिष्टय़ं असतात. यात विचार करणं आणि त्या विचाराचं कृतीमध्ये रूपांतर करणं असे दोन टप्पे येतात. म्हणजेच नुसत्या नव्या संकल्पना असणं किंवा विचार करणं पुरेसं नसतं, हे सगळं अंमलात आणणं तितकंच महत्त्वाचं असतं. सर्जनशीलता आपल्या सगळ्यांमध्येच असते; फक्त ती बहुतेकवेळा जाणवत नाही किंवा तिचा उपयोग करण्यासाठीचे प्रसंगच उद्भवत नाहीत. साहजिकच सर्जनशीलतेवर काही जणांचीच मक्तेदारी असते असं अनेकदा वाटत राहातं. अनेकदा निव्वळ दबावापोटी किंवा धाडस करण्यापासून लोकांना परावृत्त केल्यामुळे सर्जनशीलता मरून जाते. कधी कधी एखादी कंपनी अत्यंत नावीन्यपूर्ण; पण एकदम उपयुक्त असलेलं उत्पादन बाजारात आणते. यामागे सर्जनशीलताच असते. तसंच यामध्ये मोठा धोकाही असतो. पारंपरिक पद्धतीनं विचार करणार्‍या लोकांना असा धोका पत्करणं जमत नाही. साहजिकच काळानुसार बदलणंही त्यांना अवघड होऊन बसतं. सर्जनशीलता विकसित करता येऊ शकते का, या प्रश्नाचं उत्तर तज्ज्ञ लोक होकारार्थी देतात. निरनिराळ्या क्षेत्नांमधले प्रश्न, त्यामधल्या अडचणी, त्यामधल्या संकल्पना यांची सांगड घालणं यासाठी गरजेचं असतं. वेगळं काहीतरी केल्यास काय घडेल हे तपासण्यासाठी काल्पनिक परिस्थितीचा विचार करावा लागतो. यातून या सगळ्या गोष्टी शिकून घेणं शक्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच सर्जनशीलता विकसित करण्यासाठी अनेक अंगांनी प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेली ही कौशल्यं बाहेर आणावी लागतात.प्रसिद्ध ब्रिटिश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यानं सर्जनशीलतेविषयी केलेलं भाष्य ‘एबीसीडी’ असं मजेशीर आहे. याचा अर्थ ‘ऑल्वेज बी कनेक्टिंग द डॉट्स’! स्वतंत्न वाटत असलेल्या गोष्टींमधली सहजासहजी न दिसणारी जुळणी करणं म्हणजे सर्जनशीलता!

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

 1. एखाद्या नवीन कल्पनेचा, विचाराचा पाठपुरावा करून ती कल्पना सत्यात आणणं म्हणजे सर्जनशीलता होय.2.आर्किमिडीजला अंघोळ करताना समस्येवर उत्तर सुचले आणि तो युरेका असे ओरडत नग्न धावत सुटला त्याचे कारण मानवी मेंदूच्या संशोधनात समजले आहे. एखादी शारीरिक कृती पूर्ण सजगतेने करू लागलो की तेच ते विचार कमी होतात आणि नवीन विचार सुचू शकतो हे मेंदूविज्ञानात सिद्ध होत आहे.3. कोणतीही समस्या नसताना नवीन कल्पना सुचण्यासाठी रोज दहा-पंधरा मिनिटं मनाला कोठेच एकाग्र न करता मुक्त भटकू द्यायला हवं, असं मेंदू संशोधक श्रींनी पिल्लई सांगतात. 4. मात्न दिवास्वप्नात रमत त्या विचारात वाहून न जाता मनात हे विचार येत आहेत याचं भान राखणं आवश्यक असतं. असं भान सरावानं शक्य होतं. 5. त्यासाठी श्वासावर लक्ष ठेवायचं. चार-पाच श्वास समजले की मन विचारात भटकतं. या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न न करता मनात हे विचार आहेत अशी स्वतर्‍शीच नोंद करायची.6. अशा वेळी मनात येणारे बरेचसे विचार हे जुने आणि तेच ते असतात. त्यांना महत्त्व न देता श्वास जाणला जातो आहे आणि विचारांना मोकळं सोडलं तर अचानक एखादी नवीन कल्पना सुचू शकते असा विचार मनात आला की त्याला महत्त्व देऊन पकडून ठेवायचं.7. मनात तोच विचार तीन - चार वेळा मुद्दाम, जाणीवपूर्वक करायचा. आवश्यकता असेल तर तो लिहून ठेवायचा. अशा सरावाने सर्जनशीलता वाढते.8. आणि मनात आलेले नवीन, वेगळे विचार डायरीत लिहून ठेवा. 9. विचारांना प्रतिक्रि या न करता जाणण्याचा सराव करा.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन