शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

क्राऊफंडिंग: तुमच्याकडे भन्नाट आयडिया आहे, भन्नाट काम करायचंय ? मग मागा लोकांकडे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 2:57 PM

क्राऊफंडिंग म्हणजे लोकांमधून पैसा उभा करता येणं. म्हणजे एखादी कल्पना आपल्याला सुचली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे पैसे आपल्याकडे नाही. आपलं वय, पगार वगैरे बघता कोणी आपल्याला लोन देऊ शकेल अशीही परिस्थिती नाही. त्यावेळी, आपण अशा वेबसाइटचा आधार घ्यायचा. आपली कल्पना लोकांना कळेल, आवडेल अशा प्रकारे मांडायची. त्यासाठी लागणारे व्हिडिओज टाकायचे हवं तर, आणि लोकांना आवाहन करायचं पैसे देऊन तुमच्या प्रकल्पात सहभागी होण्याचं !

- प्रज्ञा शिदोरेतुमच्याकडे भन्नाटआयडिया आहे,काय काम करायचंयाचा सुपर्ब प्लॅन आहेमग मागा लोकांकडे पैसेकाहीतरी कमाल तयार करण्याची सर्वात मोठी पायरी म्हणजे एक कमाल भन्नाट कल्पना. आणि दुसरी, आणि कदाचित जरा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा पैसा. तुम्हाला भले कल्पना रोज ढीगभर सुचत असतील. त्या सगळ्याच ग्रेट वाटत असतील. पण त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी लागतो एक प्लॅन आणि पैसा. इथेच आपल्याला किकस्टार्टरसारख्या वेबसाइट्स मदत करतात.किकस्टार्टर ही एक क्र ाउडफंडिंगची वेबसाइट आहे. क्र ाउडफंडिंग म्हणजे लोकांमधून पैसा उभा करता येणं. म्हणजे एखादी कल्पना आपल्याला सुचली. ती प्रत्यक्षात आणण्यासाठीचा सर्व प्लॅन आपल्याकडे रेडी आहे. पण त्यासाठी लागणारे पैसे आपल्याकडे नाही. आपलं वय, पगार वगैरे बघता कोणी आपल्याला लोन देऊ शकेल अशीही परिस्थिती नाही. त्यावेळी, आपण अशा वेबसाइटचा आधार घ्यायचा. आपली कल्पना लोकांना कळेल, आवडेल अशा प्रकारे मांडायची. त्यासाठी लागणारे व्हिडिओज टाकायचे हवं तर, आणि लोकांना आवाहन करायचं. हे आवाहन पैसे देऊन तुमच्या प्रकल्पात सहभागी होण्याचं !जर तुमचा प्रकल्प करायला एक लाख एवढी रक्कम लागणार असेल तर तुम्ही, तुमच्या जवळ अशी लोकं जमवायची की, जी तुमच्या कल्पनेला पैसे देऊ शकतील. मग हे लोकं तुम्हाला अमुक एक रक्कम देण्याचं कबूल करणार. जर जर अशा लोकांमधून एक लाख रु पये जमले तर तुमचा प्रकल्प साध्य होणार आहे जे तुम्हाला पैसे देऊ इच्छितात त्यांना त्यांच्या ‘दातृत्वाबद्दल’ एक भेट मिळणार. ही भेट म्हणजे काहीही असू शकते. तुम्ही मोठे झालात तर तुमच्या कंपनीचे शेअर्स किंवा तुम्ही जी वस्तू तयार करणार आहात, त्याचे फ्री सॅम्पल, वगैरे काहीही.बरं, तुमची कल्पना काहीही म्हणजे काहीही असू शकते. एखाद्या सामाजिक विषयावर फिल्म करण्यापासून ते तव्यांच्या साहाय्याने भारताचा नकाशा तयार करणे अशा विचित्र प्रकल्पांपर्यंत काहीही ! पण तुमची आयडिया लोकांना मात्र पटायला हवी.या वेबसाइटच्या माध्यमातून जशा चित्रविचित्र कल्पना प्रत्यक्षात आल्या आहेत, तसेच बरेच विधायक प्रकल्पही पूर्ण झाले आहेत. त्यातलाच एक प्रकल्प म्हणजे कमीत कमी धूर करणारी, कमी लाकडावर चालणारी आणि विस्तवाबरोबरच आपला फोनही चार्ज करणारी चूल!तर बघा ! तुमच्या काही काही आयडियाची कल्पना असेल, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी, अगदी सारी दुनिया नाही तरी काही मंडळी तरी तुम्हाला नक्की मदत करतील.तर आधी बघून तर घ्या ही वेबसाइट कसं काम करते ते तर वाचा..https://www.kickstarter.com/

कमाल ए लार्ज सिनेमे पहायला आवडतात,मग घरबसल्याया भन्नाट शॉर्टफिल्म पहाते ही मोफततुम्ही चित्रपट पाहता? चित्रपट पहायला मनापासून आवडतं?- अर्थात. चित्रपट कोणाला बघायला आवडत नाही, असा प्रश्न विचारायला हवा खरं तर ! पण अनेक वेळेला काय होतं, काहीतरी छान, ‘आहा ! काय कल्पना आहे’, असं वाटावं, असं पाहावंसं वाटतं. पण दर वेळेला हातात तीन तास आणि थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायला खिशात पैसा नसतो. एवढं करून उत्तम सिनेमे असतीलच उपलब्ध असंही काही नाही. अशावेळी यू ट्यूबवरची ही काही शॉर्ट फिल्म्सची चॅनल्स आपल्यासाठी अगदी आमंत्रण घेऊनच उभी असतात.आणि तिथं आपल्यासाठी खजिना असतो, हवं ते निवडून पाहण्याचा. तर त्यातलंच हे एक चॅनल.या यू ट्यूब चॅनलचं नाव कमाल ए लार्ज शॉर्ट फिल्म्स. आणि हे यू ट्यूब चॅनल सर्वांना मोफत उपलब्ध आहे ! या नावाची गंमत म्हणजे कदाचित, गहन आशयाच्या पण कमी वेळेच्या फिल्म्स असं म्हणायचं असू शकतं. पण या चॅनलच्या क्रि एटरला नक्की काय म्हणायचं आहे ते तुम्ही हे चॅनल बघूनच ठरवा.इथे अनेक नामवंत दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या फिल्म्सचा साठा तुम्हाला बघायला मिळेल. दिग्गज दिग्दर्शक आणि कलाकारही. आणि यातल्या काही निवडक फिल्म मामी म्हणजे मुंबई अकॅडमी आॅफ मूव्हिंग इमेजेस, म्हणजे थोडक्यात मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात येतात.यातली एक फिल्म जयदीप सरकार यांनी दिग्दर्शित केलेली, म्हणजे ‘नयनतारा नेकलेस’. दोन लोकांची मैत्री आणि त्या मैत्रीमधून उलगडत जाणाºया जुन्या जुन्या आठवणी. अतिशय सोपा विषय. पण फिल्म बघताना आपण त्या दोन पात्रांच्या आयुष्याचा एक भाग बनून जातो. यात अर्थात कोंकणा सेन-शर्मा हिचं काम. कमाल आहे !दुसरी मला आवडलेली फिल्म, सुजॉय घोष यांची ‘अहल्या’. यात राधिका आपटे हिची प्रमुख भूमिका आहे. टिपिकल बंगाली सेटिंग, आणि सस्पेन्स थ्रिलर. तुम्हाला आवडला नाही तरंच नवल! अजून एक म्हणजे शेफाली छाया हिने काम केलेली ज्यूस नावाची फिल्म ही तर अजिबात मिस करू नका.तर डिसेंबर महिन्यात ज्या सुट्ट्या असतात त्या अजिबात वाया न घालवता या सगळ्याच्या सगळ्या फिल्म्स पाहून टाका !पहा-यू ट्यूबवर लार्ज शॉर्ट फिल्म्स - https://www.youtube.com/user/LargeShortFilms/featured