coronavirus : आधीच स्पर्धा परीक्षा त्यात कोरोना ! स्पर्धा परीक्षावाल्यांचे काय  होणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 18:16 IST2020-04-02T17:59:26+5:302020-04-02T18:16:12+5:30

परीक्षा होणार का? पदं भरली जाणार का? जागा निघणार का? आणि तोवर आहे तिथं तगून कसं राहायचं? अशी चिंता या मुलांना खाते आहे. पुण्यात आणि दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी जन्ता, आधीच प्रश्नांच्या फुफाटय़ात होती, आता त्यांना लग्नापासून जगण्यार्पयतची खाई समोर दिसतेय.

coronavirus: upsc/mpsc/compitive exams- what abut students! | coronavirus : आधीच स्पर्धा परीक्षा त्यात कोरोना ! स्पर्धा परीक्षावाल्यांचे काय  होणार ?

coronavirus : आधीच स्पर्धा परीक्षा त्यात कोरोना ! स्पर्धा परीक्षावाल्यांचे काय  होणार ?

ठळक मुद्देअचानक स्वप्नांना ब्रेक लागला. आता फक्त वाट पाहणंच.

शर्मिष्ठा  भोसले 


वनिता मूळची सोलापूरची. पुण्यात एम.पी.एस.सी. करते. 
पुढचा अंदाज आल्यावर तिनं एका मैत्रिणीची स्कूटी मिळवली. तब्बल 26क् किलोमीटर स्कुटी चालवत सोलापुरात घर गाठलं. 
वनिता विचारते, ‘आता असल्या अवस्थेत किती कशी पुस्तकं आणणार होते मी सोबत? चार-दोन आणलीत. आम्ही सगळेच आता रिव्हिजन मोडमध्ये होतो. पुढचं काय, कसं माहीत नाही. वापस तर जाऊ शकत नाही. लायब्ररी, मेस बंद झाल्यात. पहिल्यांदा आयोगानं सांगितलं, की आहेत त्याच तारखेला परीक्षा होणार; पण आता ते शक्य वाटत नाही. 
इकडं गावी उन्हाळा आहे. सगळे शहरातले लोक गावी आलेत. सगळा गलबला. नीट अभ्यास होत नाही. तरी मला जागा आहे, घरातच ‘क्वॉरण्टाइन’ व्हायला. गावाकडं प्रत्येकाला तशी मिळणं शक्य नाही. मग बाहेर कुठंतरी समाजमंदिरात राहायचं. माङया घरी शेती करतात. भाऊ पुण्यात औषध कंपनीत नोकरी करतो. उत्पादन सुरू ठेवायचं असल्याने त्याला कंपनीनं थांबवून घेतलंय. त्याचीही काळजी वाटत राहाते. 
मूडचं बोलायचं तर जरा उदास वाटतं. तिथं पुण्यात राहाताना वर्षभराचं नियोजन ठरलेलं असतं. आता परीक्षेचंच काही खरं नसेल तर पुण्यात इतका खर्च करून राहाणार कसं? पुण्यात अडकलेल्या मैत्रिणींशी फोनवर बोलते. त्यांच्या नास्त्याचा प्रश्न अवघड झालाय. ज्या हॉस्टेलला राहातात त्यांना गॅस अलाउड नाही. पुण्यातल्या अनेक सामाजिक संस्था दोन वेळच्या जेवणाची सोय करत आहेत ते बरं आहे, मात्र आता आयोगानं लवकर स्पष्ट सूचना दिल्या पाहिजेत. नसत्या अनेक अफवा उडत आहेत.’
वनिताच्या अनेक मैत्रिणी आता गावी गेल्यावर पुन्हा पुण्यात वापस येतील की नाही माहीत नाही.
 त्यांच्या कुटुंबांपुढच्या आर्थिक अडचणी आता अजूनच बिकट झालेल्या असतील. 
अनेकींची लग्नही लावून टाकतील असं चित्न आहे. 
अशा असुरक्षित काळात सामाजिक दबावही वाढतो, पालक अधिकच असुरक्षित होतात..


नवनाथ वाघ पुण्यात गेली पाचेक वर्षे झाली एम.पी.एस.सी.ची तयारी करतो. मूळ दौंडचा. 
पुण्यात दुबई ग्रुपमुळे कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी एकदम पहिल्या टप्प्यात आली, तशी जरा स्पर्धा परीक्षावाल्यांमध्ये गडबड सुरू झाली. 
दरवर्षी ठरल्याप्रमाणो ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एम.पी.एस.सी.चं शेडय़ूल जाहीर होतं. 
त्यानुसार येत्या 5 एप्रिलला प्रीलिम होणार होती. घरच्यांचे फोन सुरू झाले, ‘पोरांनो, घरी या, इथं अभ्यास करा.’ काहींना घरचे घ्यायला आलते. ज्यांची जायची सोय नव्हती ते अडकले. काहींनी फोर व्हिलर भाडय़ानं घेऊन ते गेले.  इथं नास्ता-चहाचे स्टॉल्स बंद झाले. आम्ही मित्र सुरुवातीला 7-8 दिवस रूममध्येच होतो. बाहेर वातावरण तंग होतं. तिथंच काहीतरी बनवायचो. मेस बंद झालत्या. कसाय, आमचं दीड ते अडीच वर्षाचं सायकल असतं. एक प्रीलिम हुकली तर एवढा सगळा काळ वाया जातो. 
आमचा प्रीलिमचा पेपर 26 एप्रिलला होणार असं कळत होतं; पण आता बातमी कानावर येतेय, की अनिश्चित काळासाठी पेपर पुढं गेलाय; पण एम.पी.एस.सी.च्या साइटवर अजून त्याची घोषणा झालेली नाही. 
सतत येणा:या बातम्या वाचून अभ्यास तर काय होत नव्हता. इथं ज्ञानदीप अकॅडमीचे महेश शिंदे सर आम्हाला जमेल तसं मदत, मार्गदर्शन करतात. एम.पी.एस.सी. राइट्स संघटना, बारामती हॉस्टेलसुद्धा अडकलेल्या मुला-मुलींच्या जेवणाची सोय करतंय. अवघड काळ आहे, एकमेकांना हात द्यायचाय हे ठरवलंय.  काही मित्रंचे फोन येतात, घरी अभ्यास होत नाही; पण करणार काय?
पुण्यात एम.पी.एस.सी.साठी राज्यभरातून येऊन राहिलेल्या तरुणांची संख्या साधारण लाखभर आहे. बहुतांश क्र ाउड ग्रामीण भागातला. 
काही अपवाद सोडले तर ही मुलं-मुली साधारण, कष्टकरी घरातली. 
 नीलेश मराठवाडय़ातल्या हिंगोलीचा. बोलतो, ‘8-9 मार्चला पुण्यात बातम्या आल्या तेव्हा हे प्रकरण इतकं वाढेल असं वाटत नव्हतं; पण नंतर स्टडी रूम बंद झाल्या. मग रूमवर अभ्यास आणि  स्वयंपाक करायचो. 5 एप्रिलला परीक्षा होती. 22 मार्चला कळालं पोस्टपोन झाली. 23 मार्चला मित्रंच्या गाडय़ांवर कसंबसं गाव गाठलं. इथं गावी सगळे अंतर ठेवून होते. ही एक वेगळीच अवस्था आहे.
घरी एका वेगळ्या रूममध्ये राहातो. पण अभ्यासात मन लागत नाही. सतत बातम्या वाचत राहातो.  जे मित्र पुण्यात अडकलेत त्यांच्याशी बोलत राहातो. त्यांची सगळ्यात मोठी अडचण जेवणाची. काही संघटनांनी सोय केली; पण ते तरी किती पुरे पडणार? मन:स्थिती ढासळू नये म्हणून मी  व्यायाम, प्राणायाम करतो. मित्र फोनवर एकमेकांना धीर देतात.’
काही शिक्षकांचे अपवाद सोडले तर बहुतांश क्लासेसवाल्यांनीही मुलांना  सध्याच्या परिस्थिती आणि भविष्याबाबत नीट सूचना, मार्गदर्शन केलं नाही, असं एकानं सांगितलं. त्यातून विद्यार्थी अजूनच भांबावले. क्लासेसना आपापल्या व्यवसायाच्या तोटय़ाची चिंता अधिक सतावते, असं  काही विद्यार्थी म्हणाले.    
अनेकांची लग्नं एम.पी.एस.सी.च्या शेडय़ूलवर अवलंबून असल्याचं विदर्भातला अजिंक्य सांगतो. कसाबसा गावी आल्यानंतर इथलं वातावरण पाहून तो संभ्रमात पडलाय. 
तो सांगतो, ‘अफवांवर विश्वास ठेवणा:या गावक:यांची मला काळजी वाटते. जे विद्यार्थी पुण्यात अडकलेत त्यांचे पालकही इथे काळजीत आहेत. पुण्यात अनेक इंजिनिअर मित्र खासगी कंपन्यांत जॉब करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. त्यांनाही आता अडचणी आल्यात. त्यात जॉब नसलेल्यांचं काय होणार? गावी येताना कमीच पुस्तकं सोबत आणली. ज्यांना नेट, वायफाय, लॅपटॉप उपलब्ध आहे त्यांचं बरं आहे, बाकीचे ऑनलाइन अभ्यास कसा करणार? अनेकांच्या तर गावात मोबाइलचीही रेंज नाही..’ अजिंक्य प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नुकताच शासकीय नोकरीत जॉइन झाला होता; पण आता त्याला आणि त्याच्या अनेक मित्रंना गावी पाठवलं गेलंय. अजिंक्य खबरदारी म्हणून सोशल मीडिया पाहणं टाळतो. बातम्या अजिबातच बघत नाही. घरच्यांना आणि स्वत:लाही सतत सकारात्मक गोष्टी सांगतो. 
हे महाराष्ट्रातलं चित्र. अस्वस्थ करणारं. अचानक स्वप्नांना ब्रेक लागला. आता फक्त वाट पाहणंच.


दिल्ली -  यू.पी.एस.सी. करणा:यांचं आता काय होणार?


 दिल्लीतली अवस्थाही काय वेगळी नाहीय. पुण्यात राज्य तर इथं दिल्लीत देश. दोन्हीकडं लाल दिव्याच्या आशेनं वस्ती करून राहिलेल्या तरु णांची कोंडी झालीय.   सोबतच असंघटित कामगार असलेली हजारो फाटकी, मळकी माणसं या ‘स्पर्धा परीक्षा कल्चर’चा भाग असतात. 
स्पर्धा परीक्षांच्या बाजाराचा जो मोठ्ठा डोलारा उभा राहिलाय ना, त्याच्या आस:यानं ही माणसं दोन वेळची जेमतेम भाकरी कमावतात. त्यांचं, त्यांच्या कुटुंबाचं काय होत असेल? ते कुठल्या मानसिक उलथापालथीतून जात असतील? कुठलंच उत्तर सापडत नाही. ओल्ड राजेंद्रनगर हे स्पर्धा परीक्षांचं हब. देशभरातून आलेले विद्यार्थी इथं रूम्स करून किंवा हॉस्टेल्समध्ये राहातात. सगळे स्टार कोचिंग्सवालेही इथंच आहेत. 
अरूंद गल्ल्या, गर्दी, असंख्य लहानमोठी दुकानं, फूड स्टॉल्स, गजबज असा सगळा माहोल. गजानन स्पर्धा परीक्षांच्या विद्याथ्र्याना शिकवतो. दहाएक वर्षे झाली तो ओल्ड राजेंद्रनगरचा राहणारा. 
तो सांगतो, ‘आमच्या इकडं एका घरावर पोलिसांनी कोरोना पॉङिाटिव्ह घराला ओळखण्यासाठी असतं ते पत्रक लावलं. तिथून मग बरीच धांदल सुरू झाली. अफवाही सुरू झाल्या. ही स्पर्धा परीक्षांची मुलं जागतिक घटना-घडामोडींवर सतत लक्ष ठेवून असतात. त्यामुळे साहजिकच त्यांना काय येऊ घातलंय याची सामान्यांच्या तुलनेनं अधिकच कल्पना होती; पण तरी भीती, अस्वस्थता वाटतेच ना!  मराठी मुलं-मुलीपण भांबावलीत. इथं वर्षाचा नाही तर महिन्यांचा किराया द्यावा लागतो. आता पुढच्या महिन्याचा किराया द्यायचा का नाही? बहुतांश स्टडी रूम्स पटापट बंद झाल्या. 
अशावेळी राहायचं तर अभ्यास कुठं करायचा?
 परीक्षा ठरलेल्या तारखेला होणार की नाही? अनेक प्रश्न उद्भवले. 
त्यात यू.पी.एस.सी.ची पूर्वपरीक्षेची तारीख आलेली 31 मे. 
अशात करायचं काय? 
ज्यांनी लवकर निर्णय घेतला ते विमानं बुक करून गावी गेले. अनेकजण इथेच अडकलेत. इथं अजून तरी लॉकडाउन इतकं कडक नाही;  पण भाज्या आणि डेअरी, किरणांचे दर मात्र वाढलेत. त्याचा फटका बसतोच. 
शिवाय सध्या यू.पी.एस.सी.च्या मेन्स उत्तीर्ण झालेल्यांच्या मुलाखती दिल्लीत सुरू होत्या. त्याही थांबल्यात. 
फक्त मुलाखतीसाठी आलेली अनेकजणंही आता इथंच अडकून पडलीत. 
 क्लासेसच्या फीसमध्ये जरा सूट दिली गेलीय. शक्य ते सगळं मटेरिअल आता ऑनलाइन उपलब्ध करून दिलं गेलंय. टेलिग्राम अॅपचाही वापर टेस्ट सिरीज आणि इतर मटेरिअल शेअरिंगसाठी होतोय. 
ऑफलाइन मात्र ङोरॉक्स आणि स्टेशनरीची दुकानं अत्यावश्यक सुविधांमध्ये येत नसल्याने बंद आहेत. बहुतांश मटेरिअल, पुस्तकं आणि नोट्ससाठी सगळे याच दुकानांवर अवलंबून असतात.’ 
आकाश आगळे दिल्लीत, ओल्ड राजेंद्रनगरमध्ये राहातो. चार वेळा यू.पी.एस.सी.च्या मुलाखतीसाठी पात्र ठरलाय. आता शेवटचा अटेम्प्ट देतोय.  घरी न परतता तो दिल्लीतच राहिलाय. 
पण इथला येणारा काळ अवघड असल्याचं तो सांगतो. ‘ब:याच टिफिन सव्र्हिसेस बंद झाल्यात. आचारी लोकांना मालकांनी घरी पाठवलंय. गरजेच्या वस्तूंचे भाव वाढलेत. अजूनतरी 31 मेच्या परीक्षेबाबत संभ्रमच आहे. तरी मुलं सावध आहेत. जमेल तसा अभ्यास सुरू ठेवणं हातात आहे, अजून काय?’ 
लातूरचा शुभम स्वामी सांगतो, ‘माझा रूममेट प्रतीक 15 मार्चला मला बोलला, बाकीच्या देशात बघ, संसर्ग गुणाकार पद्धतीनं वाढतोय. भारतात काय वेगळं होईल? आपण लवकर गावी निघून जाऊ. मी त्याचं ऐकून 18 मार्चला विमानानं घर गाठलं. 22  मार्चला ओल्ड राजेंद्रनगर ब:यापैकी बंद केलं गेलं. आता वाटतं आपण योग्यच केलं. अनेक मित्र-मैत्रिणी तिकडंच अडकलेत. जेवण ते घरीच कसंबसं करतात. बाहेर गेल्यास संसर्गाची भीती आहे. अनेक लायब्ररीज बाहेरून पाटी काढून आत कुणाला न कळू देता सुरू ठेवत आहेत; पण आता तेही जास्त काळ राहणार नाही. एक मात्र मोठीच अडचण झालीय, की मी विमानानं येताना माझी सगळी महत्त्वाची पुस्तकं घराच्या पत्त्यावर कुरिअर केली होती. आता ती सगळी अनिश्चित काळासाठी मध्येच अडकून पडलीत. हेच त्रंगडं माङया अनेक मित्रंसोबतही झालंय. ’

सायली नांदेडची. दहा महिन्यांपासून दिल्लीत होती. तिची पुस्तकं अशीच कुरिअरमध्ये अडकलीत. ती सांगते, ‘आता कुठे मी दिल्लीत रुळले होते. हे सगळं उद्भवलं तशी पहिल्या दहा दिवसात इकडे परतले. माझी मन:स्थिती जरा नाजूक बनलीय. मोबाइल बघणं टाळते. आईवडिलांशी जास्तीत जास्त संवाद करते. मी डोळ्यासमोर असल्याने त्यांना जरा दिलासा मिळालाय. माङया घरात शांतता असल्याने अभ्यास करता येतो. मैत्रिणींशी फोनवर बोलते, छान वाटतं.’    
मुळात गेली अनेक वर्षे सलगपणो सरकारी भरतीच्या जाहिरातीच पुरेशा निघत नाहीत, निघाल्या तरी प्रत्यक्ष भरती प्रक्रिया रखडते. आता नक्की काय होणार, अशी चिंता या मुलांना खाते आहे. वाट पाहणं, यापलीकडे आता त्यांच्याही हातात काहीही उरलेलं नाही.


( शर्मिष्ठा मुक्त पत्रकार आहे.)  
 

Web Title: coronavirus: upsc/mpsc/compitive exams- what abut students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.