स्पेनचं तारुण्य का विचारतंय, आता जगायचं कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 15:58 IST2020-05-21T15:57:38+5:302020-05-21T15:58:27+5:30
स्पेनमध्ये कोरोनाने कहर केला; पण तरुणांची खरी परीक्षा आता पुढे आहे. अनेकांसाठी जॉब नाहीत, आहेत त्यांना वेतन कमी, घरून काम, पडेल तेव्हा काम आणि पैशाची शाश्वती नाही अशी गत.

स्पेनचं तारुण्य का विचारतंय, आता जगायचं कसं?
कलीम अजीम
‘आम्ही कामगार म्हणून जॉब मार्केटमध्ये प्रवेश करणार आहोत. पण हा बाजार आमचं काय करेल, याबद्दल मी सध्या काही सांगू शकत नाही. आज कोणताही घटक आमच्या भवितव्याबद्दल बोलताना का दिसत नाही?’
-26 वर्षाची मॅड्रीड निवासी नीरेया गोमेझ स्पॅनिश सरकारला हा प्रश्न विचारत आहे.
प्रतिष्ठित समजल्या जाणा:या वलेन्सिया युनिव्हर्सिटीमधून तिनं इकॉनॉमिक्सची पदवी घेतली आहे. सध्या ती पॉलिटेक्निक विषयात पीएच.डी. करतेय.
तसं पाहता नीरेयाला पडलेला हा प्रश्न तिच्या एकटीचा नाही जवळपास बहुतांश युरोपिअन तरुणांचं प्रतिनिधित्व करतो.
गेल्या तीन महिन्यांपासून युरोपीय देशांना कोविड-19 रोगराईचा भयंकर विळखा पडला आहे. इटली व स्पेन हे दोन देश संकटाच्या गर्तेत पुरती अडकली आहेत. त्यात येऊ घातलेल्या जागतिक मंदीमुळे युरोपचं कंबरडं मोडणार असं चित्न निर्माण झालं आहे.
http://ी’स्रं्र2.ूे/ या वेबसाइटवर या संदर्भात एक विशेष रिपोर्ताज प्रकाशित झालेला आहे. स्पेनच नव्हे तर सबंध युरोप भविष्यात भयंकर आर्थिक संकटाला सामोरा जाईल, अशी शक्यता यात वर्तवण्यात आलेली आहे.
संबंधित रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक निरीक्षणो नोंदवण्यात आलेली आहे. त्याचा आधार घेऊन आपण पुढची सगळी चर्चा करत आहोत.
हा अहवाल सांगतो की, कोरोना व्हायरस व लॉकडाउन काळात आज स्पेनच्या बहुसंख्य तरु णांना बेरोजगारीचं संकट छळत आहे.
येणारा काळ जॉब मार्केटमध्ये नवं तंत्न व नवे नियम विकसित करणारा असेल. तात्पुरते करार, नो डेजिगनेशन, कामाचे तास कमी, त्यावर आधारित पगार व नोक:यातील अनिश्चितता हे घटक शक्यतो येणा:या काळात स्पॅनिश तरुणांच्या माथी मारले जातील.
सीएनबीसीनेदेखील अशाच प्रकारचा एक रिपोर्ट जारी केला आहे. त्यात म्हटलं आहे की, स्पेनमधील येणारी पिढी नोकरी व जॉब टिकवून ठेवणं, नवी उमेद आणि स्वप्न पाहण्याच्या पात्रतेची नसेल. एल्पैस वेबसाइटवर तरुणाईपुढील नवी आव्हाने कशी असतील यासंदर्भात काही लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत. बहुतेकांचा सूर हा युरोपमध्ये बेरोजगारीची अनियंत्रित लाट निर्माण करणारा असेल असाच आहे.
कोरोनाच्या संकटाआधीच स्पेनमध्ये बेरोजगारीचा दर 3क् टक्के होता. त्यात आता साहजिकच वाढ होणार आहे. नवी आकडेवारी सांगते की, एप्रिलमध्ये 25 ते 29 वर्षे वयोगटातील बेरोजगारी 13.1 टक्क्याने वाढली. रिपोर्ट सांगतो की, लॉकडाउन काळात 35 वर्षाखालील निम्म्या तरुणांच्या नोक:या गेल्या आहेत. येत्या काळात यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्सल्टिंग फर्म सीईपीआर पॉलिसीचा अंदाज सांगतो की, सध्या स्पेनमध्ये 24.4 टक्के वर्क फ्रॉम होम सुरू आहे. पण येणा:या काळात ही टक्केवारी 43 टक्क्यांर्पयत वाढू शकते. एल्पैसचा हा अहवाल सांगतो की, भविष्यात बरेचसे सेक्टर डिटन्स जॉब सुरू करतील. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापक डेव्हिड ग्रस्की या स्थितीला, अन्यायाची नवी लाट असल्याचं मानतात.
पेपर्स ऑफ स्पॅनिश इकॉनॉमी या रिसर्च जर्नलने प्रकाशित केलेला अहवाल सांगतो की, स्पॅनिश तरुण 35 ते 4क् वयोगटात लग्न व नवं घर घेऊन सेटल होतात.
कोरोनामुळे ज्यांच्या नोक:या गेल्या आहेत, त्यांचं सरासरी वय याच वयोगटातलं आहे. सांख्यिकी विश्लेषण करणा:या कॅक्सा बँक रिसर्चचा एक रिपोर्ट सांगतो की, हातातली नोकरी गेल्यानं या तरु णांची स्वप्ने मावळली असून, त्यांच्यात नवी उमेद उरली नाहीये. अर्थात आयुष्यात नवं काहीतरी सुरू करण्याची त्यांची मानसिक स्थिती राहिलेली नाही.
हा अहवाल पुढे सांगतो की, उरलेल्या नोक:यांत 1क् ते 12 टक्क्यांर्पयत पगारात घट होईल. तसंच 2क्क्8 ते 2क्16च्या तुलनेत 2क् ते 24 वयोगटातील तरु णाईच्या उत्पन्नातही 15 टक्क्यांनी घट होईल.
ज्येष्ठ मंडळींनी आमच्या नोक:या खाल्ल्या, स्पेनच्या तरु णांची ही जुनी तक्र ार आहे. पण नवं संकट ज्येष्ठ नागरिकांवर नवीन कररचना लादू शकतो.
नव्या कामगार कायद्यामुळे नोकरदारावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष प्रकारच्या टॅक्स प्रणालीत लक्षणीय वाढ होईल. एक तर पगार कपात त्यात करांचा वाढता बोझा यामुळे त्यांना नोकरी टिकवून ठेवणो अशक्य होईल.
पेन्शनधारकांनादेखील कपातीचं भय हमखास असणार आहे.
2क्क्6-क्8च्या मंदीनंतर नोकरीत आलेला तरु ण वर्ग आता चाळिशीच्या घरात आहे. तो जॉब मार्केटमधून बाहेर पडल्यास नवे तरु ण बदलणा:या लेबर मार्केटमध्ये येईल.
या पिढीला पहिल्या दहा वर्षात साडेसहा टक्के पगार कपातीला सामोरं जावं लागेल. त्यांच्याकडे नोकरी टिकण्याची शाश्वती पूर्वीपेक्षा फार कमी असेल.
तसंच स्वतंत्नपणो जगणं, नवं घर व लग्न त्यांच्या आवाक्याबाहेर असेल. त्याचप्रमाणो अशा जोडप्यांना अपत्य जन्मास घालणोदेखील परवडणारे नसेल अशी भीती आहे.
दुसरीकडे नवं घर घेणं शक्य न झाल्याने रिअल इस्टेट व्यवसाय संकटात येईल. उपलब्ध परिस्थितीत संयुक्त कुटुंब पद्धतीशिवाय पर्याय नसेल. त्यातून कौटुंबिक वाद व हिंसाचार घडतील, हेदेखील नाकारता येत नाही. न्यू यॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापिका नूरिया रॉड्रॅगिझच्या मते या सर्वाचे दुष्परिणाम दहा वर्षे टिकून राहू शकतात.
एक सकारात्मक बाब या रिसर्चमधून पुढे आली आहे, ती म्हणजे नव्या लेबर मार्केटमध्ये 15 ते 24 वर्षे वयोगटातील 7क् दशलक्ष रोजगार निर्माण होऊ शकतात. पण वरील सगळ्या अटी-शर्थी त्यांना अलिखितपणो लागू असतील हे नव्यानं सांगायची गरज नाही. तज्ज्ञ सांगतात की, कोरोनानंतरचा काळ व कॉर्पोरेट व्यवस्था असे जॉब डिझाइन करेल ज्यात तरु ण व्यक्ती स्थिर राहू शकणार नाही. त्याच्याकडे नावाला नोकरी आहे; पण ती तात्पुरत्या स्वरूपाचीच असेल. थोडक्यात काय तर युरोपमध्ये नव्या पिढीला आर्थिक सुरक्षा कधीच लाभणार नाही, अशी सोय ही नवी व्यवस्था तयार करू पाहत आहे. शिवाय जे तरु ण स्वतंत्न व्यवसाय करू पाहत आहेत त्यांच्यासाठी हा बाजार तग धरून ठेवणारा असणार नाही, हेदेखील वेगळं सांगायची गरज नाही.
कोरोना संकट आणि लॉकडाउन काळातील वेगवेगळे अभ्यास, निरीक्षण व संशोधनातून एक समान सूत्न बाहेर येत आहे, ते म्हणजे कोरोनानंतरचा काळ हा व्हचरुअल मार्केटिंग व बाजाराचा असेल. शिक्षण प्रणालीपासून ते उद्योग-धंदे, व्यवसाय व व्यापाराची रचना लक्षणीयरीत्या बदलणार आहे. वर्क फ्रॉम होमची नवी पद्धत नवी संकटं व आव्हानं घेऊन येणार आहे.
नोकरी कपातीचं संकट जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा असेल. त्यातून तडजोड, अडचणी, अनिश्चितता, नैराश्य व त्यातून उद्भवणारी नवी विदारक अवस्था आ वासून उभी आहे. त्यात कोण व कसा तग धरू शकेल हे येणारा काळ ठरवेलच.
मानवी स्वभाव हा फारच चिवट असतो. माणूस प्रचंड आशावादी असतो. कोरोना संकटात त्याची जगण्याची तडफड व उमेद आपण पाहतोच आहे. विशेषत: तरुण तडजोड स्वीकारणारे व लवचिक असतात. त्यामुळे या गंभीर परिस्थितीतून ते नक्कीच तावून-सुलाखून बाहेर पडतील, अशी अपेक्षा करूया.
सध्या मात्र स्पेनचं तारुण्य एका मोठय़ा बोगद्यातून वाट काढतं आहे.
( कलीम मुक्त पत्रकार आहे.)