शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अडचण असेल तर मोफत घ्या ! - औरंगाबादच्या भाजी विक्रेत्या तरुणाची दिलदार गोष्ट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 18:13 IST

भाजीच्या ठेल्यावरचा हा बोर्ड आणि भाजी विक्रेत्या तरुणाचा हा फोटो खूप व्हायरल झाला. ‘ऑक्सिजन’ने त्या तरुणाला शोधलं. तो राहुल. त्याचा मित्र मनीष आवटेने ती पोस्ट लिहिली होती, तो म्हणाला, सोशल मीडियात काय चाललंय मला माहितीपण नाही!’ त्याला म्हटलं तू लिहून दे, तुला का वाटलं, हा बोर्ड लावून भाजी विकावं? तर त्यानं मनोगत लिहून पाठवलं, ते त्याच्याच शब्दात.

ठळक मुद्देछोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?

राहुल लबडे  

घरची परिस्थिती अशी की मला खूप लवकर जॉब करावा लागला. त्यात घरात मी मोठा. जॉब करून शिक्षण सुरूहोतं. बाबा खूप वर्षापासून भाजीपाला विकण्याचा धंदा करतात. मी शिकलो, जॉबला पण लागलो. पण आता कोरोना संकटात माझा जॉबही गेला. घरी मी, माझा एक भाऊ , दोन बहिणी आणि आई-बाबा. एवढय़ा कुटुंबाचा उदरनिर्वाह बाबा एकटे भाजीपाला विकून करत होते. मीही ठरवलं त्यांना मदत करायची. मी ही त्यांच्यासोबत भाजीपाला विकू लागलो. भाजीची गाडी लावली.मनात तर फार होतं वेगळं काहीतरी करु. तशी जिद्द होती. पण तशी परिस्थिती कधी निर्माणच झाली नाही. मलापण माहितीये की परिस्थिती मनासारखी निर्माण होत नाही ती निर्माण करावी लागते. मात्र सध्या परिस्थितीत मी भाजीची गाडी लावून काम करत होतं.लॉकडाउनमध्ये एक दिवस, एक आजी चौकात काहीतरी ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होती.पण त्यांचं कोणीच ऐकत नव्हतं. मी जवळ जाऊन आजीला त्यांची अडचण विचारली. ती आजी भराभरा सांगायला लागली, ‘मला नंदनवन कॉलनीमधे जायचं आहे.  तिथे मी एका घरी काम केलं आहे. त्या कामाचे माझे  50 रूपये त्यांच्याकडे आहे. मला ते आणायला जायचं आहे.  गाडी नाही, मला कोण तिथं सोडणार, मला चालवत पण नाही.  पन्नास रुपयात माझा भाजीपाला तरी येईल. घरात काहीच नाही. सामान पण आणायचे आहे. आता  फक्त 51 रूपये आहेत.’ आजीच्या भुकेल्या पोटासाठी ते कुठं अडकलेले 50 रुपये पन्नास हजारासारखे होते. मी मनात विचार केला. फक्त 50 रुपयात आजी हे सगळं कसं करणार ?  मी आजीला म्हटलं तुला हवा तो भाजीपाला घे. आजी खूप खूष झाल्या. खरं सांगतो, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सुख पाहून मला जितकं सुख वाटलं,तेवढं कधी वाटलं नव्हतं.  त्यान आजीनं मला पाच रूपये दिले. डोक्यावर हात ठेवलं नी  म्हणाल्या ,  ‘मला पाच रुपयात हे सगळं कुणीच दिलं नसतं. मी कधीतरी राहिलेले पैसे तुला नक्की आणून देईल!’ माझ्या  डोक्यावर हात ठेवून आजी निघून गेल्या.असे खूप मोलमजुरी करणारे कुटुंब आहेत, जे रोज कमावतात आणि रोज खातात. मी ही त्याच गरीब गरजू समाजातला आहे. मला वाटलं, आपल्याला जे जमेल तेवढं आपण केलं तर?मी  ठरवलं अडचणीत असणाऱ्याना मोफत भाजी द्यायची.  एक उपाशी पोटच दुसऱ्याची भूक समजू शकतं.मी म्हणून गाडीवर पाटी लावली की अडचणीत असाल तर  मोफ त घ्या, भाजी.ज्यांच्याकडे पैसे होते त्यातल्या काहींनी तर मला भाजीचे कधी जास्त पैसेही दिले, ती पाटी पाहून.ज्यांच्याकडे नव्हते, त्यांनी थोडीच भाजी मोफत घेतली, पोटापुरती.मला नाही वाटत की, मी हे गरजूंना  ‘दान’ म्हणून काही दिलं, हा त्यांच्या कष्टाचा  ‘वाटा’ आहे, या भावनेनं वाटलं म्हणून घ्या म्हणालो, एवढंच. देश मजुरांच्या पायावर उभा आहे. हा पाया उपाशी राहिला तर देश कमजोर नाही का होणार?मग या छोटय़ा मदतीनं कुणाच्या घरी चूल पेटली, तर मी काय एवढं मोठं केलं?