शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

कल्पना करा, आपल्या हातून मोबाइल आणि डेटा पॅक काढून घेतले तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 06:50 IST

आपल्याला स्वत:बरोबरच राहावं लागलं, तर आवडेल आपल्याला स्वत:ची सोबत. की बोअर होऊ आपण? जरा मोबइलचा आवाज कमी करून, हा प्रश्न विचाराच स्वत:ला !

ठळक मुद्देअगर मोबाइल न होते.

- प्राची पाठक

सध्या घरोघरी काय चित्न आहे? घरातली सगळी मंडळी ब:यापैकी घरात अडकलेली आहेत.  कोणी दिवस दिवस टीव्हीसमोर बसले आहेत. कोणी वेब सिरीज बघण्यात गुंतले आहेत.  कोणी टीव्हीवरच्या बटबटीत बातम्या बघत हर एक ब्रेकिंग न्यूजला अस्वस्थ होत आहेत. त्याच वेळी कोणी टॅब, लॅपटॉप घेऊन बसलेला आहे.  दुसरीकडे हाताशी फोन घेऊन ठेवलेला आहे म्हणजे तो वाजला, तर तो आणायला वेगळं उठायला लागायला नको ! त्यात मेसेजेस, कॉल्स, फॉरवर्डस धबाबा येऊन कोसळत आहेत.  काही जण जे टीव्हीवर पाहिलं, तेच वर्तमानपत्नात कसं छापलं, ते परत-परत वाचत आहेत.  कोणी टीव्हीतल्या बातम्या परत फोनवरून शोधून पुढे ढकलत आहेत.  कोणाचा फोन वाजला तरी परत त्याच चर्चा. कोरोनाची लागण किती जणांना झाली, जगात किती लोक मेले, तिकडे काय झालं आणि इकडे काय झालं?सगळीकडे मोठमोठय़ाने हेच बोलणं सुरू आहे. मधूनच मग कोणीतरी ओरडतं, बंद करा त्या बातम्या. काय सारखं तेच ते. वेड लागेल अशानं, जरा काहीतरी वेगळं पहा. मन प्रसन्न होईल असं पाहा. देवाचं नाव घ्या. रिलॅक्स व्हाल असं म्युङिाक ऐका.तेवढय़ापुरत्या बातम्या बंद होतात.मग फोनवर मोठय़ानं बोलणं सुरूहोतं.आपल्या देशात लोकांना कसं काही कळत नाही. सरकारने हे करायला हवं, ते करायला हवं, सगळं कसं इथं फालतू आहे.काहींना अशा जागतिक चर्चातही इंटरेस्ट नसतो ते सरळ आपल्या फोनवर गाणी लावतात, आणि स्पिकरवर फोन टाकून देतात.त्यांची गाणी मग इतरांनीही ऐकायची, कं-प-ल-स-री !

हे सगळं कमीच, काहीजणांची टेप एकाच ठिकाणी अडकते.‘करू तरी काय दिवसभर? बोअर होतं’!मग ते जीव रमवण्यासाठी मोबाइलमधले वेगवेगळे गेम्स सुरू करतात. त्यावेळी त्या फोनचा आवाज, बॅकग्राउण्ड म्युङिाक चालूच असतं.ते फार व्हॉट्सअॅप चर्चा, फॉरवर्ड, तिथल्या मारामा:या यात रमत नाहीत.ते सरळ सांगतात, माझं सोशल डिस्टन्सिंग.आपण बातम्या पाहत नाही, आपण तेच च:हाट वळत नाही, मी माझा मस्त आहे.पण तसं असतं का?तर तसंही नाही. आपण सतत बातम्या पाहण्यापासून स्वत:ला कसं वेगळं केलं असा एक विजयी भाव त्यांच्या मनात असतो. त्या विजयी भावनेसाठी ते हे सगळं करतात, मनापासून आनंद मिळतो म्हणून नाही.गेम्सला असलेलं म्युङिाक मुळातच भडक आणि कर्कश असतं. जितका गेमचा आवाज जास्त, तितकं काहीतरी भारी खेळणं सुरू आहे, असा एक फील लोकांना मिळत असतो.त्यामुळे, मोठय़ा व्हॉल्युमवर कोणीतरी दिवस-दिवस गेम खेळत बसलेला असतो. म्हणजे आता बघा, एका घरात समजा चार पाच माणसं असतील, तर कोणीतरी मोबाइलमधले बातम्यांचे अपडेट्स स्पीकरवर ऐकत असतं. कोणी मोठय़ा आवाजात गेम्स खेळत असतं. कोणी हेडफोनचा त्नास नको, म्हणून फोन लाउडस्पीकरवर टाकून कोणाशी मोठय़ाने बोलत असतं आणि कुठे लहान मुलांना टीव्हीसमोर बसून खाऊ घालणं सुरू असतं.त्यात घरात मुळातच मोठमोठय़ाने बोलणा:या मंडळींचे आवाज असतात, ते वेगळेच. मग कोणाला टीव्हीचा कंटाळा येतो. ते मोबाइल हातात घेतात.त्यांच्या मोबाइलच्या डबीत जो डिजिटल कचरा येऊन पडलेला असतो, ते व्हिडीओ-फोटो ते फॉरवर्ड करून पाहतात.फॉरवर्ड करताना, काही पाहतात, काही ऐकतात. काही उडवून देतात. दिवसातला भरपूर वेळ तरुण मुलंमुली या फॉरवर्ड होणा:या व्हिडीओच्या नादाने वाया घालवत असतात. ते करताना आवाज मोठा करून ठेवलेला असतोच. आणखीन एक कॅटेगिरी असते. ही मंडळी फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स शोधून काढतात.यांना थोडीफार गाणं बजावण्याची हौस असेल, तर आपण थेट लता किंवा रफी आहोत, अशा थाटात फोनमध्ये वेगवेगळे अॅप्स चालू करून ते कर्कश गात बसलेले असतात. काही अॅप्समध्ये फोनचा कीबोर्ड वापरून सिन्थेसायझरचे सूर निघतात. आपण काय ग्रेट शोध लावला, अशा भावात लोक त्यावर दिवस दिवस ट्रायल अॅण्ड एरर करत बसलेले असतात.हे सगळं ‘आरडाओरड’ या कॅटेगरीतच मोडत असतं. आपला पोरगा काय थोर संगीत साधना करतोय, या नादात पालकही गप्प बसलेले असतात.मग सुरू होते ती टिकटॉकवर व्हिडीओ बनवायची स्पर्धा ! आधीच आपण दिवस दिवस घालवून टिकटॉकमध्ये कोण कसं नाचलं, कोण काय गायलं, हे सगळं पाहून ठेवलेलं असतंच. मग आपल्यातला कलाकार जागा होतो. टिकटॉकवर प्रयोग करणं सुरू होतं. या संपूर्ण प्रयोगांच्या काळात मोठय़ा मोठय़ा आवाजात काहीतरी बकवास रेकॉर्ड करणं सुरू असतं ते वेगळंच. सगळं लक्ष इतरांनी जे केलं त्याहून आपण काय भारी केलं आणि ते किती फॉरवर्ड झालं, किती हिट्स आले यावर. म्हणजे संगीत शिकण्यासाठी ते आपल्याला करायचं नाहीये. नृत्य शिकण्यासाठी काही वर्ष घालावी लागतात, ते आपल्याला नकोय. पटकन काहीतरी करून आपण फार मोठे कलाकार असल्याचा आभास निर्माण करायचा आणि त्या आभासातच तरंगत राहायचं, हे आपल्याला हवं आहे. त्यात कोणी आपल्या फोनमध्ये भरपूर गाणी स्टोअर करून ठेवतात. अनेक लिंक्स असतात, जिथून एकापाठी एक हजारो गाणी ऐकता येतात.आपल्याला वाटतं, आपणच काय भारी. आपल्याच मोबाइलमध्ये लै भारी गाणी. ती इतरांना ऐकवूनच राहिलं पाहिजे, अगदी कान किटेर्पयत. प्ले मोडला दिवस दिवस गाणी वाजत राहतात मग. कोणी ती ऐको, न ऐको. एक सवय लावून घ्यायची, सतत गाणी ऐकायची. त्यातली गोडी वगैरे दूरच.बसला गाडीत, लाव गाणी. गेला मॉर्निग वॉकला (आता जाता येत नाही, तर घरातच) तर घरातून बाहेर पडायच्या आधीच गाणी लावलेली. घरात नुसतं बसून काय करणार, लाव गाणी. गाण्यांचा आस्वाद जरूर घ्यावा. पण ते एकमेव असं मनोरंजनाचं साधन बनवून ठेवू नाही. सतत काहीतरी ऐकलं तरच आपला मूड भारी होणार, अशी सवय आपल्याला लावून ठेवू नये. आपल्याला जे आवडतं ऐकायला, गायला, वाजवायला, ते जगाला आवडेलच असं नाही. तर, घरातल्या इतरांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना या रिकामपणातल्या संगीत साधनेचा त्नास कशाला? अगदी देवा धर्माची गाणी लावून ठेवली, तरी ती कोणाला त्नासदायक वाटू शकतात, याचं भान आपल्याला असतं का, हा खरा प्रश्न आहे. आपलं मनोरंजन आपल्या कानात सुरू ठेवावं की, इतकीच हौस असेल तर. सतत कानांवर असा सांगीतिक भडिमार झाल्याने त्या कानांचं नेमकं होतंय काय, याचीही जाणीव आपल्याला स्वत:पुरतीदेखील उरलेली नाही. हातातल्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या जाळ्यातून बाहेर पडून आपल्या आजूबाजूचं जग बघायला आपण कधी शिकणार? आपण या कर्कश मनोरंजनाच्या ट्रॅपमधून कधी बाहेर पडणार? काहीही न ऐकणं, हीसुद्धा एक कला आहे आणि तिची साधना केली तर आपण जरा शांतपणो जगायला शिकू, जरा नीट पाहू बदलतं जग असं नाही वाटत?'

मोबाईल  डिस्टंसिंगचं काय ?

म्हणायला आपण लॉकडाउनमध्ये आहोत. सोशल डिस्टन्सिंग पाळतो आहोत.पण आपण गप्प नाही. गप्प बसणं, शांतता अनुभवणं, जरा आत डोकावणं, काहीतरी शांतपणो करणं या अर्थानं आपण शांत नाही.आपण आपल्याभोवती कल्लोळ करून ठेवलाय. आवाजाचा, माहितीचा, मनोरंजनाचा.आणि आपण अस्वस्थ आहोत.कल्पना करा, तरुण मुलांच्या खरं तर सगळ्यांच्या हातून मोबाइल आणि त्यावरचे डेटा पॅक काढून घेतले तर? आज आपण पूर्ण मोबाइलवर अवलंबून आहोत. घरात माणसं आहेत; पण आपण सोबत नाही.आपल्याला सोबत मोबाइलची.उद्या तो नसेल तर..कल्पना करून पहा.आणि मग विचार करा, आपल्याला स्वत:बरोबरच रहावं लागलं, तर आवडेल आपल्याला स्वत:ची सोबत. की बोअर होऊ आपण?जरा मोबइलचा आवाज कमी करून, हा प्रश्न विचाराच स्वत:ला!

( लेखिका मानसोपचार आणि पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)