कॉर्मसवाली करिअरमें दोस्ती?
By Admin | Updated: June 5, 2014 18:20 IST2014-06-05T18:20:08+5:302014-06-05T18:20:08+5:30
सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात.

कॉर्मसवाली करिअरमें दोस्ती?
>सायन्स-आर्ट्सवाल्यांपेक्षा सध्या कॉर्मसवाल्या दोस्तांचं इमोशनल घोळ थोडा मोठा आहे. हुशार आहे म्हणून सायन्सलाच का जायचं म्हणून अनेक जण स्वत:हून दहावीनंतर कॉर्मस घेतात. त्यांना सीए करायचं असतं. सीएची तयारी सुरूही करतात. पण घोळ नेमका तिथंच होतो. अनेक जण बारावीनंतर नुस्तं बीकॉमला अँडमिशन घेत सीएच्या तयारीला लागत नाहीत. ते बीकॉमऐवजी बीएएफ म्हणजेच बॅचलर ऑफ अकाऊण्ट अँण्ड फायनान्स नावाच्या नव्या प्रोफेशनल कोर्सला प्रवेश घेतात. त्याचं कारण एकच, आपले सगळे हुशार मित्र प्रवेश घेतात म्हणून आपणही घ्यायचा. मुळात हे दोन्ही अभ्यासक्रम अत्यंत कॉम्पिटिटिव्ह आणि किचकट असतात. खूप अभ्यास करावा लागतो. खूप फोकस्ड असावं लागतं. पण ते लक्षात न घेता केवळ मित्र घेतात म्हणून अवघड अवघड अभ्यासक्रमांना अनेक जण प्रवेश घेतात. कुठलाच अभ्यास धड होत नाही म्हणून मग सगळीकडेच मागे पडायला लागतात.
कॉर्मसवाल्यांचं हे झालं एक उदाहरण. पण बाकीचेही अनेक तसंच करतात. एक्स्ट्रा करिक्युलर काहीतरी हवंच हवं म्हणून गाण्यापासून तबल्यापर्यंत आणि चित्रकलेपासून ते थेट ट्रेकिंगपर्यंत कशात तरी स्वत:ला बांधून घेतात.
एकाच गोष्टीवर फोकस करणं म्हणजे आपण हुशार नाही, हा जो काही नवा समज झालाय तो स्वत:पुरता मोडीत काढल्याशिवाय तरी स्वत:वरचा हा अन्याय दूर होणार नाही.