शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Coordination with others - सावधान! आय-मी-मायसेल्फ करत राहाल, तर करीअरच्या स्पर्धेत मागे पडाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 7:35 AM

को-ऑर्डिनेशन विथ अदर्स- लोकांच्या कामाची गाडी लाइनीवर ठेवणं, त्यांना एकमेकांशी जोडून देणं, हेच को-ऑर्डिनेटरचं काम. सहकाराची ही एक नवीच दृष्टी आहे.

ठळक मुद्देजॉब टिकवणं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे यशस्वी करिअर करणं हे एक आव्हान असू शकतं. ते आव्हान स्वीकारायचं तर आपल्याकडे काही खास कौशल्यं हवीत? तेच  सांगणारा  ऑक्सिजनचा  विशेष  अंक 

अतुल कहाते,  डॉ. यश वेलणकर

जग आता खर्‍या अर्थानं वैश्विक (ग्लोबल) झालं आहे असं आपण म्हणतो. यात तथ्य आहेच. यामुळे आपण कुठल्या कामामध्ये कुणाबरोबर सहभागी असू हे सांगता येत नाही. अगदी इतक्या जागतिक पातळीवरचा विचार जरी आपण केला नाही तरी आपल्या कामाच्या ठिकाणीसुद्धा हेच तत्त्व लागू पडतं. म्हणजेच आपण एका कोपर्‍यात बसून किंवा एका खोलीत आपल्या सगळ्या सहकार्‍यांना घेऊन काम करण्याचे दिवस केव्हाच संपले आहेत. आपले नेहमीचे सहकारी सोडून इतरांना सहकार्य करणं आणि त्यांच्याही सहकार्यानिशी आपलं काम करणं असं आजचं युग आहे. म्हणूनच अनेक कंपन्यांमध्ये आपल्याला ‘को -ऑर्डिनेटर’ नावाच्या हुद्दय़ावर अनुभवी माणसं काम करताना दिसतात.बरेचदा या को-ऑर्डिनेटरला स्वतर्‍चं असं नेमून दिलेलं मुख्य काम नसतंच. त्याचं मुख्य काम म्हणजेच इतरांच्या कामाला गती देत राहाणं आणि त्यामधल्या अडचणी दूर करणं हे असतं. अनेक लोकांचे ताण-तणाव झेलत परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देण्याची कसरत त्याला सांभाळावी लागते. कामाच्या अनुभवाबरोबर माणसं को-ऑर्डिनेशनचं काम आपोआप शिकत जातात असं सर्वसामान्यपणे आढळतं. आपण फक्त आपल्यापुरतं सगळं ठीकठाक आहे ना, याची काळजी घेणं पुरत नसल्याच्या जाणिवेपोटी ते घडतं. याच्या जोडीला कामाच्या ठिकाणी बढती मिळाल्यावर जबाबदार्‍या वाढतात. त्याचबरोबर निरनिराळ्या विभागांनी एकमेकांशी आकसानं न वागता सुसूत्नपणे काम करण्यातून खूप काही साधता येत असल्याचे अनुभवही गाठीशी येतात. या सगळ्यातून काहीजण उत्तम को-ऑर्डिनेटर बनतात. अर्थातच त्यासाठी संबंधित माणसामध्ये खूप सोशिकता हवी. अडचणीच्या प्रसंगांमध्ये गडबडून न जाता शांतपणे विचार करून सर्व संबंधितांना आश्वस्त करण्याचं भान हवं. परिस्थिती कितीही हाताबाहेर गेल्यासारखी वाटत असली, आतून घाबरगुंडी उडालेली असली तरी आपलं बाह्य रूप धीरोदात्त ठेवण्याची कला साध्य व्हायला हवी. कुणाकडून कोणतं काम कसं करून घेता येईल हे कळायला हवं. कुणालाही न दुखावता अवघड प्रसंगांमधून बाहेर पडण्याचं कौशल्य जमायला हवं. ग्राहक, सहकारी, इतर घटक या तिन्ही आघाडय़ांवर आपला शांतपणा टिकवून लढत राहण्याचं कसब आत्मसात करायला हवं. पटापट निर्णय घेण्याची धडाडी यायला हवी.त्यात आपला संबंध आपल्या कामाच्या ठिकाणापेक्षा बाह्य लोकांशीच जास्त येत असेल तर को-ऑर्डिनेशनचं काम अजूनच अवघड बनतं. निरनिराळ्या ठिकाणांच्या लोकांच्या समजुती, त्यांच्या वागण्याच्या पद्धती, त्यांची कामाची शैली हे सगळं बारकाईनं समजून घेऊन त्याला अनुसरून वागण्याचं महत्त्व अशा वेळी खूप असतं.

त्यासाठीची मानसिक कौशल्यं  कशी कमवायची?

1. आपले काही खेळ एकटय़ाने खेळण्याचे असतात. बुद्धिबळ, बॉक्सिंग, जलतरण, टेनिस अशा खेळांमध्ये एका व्यक्तीचे प्रावीण्य पाहिले जाते. कबड्डी, क्रि केट, फुटबॉल, व्हॉलीबॉल हे खेळ संघ म्हणून खेळले जातात. त्यामध्ये एक व्यक्ती प्रवीण असली तरी संघ जिंकेलच असे सांगता येत नाही. आणि त्या व्यक्तीचे प्रावीण्य सिद्ध होण्यासाठीदेखील त्याला इतरांचे सहकार्य मिळवावे लागते.2. आपला आयुष्याचा खेळ हा एकटय़ाचा नसून संघ म्हणून खेळायचा खेळ आहे, असे सिद्ध होत आहे. 3. अनोळखी व्यक्तीबरोबर सहकार्य करण्याचे हे सामथ्र्य अन्य प्राण्यांत नाही. माकडे, कुत्ने दुसर्‍या   टोळीतील प्राण्याला त्यांच्यात सहभागी करून घेत नाहीत. माणसातदेखील ही प्रवृत्ती दिसून येते. मात्न त्यावर मात करून टोळीच्या बाहेरदेखील सहकार्य करण्याची क्षमता माणसात आहे. नवीन तंत्नज्ञानाने हे अधिक सहज आणि सोपे झाले आहे.4. तुम्हाला वेगाने जायचे असेल तर एकटय़ाने जा; पण तुम्हाला दूरचा प्रवास करायचा असेल, खूप काळ वाटचाल चालू ठेवायची असेल तर संघ निर्माण करा, अशा अर्थाची एक म्हण आहे. काही माणसांची वृत्ती ‘मी माझे काम योग्य करेन, दुसर्‍याची चिंता मी कशाला करू’ अशी असते. असे एकांडे शिलेदार काही काळ वेगाने प्रगती करताना दिसतात, मात्न ते लवकर थकतात. एकटय़ाच्या प्रयत्नांना आणि  कौशल्याला मर्यादा असतात.या उलट जे साथीदार तयार करतात, त्यांच्यात संघभावना निर्माण करतात, होणारा फायदा एकटय़ाने न घेता सर्वाशी वाटून घेतात ते अधिक काळ सक्रि य राहू शकतात, त्याचबरोबर अधिक प्रभावी काम करू शकतात.5. संघाचा भाग होताना प्रत्येकवेळी आपल्या मनासारखेच होईल असे सांगता येत नाही. संघ यशस्वी होण्यासाठी सहभावना जोपासून सर्वाना एका दिशेने वाटचाल करायला प्रेरित करावे लागते. दुसर्‍याच्या कर्तृत्वाला संधी देऊन कमतरता झाकाव्या लागतात. गुण-दोष प्रत्येक माणसातच असतात, मात्न अनेक माणसे संघ म्हणून एकत्न आली की एकत्रित गुणवत्ता वाढू शकते.6. संघभाव निर्माण होण्यासाठी एकात्मतेची भावना आणि सामुदायिक ध्येय गरजेचे असते. असे ध्येय आपल्या आयुष्याला अर्थ देऊन जाते. असा अर्थ गवसला की मनाला येणारी उदासी फार टिकत नाही.7. सध्या अनेक क्षेत्नात, तंत्नज्ञानात प्रगती होते आहे; पण त्याचबरोबर माणसांचे सैराट वागणे आणि त्यामुळे तणाव, उदासी आणि एकाकीपणा वाढला आहे. संघभावना या एकाकी तणवापासूनही दूर नेऊ शकते.

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शन