कॉलेजातला एक पिरिअड
By Admin | Updated: September 24, 2015 15:24 IST2015-09-24T15:24:51+5:302015-09-24T15:24:51+5:30
लखनौ विद्यापीठातलं एक कॉलेज.त्यांनी मुलींसाठी थेट सॅनिटरी नॅपकिन्सचं व्हेण्डिंग मशीनच कॅम्पसमधे लावलं. आणि एक वेगळाच विचारही मांडला.

कॉलेजातला एक पिरिअड
>'त्या चार दिवसां’बाबत आपण कधी मोकळेपणाने बोलतो? ‘ते चार दिवस’ म्हटल्यावर लगेच तुम्हाला कोणते दिवस हे कळलंच असेल. हा विषय असा चारचौघांत मोठय़ाने बोलायचा नाही. खरंतर बोलायचाच नाही. पुरुषांसमोर तर नाहीच नाही, अशीच घरातून मुलींना शिकवण.
मासिक पाळी हा विषय बायकासुद्धा एकमेकींशी कोडवर्डमधेच बोलतात. पिरिअड्स, एमसी, कावळा, शिवायचं नाही, करायचं नाही अशी भाषा आणि प्रदेशाप्रमाणो अनेक कोड वर्ड्स वापरून दबक्या आवाजात मुली यासंदर्भात बोललंच तर बोलतात.
एवढंच काय, सहकुटुंब एखादा कार्यक्र म बघत असताना मध्येच सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात लागली की हातात लगेच रिमोट येतो आणि चॅनेल बदललं जातं. सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी मेडिकलमधे किंवा एखाद्या दुकानात गेल्यास दुकानदार ते पॅकेट कागदात व्यवस्थित रॅप करूनच आपल्या हातात देतो. त्यात मुलगी स्वत:हून थेट पुरुष दुकानदाराकडे सॅनिटरी नॅपकिन्स मागतेय म्हटल्यावर तिच्यापेक्षा त्याच्याच चेह:यावरचा संकोच पाहण्यासारखा असतो.
अगदी घरी वर्तमानपत्रतले लेखही कुणाच्या नजरेस पडणार नाहीत असे कुठंतरी दडपले जातात. स्त्रियांच्या मासिक पाळीबाबत अजूनही समाजात अनेक रूढी, समजुती दृढ आहेत. त्यामुळे विषय मुलींच्या आरोग्याशी संबंधित असला, तरी त्यावर उघडपणो न बोलणंच उत्तम, असा अलिखित नियमच मुलींच्या वाटय़ाला आजवर आला. त्याही त्याला इतक्या सरावल्या की, कॉलेजात, ऑफिसात पाळी आलीच तर कुणाकडे नॅपकिन मागणंही संकोचाचं होतं. त्यावेळची अवस्था फक्त या अनुभवातून गेलेल्या मुलीच समजू शकतात.
तेव्हा हा विषय असा इतका वज्र्य असतानाही उत्तर प्रदेशातल्या अवध गल्र्स कॉलेजच्या व्यवस्थापनाने आपल्या कॉलेजमधे सॅनिटरी नॅपिकनचं एक व्हेण्डिंग मशीन बसवण्याचं धाडस दाखवलंय. जुने बुरसटलेले विचार, अंधश्रद्ध दृष्टिकोन यांमुळे दररोज घडणा:या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे चर्चेत राहणा:या उत्तर प्रदेशसारख्या राज्यात हे पाऊल उचललं गेल्याने त्याला धाडसच म्हणावं लागेल. हे मशीन कॉलेजात वॉशरूमच्या दर्शनी भागात आहे आणि जिला गरज आहे ती थेट जाऊन त्या मशीनमधून नॅपकिन घेऊ शकते.
याबाबत अवध गल्र्स कॉलेजच्या समन्वयक सबिका रझा म्हणाल्या, ‘‘पिरिअड्स कधी येतील सांगता येत नाही. त्यामुळे अनेकदा मुलींना एकमेकींकडे नॅपकिन्स आहेत का, याची चौकशी करावी लागते. एकमेकींना याबाबत विचारणंही त्यांना ब:याचदा लाजिरवाणं वाटतं. व्हेण्डिंग मशीन त्यांच्यासाठी खूपच फायद्याचं ठरलंय. एका कंपनीमार्फत साधारण मे महिन्यात याबाबतचा प्रस्ताव व्यवस्थापनाकडे आला होता. त्यानंतर त्याबाबत चर्चा होऊन दोनेक महिन्यांपूर्वी प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आणि ऑगस्टमधे कॉलेजच्या वॉशरूममध्ये हे मशीन बसविण्यात आले. दहा रु पयांच्या बदल्यात मुलींना एक नॅपकीन मिळते. पण फक्त मशीन बसवून आमचं काम झालेलं नाही. आम्हाला डिसपोजल मशीनही बसवायची आहेत. कारण स्वच्छतेच्या दृष्टीने डिसपोजलही तितकंच महत्त्वाचं आहे.
अवध कॉलेजने राबविलेल्या या उपक्र माला इतर महाविद्यालयांकडूनही दाद मिळतेय. व्हेण्डिंग मशीन, त्याची कंपनी, विद्यार्थिनींचा प्रतिसाद याबाबत विचारणा करण्यासाठी कॉलेजचा फोन सतत खणखणतोय. रझा म्हणतात, हा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. कॉलेजकडे जेव्हा याबाबतचं प्रपोजल आलं तेव्हा मॅनेजमेंटच्या एकाही सदस्याने त्याला विरोध दर्शविला नाही. कॉलेज व्यवस्थापनाने आपल्या या समस्येची दखल घेतल्याबद्दल मुलीही खूप खूश आहेत.
लखनौ विद्यापीठातही अशाच प्रकारे व्हेण्डिंग मशीन बसविण्यात येणार आहे. अलीकडेच झालेल्या सव्र्हेनुसार मासिक पाळी सुरू झाल्यानंतर मुलींनी शाळा सोडण्याचे प्रमाण उत्तर प्रदेशात 3क् टक्के आहे. मासिक पाळी मुलींच्या शिक्षणात अडसर बनू पाहतेय हे लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षीपासूनच उत्तर प्रदेश सरकारने शाळा-महाविद्यालयांतील मुलींमधे सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देण्याचे काम सुरू केलेय; शिवाय मासिक पाळीदरम्यानच्या स्वच्छतेबाबतही महिला-मुलींना साक्षर करण्यासाठी मोहीम राबवली जात आहे.
कॉलेजच्या वॉशरूममधे लागलेली व्हेण्डिंग मशीन असो वा कॉलेज कॅम्पसमध्ये जेण्डर इक्वलायङोशनचा मेसेज देणारे लावलेले सॅनिटरी नॅपिकन्स असो, अव्यक्त विषय व्यक्त होऊ लागलेत हेही नसे थोडके.
यापुढे अशी मशीन्स सगळ्या कॉलेजात आले तर मुलींची कुचंबणा बरीच कमी होईल. कधीतरी असं होईल, अशी आशा करायला काय हरकत आहे?
- अर्चना राणो-बागवान
कॅम्पसमधे नवा पिरिअड
या विषयावर आपण गप्प का राहायचं? चारचौघांत बोलू नये असा हा विषय आहे का, की यावर उघड चर्चा व्हायला हवी? - या आणि अशा अनेक प्रश्नांना उत्तर देतेय, पॅड अगेन्स्ट सेक्सिजम कॅम्पेन. दिल्लीत या कॅम्पेनला सुरुवात झाली ती जर्मन आर्टिस्ट एलोनकडून प्रोत्साहन घेऊन. महिला दिनाचे निमित्त साधून 19 वर्षाच्या एलोनने मार्च महिन्यात काल्र्सरूह शहरात ठिकठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स लावून ‘इमॅजिन इफ मेन वेअर अॅज डिसगस्टेड विथ रेप अॅज दे आर विथ पिरिअड्स’, ‘रेपिस्ट रेप पीपल नॉट द आउटफिट्स’ असे संदेश दिले होते.
एलोनचं हे संदेश देण्याचं माध्यम दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातल्या विद्याथ्र्याना खूपच प्रभावी वाटलं. त्यांनीही अशीच मोहीम सुरू केली. सॅनिटरी नॅपिकन्सवर ‘नारी मुक्ती सबकी मुक्ती, मेरा पहनावा तुम्हारा टिकट नही, पिरिअड ब्लड इज नॉट इम्प्युअर युवर थॉट्स आर’ अशा प्रकारचे मेसेज लिहून ते कॉलेज कॅम्पसमधील झाडांवरच काय नोटीस बोर्डवरही लावले गेले. मात्र परवानगी नसल्याचं कारण देत कॉलेज कर्मचा:यांनी ते काढून टाकले. कॉलेज व्यवस्थापनाच्या अशा प्रतिक्रि येने ही मुलं चक्र ावून गेली. काही विद्याथ्र्यानीही या मोहिमेला विरोध दर्शविला. पण ही मुलं थांबली नाहीत. त्यांनी ही मोहीम कॉलेज कॅम्पसबाहेर सुरू केली. दिल्ली विद्यापीठातल्या मुलांनीही अशीच मोहीम सुरू केलीय. त्यांना या मोहिमेला व्यापक बनवायचंय.